Tata group will be1st Indian iPhone maker

Tata group will be1st Indian iPhone maker

Tata group will be1st Indian iPhone maker

 

 

Tata groupकंपनी बनवणार आयफोन मेड इन इंडिया चा मार्ग मोकळा झाला आहे कारण आता टाटा ग्रुप आयफोन निर्मितीत उतरणार आहे.

जगभरामध्ये आयफोनची क्रेझ वाढत आहे. ॲपलचे कोणतेही प्रॉडक्ट भारतामध्ये लॉन्च होतास त्याची मागणी ही वाढते. भारतीय साठी एक आनंदाची बातमी समोर येतेआहे. ते म्हणजे भारतामध्ये आयफोन बनवण्याच्या तयारीत असलेली चर्चा ऐकायला मिळत आहे यामध्ये टाटा कंपनी आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनू शकते .हा प्रत्यक्षात करार उतरण्याची शक्यता आहे.कर्नाटक मध्ये असलेल्या वेस्टर्न कॉर्प या कंपनीचे अधिग्रहण करण्याच्या तयारीत टाटा ग्रुप असल्याचे समोर येत आहे.

Tata group:

Tata group will be1st Indian iPhone maker

भारतामध्ये टाटा ग्रुप ही पहिली कंपनी आयफोनची निर्मिती करणारी ठरणार आहे. एप्पल कंपनीने आता इतर देशांमध्ये आयफोनची मॅन्युफॅक्चरिंग करण्यावरती भर दिला आहे. टाटा ग्रुपच्या या निर्णयामुळे भारतातील बहुतांश लोकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.ॲपल कंपनीला होणार फायदा भारतामध्ये आयफोनची निर्मिती केल्यामुळे एप्पल कंपनीला चीनच्या पलीकडे इतर आशियाई देशांमधून फायदा मिळेल.चीन मधून एप्पल चा काढता पाय.ॲपलचे सर्वात जास्त उत्पादन हे सध्या चीन मधून केले जाते.

परंतु चीन हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने बदलती भूमिका आणि वाशिंग्टन बीजिंग यांच्यात वाढत्या तणाव मुळे एप्पल चीन पासून दूर जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी पर्याय म्हणून भारतात भविष्यात उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाऊ शकते.देशातील मोठे औद्योगिक समूहात टाटा समूहाला पाहिले जाते. ॲपल पुरवठा करणारी कंपनी (Winston Crop)चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत लवकरच या दोन्ही कंपनीमध्ये करार होण्याची चिन्ह दिसत आहेत.येणाऱ्या ऑगस्ट महिन्यापर्यंत अनेक घडामोडी घडणार आहेत. आयफोनची असेंबल करणारा Tata group हा  भारतातील पहिला नंबर ठरेल.

भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार:

यामुळे भारतामध्ये रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होईल. हा करा निश्चित झाला तर येणाऱ्या काळामध्ये नोकरीच्या संधी निर्माण होतील व भारतातून स्मार्टफोनच्या निर्यातीमध्ये वाढ होईल त्याचबरोबर निर्मितीसाठी येणारा खर्चही कमी होईल आणि आयफोनची किंमत ही कमी होऊ शकते

Tata group will be1st Indian iPhone maker

Leave a comment