Vitthal Rukmini varkari vima Chhatra Yojana

Vitthal Rukmini varkari vima Chhatra Yojana 2023

महाराष्ट्र वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

“विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना”

चला तर जाणून घेऊयात,

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 जून 2023 रोजी बुधवारी वारकरी यात्रेकरूंना विमा संरक्षण देणारी “विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना” लागू करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र राज्यातील वारकऱ्यांच्या भल्याचा विचार करून शासनाने ही विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू केली आहे. ही योजना 30 दिवसांची असेल.

आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो वारकरी बंधू-भगिनी पंढरपूरला लांब पदयात्रा करतात. एक महिन्याच्या प्रदीर्घ प्रवासादरम्यान हजारो लोक अपघात, दुखापत, कायमस्वरूपी किंवा अंशतः दुखापत किंवा अपंगत्वास बळी पडतात आणि बहुतेक वेळा त्यांचा जीव गमावण्याची वेळ येते. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेऊन या भाविक नागरिकांसाठी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ सुरू केली आहे.

Vitthal Rukmini varkari vima Chhatra Yojana 2023

पांडुरंगाच्या ओढीने राज्याच्या कानकोपऱ्यातून दरवर्षी वारकरी पंढरपुरात ऊन पाऊस याची कोणतीही जीवाची तमा न बाळगता दाखल होत असतात. आणि संतांच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत.राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना” सुरू केली आहे.या योजनेच्या माध्यमातून वारकरी किंवा त्यांच्या वारसदारांना मदत दिली जाणार आहे.

Vitthal Rukmini varkari vima Chhatra Yojana 2023

या योजनेच्या माध्यमातून वारकरी किंवा त्यांच्या वारसदारांना मदत दिली जाणार आहे.आणि त्याचा लाभ नेमका कसा घ्यायचा आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाची वारी करणाऱ्या 15 लाख वारकऱ्यांना योजना आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजनेची घोषणा केली.या योजनेतून आषाढी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय ही योजना राबवण्यासाठी शासनाने जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड General insurance company Ltd. या विमा कंपनीची निवड केली गेली आहे.

या योजनेसाठी विमा हप्ता भरण्यासाठी दोन कोटी सत्तर लाख रुपये इतकी रक्कम टोकियो जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेटेड लिमिटेड Tokyo general insurance coorporated Ltd. या कंपनी कडून देण्यात येणार आहे. आषाढी वारी 2023 श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी अथवा सार्वजनिक वाहने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही योजना लागू राहील . व तसेच ऊन पाऊस यामुळे दुखापत झालेले किंवा आजारी पडलेल्या वारकऱ्यांसाठी ही योजना लागू राहील.

Vitthal Rukmini varkari vima Chhatra Yojana 2023 विमा कालावधी 2023 च्या 23 जून पासून ते २३ जुलै असा 30 दिवसांपर्यंत असेल.

Vitthal Rukmini varkari vima Chhatra Yojana 2023

या योजनेअंतर्गत एखाद्या दुर्घटनेत अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास या वारकऱ्यांच्या वारसास एक लाख रुपये रक्कम विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. तसेच संबंधित वारकऱ्यांच्या वारसा चार लाख रुपये देण्यात येतील. असे मिळून त्यांच्या कुटुंबीयास पाच लाख रुपये अनुदान देण्यात येईल. तसेच दिंडी सोहळ्या दरम्यान अपघातात कायमचं अपंगत्व आल्यास विमा कंपनीकडून प्रति व्यक्ती विमा रक्कम एक लाख रुपये देण्यात येतील. व तसेच अंशतः अपंगत्व आल्यास पन्नास हजार रुपये या व्यतिरिक्त वारी दरम्यान आजारी पडल्यास वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी 35 हजार रुपये रक्कम विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

या योजनेच्या अंतर्गत विमा कंपनीकडे दावा करण्यासाठी संबंधितांनी विहित नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक राहील.तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी करता पंढरपूर येथे गेल्या बाबतचा आणि वारकरी राज्यातील ज्या गावचा रहिवासी आहे त्या संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्या सहित सादर करणे आवश्यक आहे. तहसीलदार संबंधित वारकरी आषाढी वारी करता गेले ची खात्री करून वारकरी अथवा वन विभागाकडून करण्यात येणार आहे. व मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासन निर्णय उपलब्ध करण्यात आला आहे.

या कारणांसाठी लाभ मिळणार नाही:

1) आत्महत्या व प्रयत्न.

2) गुप्तरोग, वेडसरपना यामुळे आलेले अपंगत्व किव्वा मृत्यू.

3) अंमली किव्वा मादक पदार्थ यामुळे झालेला मृत्यू.

4) प्रसूती दरम्यान आलेले विकलांग किव्वा मृत्यू.

5) गुन्हेगारी प्रवृत्ती मुळे झालेला मृत्यू.

Vitthal Rukmini varkari vima Chhatra Yojana 2023 उद्देश:

प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये राज्यातील विविध ठिकाणाहून भावी यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात यामध्ये खूप प्रमाणामध्ये गर्दी असते व अपघात होण्याची भीती असते अनेक लोकांचा अपघात होत असतो.

ही फार मोठी समस्या आहे याची काळजी महाराष्ट्र शासनाने घेऊन ही योजना सुरू केली आहे एखाद्या व्यक्तीसंबंधी कोणतीही घटना घडल्यास त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत केली जाईल.

राज्यामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांची परिस्थिती बेताची आहे व अशा परिस्थितीमध्ये अपघात झाल्यास स्वतः किंवा कुटुंबावर उपचार घेऊ शकत नाही परंतु या योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळणार आहे व येणाऱ्या सर्व भाविकांचा या योजनेतून विमा उतरला जाणार आहे.

प्रत्येक वर्षी जास्तच गर्दी वाढत जात आहे परंतु अपघाताचा धोका झाल्यानंतर कोणतेही संरक्षण नव्हते आता या योजनेच्या माध्यमातून संरक्षण मिळेल व काळजी कमी होईल.

कोणतेही प्रकारची घटना घडल्यास व त्या व्यक्तीस किंवा त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाईल गरीब व आर्थिक कमकुवत असलेल्या असल्यामुळे अनेकांना उपचार मिळू शकत नाहीत मात्र या योजनेच्या माध्यमातून सर्व भाविकांना विमा जाणार आहे.

निष्कर्ष:

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना 2023: पंढरपूर मध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने अनेक वारकरी राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात त्यावेळी खूप गर्दी असते . वारी करत असताना अनेक वेळा अपंगत्व येते त्यावेळी सर्वसामान्य माणसाकडे उपचारासाठी पैसे नसतात या सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यासाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना अशा नावाने ही योजना सुरू केली त्यामध्ये जास्तीत जास्त पाच लाख रुपयांचा विमा केला जाईल व विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेत वारी सुरू झाल्यापासून 30 दिवसाच्या आत वारकऱ्याचे काही नुकसान झाल्यास त्याला या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाईल.

2 thoughts on “Vitthal Rukmini varkari vima Chhatra Yojana”

Leave a comment