Weight loss tips in marathi

 Weight loss tips in marathi

Weight loss tips in marathi

 

Weight loss tips in marathi धावपळीच्या आणि दगादकीच्या जीवनामध्ये आरोग्य जपणे खूप कठीण होत चाललेलेआहे. त्यामध्ये वाढणारी वजन ही एक मोठी समस्या बनत चाललेली आहे. वजन नियंत्रणासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत परंतु ते सहज आणि सोप्या रीतीने करता येणे आवश्यक आहे. वजन वाढण्याचे पाठीमागील प्रमुख कारण म्हणजे आहार, दैनंदिन कामासाठी आपल्या शरीराला ठराविक कॅलरी लागतात.साधारणपणे आपण दररोज आपल्या शरीराला लागणाऱ्या कॅलरी पेक्षा अतिरिक्त आहार घेतल्यामुळे शरीर आवश्यक असणारे ऊर्जा शरीराला पुरवते व राहिलेली सर्व आपल्या फॅट म्हणजे चरबी रूपामध्ये शरीरामध्येमद्ये साठवले जाते.

आपल्याला दररोज किती कॅलरी लागतात व आपण आहार किती घेतो याच्या भोवतीने आपल्या वजनाचे गणित फिरत असते.आपण गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेतो त्यावेळेस आपली वजन वाढण्यास सुरुवात होते.हे तुम्ही कॅलरी कॅल्क्युलेटर पाहू शकता.यासाठी आपण आपल्या दररोज कॅलरी किती बर्न होतात त्याच प्रमाणामध्ये तेवढ्याच कॅलरी घेतल्या पाहिजे व अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे.तुमचे शरीर एक बँकेप्रमाणे व्यवहार करते. तुम्ही दररोज किती कॅलरी घेता व किती खर्च करता. जेवढे खर्च करून शिल्लक राहता तेवढ्या फॅट म्हणजे चरबी रूपाने शरीरामध्ये शिल्लक राहते.

 वजन वाढीची प्रमुख कारणे 

 • बदललेली जीवनशैली
 • बदललेले कामाचे स्वरूप
 • आहाराचे नियोजन
 • शारीरिक व मानसिक ताणतणाव
 • आधुनिक साधनांचा जास्त प्रमाणात वापर
 • औषध गोळ्यांची अतिसेवन
 • अनुवंशिकता
 • पूर्ण झोप न घेणे

वजन वाढू नये यासाठी केलेले उपाय

 

पुरेशी झोप (Sleep )

Weight loss tips in marathi

 

शरीराला पुरेशी झोप हवी.रात्री लवकर झोपावे व सकाळी लवकर उठावे हे सूत्र आपल्याला निसर्गाने दिलेले आहे .परंतु आताच्या स्पर्धेच्या काळामध्ये आपल्या झोपेचे सूत्र बदललेले आहे. कामाच्या स्वरूपामुळे आपल्याला झोपण्याची वेळेमध्ये सातत्याने बदल होत असतो.आपल्याला झोपेचे नियंत्रण करणे कठीण जात आहे .

परंतु ज्यावेळी शक्य असेल त्यावेळेस रात्री लवकर झोपावे व सकाळी लवकर उठावे त्यामुळे आपल्या शरीराची कार्यप्रणाली चांगल्या पद्धतीने होते व आपली पचनक्रिया सुद्धा चांगली चालते त्यामुळे आपले वजन नियंत्रण ठेवण्यास ही मदत होते.

डिटॉक्स (Detox )

weight loss tips in marathi

सर्वात प्रथम आपले शरीर डिटॉक्स होणे खूप गरजेचे असते. शरीर डिटॉक्स करायला शिका म्हणजेच आपल्या शरीरामध्ये अनावश्यक घटक बाहेर टाकने.सकाळी उठल्यानंतर एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये एक लिंबू पिळून ते पाणी प्यावे. किंवा कोहळा त्यावरील वरची साल काढून व आतल्या बिया काढून राहिलेला मधला गर त्याचा ज्यूस बनवावा ते बनवत असताना एका ग्लासासाठी कपभर पाणी मिसळून बनवावा. दररोज एक ग्लासभर हा ज्यूस प्यावा.त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

सकाळचा नाष्टा आणि जेवण ( Breakfast & Lunch ,Dinner )

Weight loss tips in marathi

सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेलीHealthy snacks कडधान्य हरभरा, मटकी व काकडी, टोमॅटो ,गाजर ,बीट च्या गोष्टींचा नाश्त्यामध्ये समावेश करावा.जेवणामध्ये ही थोडे दही व सॅलड म्हणून काकडी टोमॅटो गाजर असावे. व जेवणामध्ये जास्त भाज्यांचा समावेश असावा व चपाती भाकरी याचे प्रमाण कमी असावी.संध्याकाळी हलके अन्न घ्यावे आणि रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावे.

व्यायाम (Exercise )

व्यायामाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे नियमित व्यायाम केल्याने अनेक रोग टाळता येतात. शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. मानसिक आरोग्य ही चांगले राहते. वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. उत्साह टिकून राहतो. रक्ताभिसरण चांगले होते. शरीर चैतन्य संचारते.

मानवी जीवनात व्यायामाचे आरोग्यदायी मित्र इतकेच महत्त्वपूर्ण स्थान आहे.त्यामुळेनियमित व्यायाम करावा.व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअप करावा.  शरीर मोकळे व सैल होण्यास मदत होते. त्यामध्ये 40 ते 45 मिनिटे चालणे. व इतर प्रकारचे व्यायामही करावा.सूर्यनमस्कार, दोरीच्या उडया, योगासने, स्विमिंग, सायकलिंग.

Weight loss tips in marathi

 

 • वॉर्मअप
 • 40 ते 45 मिनिटे चालणे
 • सूर्यनमस्कार
 • योगासने
 • स्ट्रेचिंग

जेवणापूर्वी पाणी प्यावे (  Water )

Weight loss tips in marathi

पाणी पिल्याने 25% जलद गतीने कॅलरी बर्न होतात. पाणी पिल्यानंतर शरीरातील सर्व प्रक्रिया जलद गतीने पार पडतात. यादरम्यान फॅट बर्न करण्यासाठी शरीराची अधिक ऊर्जा खर्च होते. पण त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.

साधारण जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास जास्त भूक लागत नाही जेवणापूर्वी जास्त पाणी पिल्याने वजन कमी होते .तर दुसरीकडे जेवल्यानंतर लगेचच पाणी पिल्याने वजन वाढण्याची ही निर्दशनास आले आहे. वजन घटवण्यासाठी जेवणाआधी पाणी पिणे कधीही फायदेशीर ठरेल.

जेवणाआधी व नंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका साधारणपणे जेवणाच्या आधी अर्धा तास व नंतर एक तास या अंतराने पाणी प्यावे.

जीवनशैली (Lifestyle)

जीवनशैली म्हणजे आजच्या काळातील Lifestyle. सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे केले जाते , करावे लागते ते सर्व जीवनशैलीमधे अंतर्भूत आहे.वजन कमी करण्यासाठी तुमची जीवनशैली बदलावी लागेल कारण जीवनशैली बदलूनच आपल्याला आहारामध्ये बदल करावे लागतील.

किमान आठवड्यातून एक दिवस उपवास करावा त्यावेळेस आपण फलाहार किंवा ज्यूस घेऊ शकतो या उपवासामुळे आपल्या पचनक्रियेला काय प्रमाणात आराम मिळतो व शरीर डिटॉक्स होण्यासाठी मदत होते.सकाळी लवकर उठावे लागेल थोडासा व्यायाम हा करावाच लागेल आणि रात्री लवकर झोपावे लागेल

गोड पदार्थ ( Sugar )

Weight loss tips in marathi

 

 

गोड पदार्थांमध्ये साखर ही महत्त्वाची ठरते.सकाळी उठल्यानंतर चहा पिणे हे सर्वांनाच आवडते. त्या चहामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यास .वजन वाढण्यासाठी साखर कारणीभूत ठरते. साखरेचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा कारण साखर वजन वाढण्याचे प्रमुख कारणांपैकी एक आहे.साखरेचे प्रमाण कमी केल्याने वजन कमी होण्यास जलद गती मिळते .मधुमेहाचा धोका कमी होतो .त्वचा सुंदर दिसायला लागते. हळूहळू त्वचेचे वय वाढते. त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.

शुद्ध साखर खाल्ल्याने अधिक थकवा आणि अशक्तपणा जाणवतो अशा परिस्थितीत जर साखर खाणे कमी केले तर रक्तातील साखरेची पातळी कमी होते त्यामुळे व्यक्तीला पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा वाटते. साखर कमी केल्याने मानसिक आरोग्य देखील सुधारते. कारण अनेक संशोधकांचा असा विश्वास आहे की साखरेचा उच्च ग्लायसेमिक निर्देशकांमुळे मेंदूमध्ये जळजळ होऊ शकते जी चिंता नैराश्य रोगांशी संबंधित आहे त्यामुळे साखर बंद केल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यास मदत होते.

 

 

 

4 thoughts on “Weight loss tips in marathi”

Leave a comment