Yoga Aasan Pose नटराजासन-उत्कटासन-एकपाद उत्कटासन-परिवर्त एकपाद उत्कटासन-अर्धा चंद्रासन

                                Yoga Aasan pose -योगा आसन

 

Yoga Aasan Pose नटराजासन-उत्कटासन-एकपाद उत्कटासन-परिवर्त एकपाद उत्कटासन-अर्धा चंद्रासन

 

 

जागतिक योग दिन आपण 21 जून रोजी साजरा करतो.  योगामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टी सुधारण्यास मदत मिळते.योगा हे आपले शरीर अधिक तंदुरुस्त राखण्यासाठी मदत करते.प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरेजेच आहे आणि यासाठी तुम्ही योगाभ्यास करायला हवा. योग हा शब्द जोडणे किंवा एकत्र येणे (युज)या धातूपासून तयार झालेला आहे त्यामुळे शरीर मन आणि आत्म्याचा परमात्माशी संयोग साधण्याची कला म्हणजे योग योगाभ्यासाच्या साह्याने व्यक्तीला जीवात्मक आणि परिमत्त्व यांची एकात्मक साधून व्यक्तिगत पातळीवर मुक्तता समाधान आणि सर्वोच्च आनंदाचा अनुभव घेता येतो असे योगदर्शन सांगते.

 

Yoga Aasan Pose 

1) नटराजासन (Dance Pose )

Yoga Aasan Pose

नटराजासन हे दंड स्थिती मधील आसन आहे तोलात्मक अवघड स्पर्धात्मक आसन आहे.

आसन कसे करावे 

 • एक प्रथम ताठ उभे राहावे. नजर स्थिर करावी.
 • आता एक पाय गुडघ्यात वाकवून हाताने पायाचा चवडा पकडावा त्यातून हळूहळू तो पाय वरच्या दिशेला घ्यावा शक्य तेवढा वेळ तो पाय वर घ्यावा.
 • गुडघा ताट करण्याचा प्रयत्न करावा.
 • गुडघा ताट करण्याचा प्रयत्न कराल तसे हाताची पकड पोटरीच्या दिशेला येईल.
 • कमरेतून थोडेसे पुढे वाकले जाईल पोटाचा भाग साधारण जमिनीला समांतर होईल.
 • दुसरा हात समोरच्या दिशेला घ्यावा श्वसन संत सुरू ठेवावे.
 • आसनात साधारण 30 ते 40 सेकंद स्थिर राहावे.
 • आसन सावकाश सोडल्यावर दुसऱ्या पायाने ही करावे.

आसनाचे फायदे

 • या आसनाच्या सरावाने लवचिकता एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो.
 • पायाचे स्नायू अधिक लवचिक व सशक्त होतात.
 • छाती व पोटाला ही ताण बसल्याने तेथील इंद्रये आणि स्नायू शिरा अधिक कार्यक्षम होतात
 • संपूर्ण शरीराचे रक्ताभिसरण सुधारते

2 )उत्कटासन

 

Yoga Aasan Pose

आपल्या शरीराचा आकृतिबंध आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसतो त्या प्रमाणे तयार होतो. त्यामुळे या आसनाला इंग्रजी मध्ये चेअर पोझ (Chair Pose) असे म्हणतात. या आसनाची कृती व फायदे या बद्दल सविस्तर मराठी माहिती आपण खाली जाणून घेऊयात

आसन कसे करावे 

 • आपल्या योग करण्याच्या आसनावर, आपल्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेऊन सरळ उभे राहा.
 • आता आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसताना जसे वाकतो तसे वाका.
 • हि कृती करत असताना आपला श्वासोश्वास निमित्त चालू राहू द्या.
 •  आसन करताना आपल्या मांड्या आपल्या पोटऱ्यांना स्पर्श करणार नाहीत याची दक्षता घ्या.
 • या स्थितीत १० ते १५ सेकंद राहिल्या नंतर परत आपल्या पूर्व स्थितीत या.

आसनाचे फायदे

 • या आसनाच्या सरावामुळे आपल्या मांड्या, पोटऱ्या व घोटे मजबूत बनतात.
 • पाठीच्या आणि कमरेच्या भागावर ताण पडून तेथील स्नायू सुद्धा मजबूत बनतात.
 • हे आसन करताना शारीरिक तोल सांभाळावा लागतो म्हणून याला तोलासन असे सुद्धा म्हणतात, या आसनाच्या सरावामुळे मन शांत होते, स्थिरावते.

काळजी

 • गुडघेदुखी असणाऱ्यांनी शक्यतो असं करू नये.
 • कमरेचा आणि घोट्यांचा काही त्रास असल्यास तसेच पायांना कोणतीही दुखापत असल्यास हे आसन करू नये.

 

 3 ) एकपाद उत्कटासन

Yoga Aasan Pose

हे दंड स्थिती मधील आसन आहे हे तोलात्मक आसन आहे.

आसन कसे करावे 

 • प्रथम दोन्ही पायात खांद्या एवढे अंतर घेऊन उभे राहावे.
 • हळूहळू गुडघे वाकवावे एका पायाचे पाऊल दुसऱ्या पायांच्या मांडीवर घ्यावे.
 • जो पाय जमिनीवर टेकवला आहे त्याची मांडी जमिनीला साधारण समांतर येईल इतपत गुडघ्यात वाकलेला असावा.
 • नजर स्थिर असावी म्हणजे व्यवस्थित तोल सांभाळता येईल श्वसन संत सुरू ठेवावे.

आसनाचे फायदे

 • या आसनामुळे मांडीचे पोटरीचे स्नायू अधिक सुदृढ होण्यास मदत होते.
 • एकाग्रता वाढते.

काळजी

 • पाठीला बाक येणार नाही याची काळजी घ्यावी.
 • आसनामध्ये पाठ ताठ असावी.
 • गुडघेदुखी असणाऱ्यांनी शक्यतो असं करू नये.

 

 4) परिवर्त एकपाद उत्कटासन

Yoga Aasan Pose

 

आपण एक पाद उत्कटासन कसे करतात, ते पाहिले त्याचा योग्य तो सराव झाला की परिवर्त एकपाद उत्कटासन सराव सुरू करावा.

आसन कसे करावे 

 • प्रथम एक पाद उत्कटासन करावे त्यात साधारण पाच सेकंद तरी स्थिर राहावे.
 • त्यानंतर श्वास सोडत कमरेतून वळावे.
 • उजवा पाय वर असेल तर ज्या बाजूला पायाचा तळवा आहे. तिथे वळावे.
 • उजव्या पायाच्या तळव्यावर उजव्या दंडाने रेटा देऊन.
 • दोन्ही हातांचा नमस्कार करावा छायाचित्राप्रमाणे आसन करण्याचा प्रयत्न करावा.
 • श्वसन संत आणि नजर स्थिर असावी साधारण 30 सेकंदापर्यंत आसन करण्याचा प्रयत्न करावा.
 • एका बाजूने झाले की दुसऱ्या बाजूने  करावे

आसनाचे फायदे

 • या आसनाच्या नियमित सरावाने पायाचे विशेषतः मांडीचे स्नायू सशक्त होतात.
 • तोलात्मक आसन असल्याने एकाग्रता वाढते मन शांत राहते यामध्ये पायाच्या कण्याला आणि पोटाला पीळ बसतो यामुळे पोटातील इंद्रिय अधिक कार्यक्षम होतात.

 

5)  अर्धा चंद्रासन

 

Yoga Aasan Pose

अर्ध चंद्रासन हे दंड स्थिती मधील तोलात्मक आसन आहे

 

आसन कसे करावे 

 • पायात साधारण अडीच ते तीन फुटाचे अंतर घेऊन उभे राहावे.
 • डावे पाऊल डाव्या बाजूला वाकवा वळवावे त्यानंतर ज्याप्रमाणे त्रिकोणास त्रिकोणासणात बाजूला वागतो तसेच डाव्या बाजूला वाकावे.
 • डाव्या गुडघ्या थोडासा वाकून डाव्या पावलाच्या पुढच्या बाजूला डाव्या हाताचा तळवा टेकवावा.
 • आता डाव्या तळहातावर जोर देऊन उजवा पाय जमिनीवर वर उचलावा.
 • आत उजवा हात वरच्या दिशेला ताणून द्यावा
 • दोन्ही गुडघे दोन्ही हात ताट असावेत.
 • श्वसन संत स्वरूप ठेवावे नजर समोरच्या बाजूला स्थिर असावी किंवा मान वरच्या दिशेला वळवावी वळवली असल्यास नजर वरच्या हाताकडे स्थिर ठेवावी.
 • शक्य तेवढा वेळ आसन स्थितीत स्थिर राहून टिकवावे.
 • सावकाश उलट उलट क्रमाने आसन सोडावे व दुसऱ्या बाजूने करावे.

आसनाचे फायदे

 • आसनाच्या रोजच्या सरावाने एकाग्रता वाढते.
 • मन शांत होते.
 • पायांचे स्नायू karyksham होतात

काळजी

छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे वाकणी शक्य नसल्याने नसल्यास खुर्चीच्या आधाराने आसन करा.

4 thoughts on “Yoga Aasan Pose नटराजासन-उत्कटासन-एकपाद उत्कटासन-परिवर्त एकपाद उत्कटासन-अर्धा चंद्रासन”

Leave a comment