Yoga Importance योगाचे महत्व

Yoga Importance योगाचे महत्व

Yoga Importance आजचा विषय आहे. योगाचे महत्त्व म्हणजे काय ? योग आपल्या आयुष्यासाठी का उपयोगाचा आहे .आज कालच्या चर्चित विषयानुसार सगळ्या बाजूने योगा वरती विशेष काम करण्यात येत आहे .अगदी इंटरनॅशनल लेवल वरती म्हणजे परदेशातही भारतीय योगाची चर्चा आहे. बाबा रामदेव यांनी तर सातासमुद्रा पार  योग नेण्याचे काम केले आहे. भारतीयांनी ही संपदा आपलीच आहे म्हणून जपणे अतिशय गरजेचे आहे परंतु ही शोकांतिका आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला व तरुण पिढीला योग म्हणजे नेमकं काय हे सांगण्यापासून ची तयारी आहे .अगदी थाटामाटात इंटरनॅशनल योगा डे २१ जूनला साजरा करण्यापासून ते चायना मेड योगामेट वापरण्यापर्यंत सर्वकाही सोपस्कार जरी केले तरी त्या योगामधील सातत्य काही राखणे आजच्या तरुण पिढीला शक्य होत नाही. ते म्हणजे या धकाधकीच्या जीवनामुळे परंतु या धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराला मानसिकतेला एक स्थैर्य मिळवून देण्याचे काम योग करत आहे आणि हे आता आपल्याला पिढ्यानपिढ्या पुढे सर्वांना सांगणे आणि जाणून देणे गरजेचे आहे आणि त्यानंतर योगाचे महत्त्व .तर त्यासाठी आपण आधी पाहूयात ते म्हणजे योग म्हणजे काय ?परंतु त्याआधी पहावा लागेल तो योगाचा इतिहास

History of Yoga

History of Yoga योग हा पुरातन काळापासून होता. परंतु तो विखुरलेल्या स्वरूपात होता .त्याला महर्षी पतंजलीनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्त्याला 
सूत्रबद्ध केले. पातंजलयोगदर्शन निर्मिती झाली.योगा शब्द संस्कृत भाषेमध्ये आहे. त्याचा अर्थ जोडणे असा होतो. शरीर,मन आणि आत्मा
 यांना ईश्वराची जोडणे.त्यामुळे मोक्ष किंवा कैवल्यप्राप्ती होते परंतु त्यासाठी शरीर व मन सुदृढ असणे गरजेचे आहे. त्यासाठी पतंजलीनी
 अष्टांग योग सांगितलेला आहे अष्टांग योगचा उपयोग करून आपण शरीर व मन सुदृढ बनवू शकतो.

     


Yoga Importance   योगाचे महत्व

Health and Yoga Importance   याचा काय संबंध आहे हे आजकालच्या जीवनात आपल्याला सर्वांना समजून येत आहे की शरीर संपदा  किती महत्त्वाची आहे. ज्याला शारीरिक शक्ती नाही तो मानसिकरित्या कितीही सशक्त असला तरीही अशक्त समजला जातो. अनेकदा विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या अनेक गोष्टी माहीत असतात त्यांना अभ्यासही केलेला सर्वतोपरी लक्षात असतो पण फक्त परीक्षेच्या वेळी लिखाण करायला हात साथ देत नाहीत. म्हणून कितीतरी विद्यार्थ्यांचे पेपर अपूर्ण राहतात. आता यात सांगा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी चुकला कुठे? तर अजिबात नाही तो चुकलाच नाही परंतु आपण चुकतोय त्या विद्यार्थ्याला शरीर संपदा डेव्हलप करण्यासाठी उत्तेजना देण्यासाठी आपण कमी पडत आहोत. “तुझं दहावीचा वर्ष आहे,हा अभ्यासाचा वेळ आहे,तो फक्त अभ्यासासाठीच कारणे लाव!”अशी वाक्य आपल्याला अनेक घरातून ऐकू येतात परंतु ऐन परीक्षेच्या वेळी मुलं आजारी पडतात मुलांना अचानकपणे जी उत्तरे माहित आहेत ती सुद्धा समजेनाशी अशी होतात.कुठून सुरुवात करू? कसा लिहू?अशी मानसिक दृष्ट्या मुलं दुर्बल असल्याचे भासते.

 

याचे नेमके कारण काय कारण दुसरे तिसरे काही नसून मानसिक स्वास्थ्य आहे आणि आता मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी तर आपण जिम मध्ये जाऊ नाही शकत जिम मध्ये जाणे हे म्हणजे फक्त शारीरिक दृष्ट्या तुमच्या शरीराला आकार देणे यासाठी उपयोगी आहे. पण मानसिक स्वास्थ्याचे काय मानसिक स्वास्थ्य आणि त्याचबरोबर शारीरिक सबळता महत्त्वाची आहे. बदललेली जीवनशैली, बदललेले कामाचे स्वरूप बदललेली ऋतुमान आणि आहाराच्या  बदललेले सवयी त्याचा एकंदरच परिणाम हा शरीरावर व मनावरती होत असतो .त्यामुळे शारीरिक आणि मानसी तान तणावाला समोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर शरीराच्या सर्व अवयवांची हालचाल होत नाही किंवा एखाद्या हालचाल जास्त प्रमाणात होते त्यामुळे शरीराचा एखादा भाग कमकुवत होतो व इंद्रियावर कोणते पद्धतीचे संयम किंवा नियंत्रण राहिलेली नाही.यासाठी शरीर व मन सुदृढ होणे आवश्यक आहे. योगामुळे शारीरिक लवचिकता,चपळता, चंचलपणा, एकाग्रता ,आकलन क्षमता, स्मरणशक्ती या सर्व गोष्टींची कार्यक्षमता वाढते. योग हे फक्त शास्त्र नसून जीवन कसे जगायचे ते शिकवणारे शास्त्र आहे. योग ही पंचकोशात्मक उपचार पद्धती सुद्धा आहे.त्याचबरोबर  मानवी जीवनात शारीरिक व मानसी येणारा ताण तणाव दूर करण्यासाठी ही योग अभ्यासाचा उपयोग होतो.भारतीय वेदांमध्ये अगदी पुरातन काळापासून Yoga Importance सांगितलेले आहे . हे सर्व योगाभ्यासामुळे मुळे शक्य आहे . आता काळाची गरज आहे ती म्हणजे योगाची पुन्हा एकदा योगा कडे वळण्याची.

निष्कर्ष

आधुनिक काळामध्ये बदललेली जीवनशैली आणि कामाचे स्वरूप व इतर विविध गोष्टी त्यामुळे माणसांमध्ये शारीरिक व मानसिक व्याधीचे प्रमाण वाढत चालले आहे व ताण-तणाव सुद्धा वाढत आहे . या गोष्टींचे निराकरण करण्यासाठीआपल्या दैनंदिन जीवनात थोडा वेळ योगाभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्या व्याधी व ताण तणाव कमी होण्यास मदत होईल व आपले जीवन आनंदमय होईल.

Yoga benefits  योगाचे फायदे

योगासनामुळे शरीर तंदुरुस्त राहते.
मन शांत , प्रसन्न  व एकाग्र राहते.
योगासनामुळे व्याधी कमी होतात.
अतिरिक्त चरबी कमी होते वजन नियंत्रणात राहते.
योगासनामुळे तणाव कमी होतो.
योगासनामुळे श्वास नियंत्रण येते.
विविध स्नायूला ताण पडल्यामुळे त्या ठिकाणी रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते.
शरीरामध्ये लवचिकता ,चापल्लेता, एकाग्रता, निर्णय क्षमता वाढते.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

वजन नियंत्रणात राहते

व्यसनांपासून दूर राहतो.

पचनक्रिया चे काम व्यवस्थित चालते.

दम क्षमता वाढते.

शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक यांचा विकास .