Talathi Bharti 2023

 

 

Talathi Bharti 2023

भाऊसाहेबांची भरती आली रे !!!

अखेर तलाठी भरतीला मिळाला मुहूर्त !!!

४६४४ पदांसाठी ऑनलाईन (computer based) स्वरूपात परीक्षा

Talathi Bharti 2023

 

मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महसूल विभागातील तलाठी भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून ४६४४ जागांसाठी जाहिरात महसूल व वन विभागाने प्रकाशित केली आहे या पदासाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. तसेच ही परीक्षा TCS या कंपनीमार्फत घेतली जाणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार असून त्याची मुदत 26 जून 17 जुलै 2023 पर्यंत आहे.

परीक्षेचा दिनांक व कालावधी हा http://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर नंतर जाहीर केला जाईल किंवा उमेदवारांना तो प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे.

ही परीक्षा राज्यातील 36 जिल्ह्यांतून विविध केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

यापूर्वी सरकारने वारंवार तलाठी भरतीची घोषणा केली होती मात्र या भरतीला मूहूर्त मिळत नव्हता .तलाठी भरती रखडल्याने भरतीचे प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र संतोष होता तर दुसरीकडे तलाठ्यांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी संबंधित कामाचा खोळंबा होत होता.

Talathi bharti online form date

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/ कालावधी :-

अ.क्र. तपशील विहित कालावधी
१. अर्ज सादर करण्याचा कालावधी दि.२६/०६/२०२३ रोजी पासून

दि.१७/०७/२०२३ रोजी २३:५५ वाजेपर्यंत

२. ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दि.१७/०७/२०२३ रोजी २३:५५ वाजेपर्यंत

 

अर्ज करण्यासाठी लिंक :-

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html

परीक्षा शुल्क (फि) Fee –

१. तलाठी-पेसा क्षेत्राबाहेरील (अनुसूचित क्षेत्राबाहेरील) –

१.१. खुला प्रवर्ग -१०००/-.

१.२. राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) -९००/-

२.   तलाठी- पेसा क्षेत्रातील – ९००/-

माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.

पात्रता पदवी

परीक्षेचे स्वरूप

१.तलाठी भरती 2023 उमेदवारास फक्त एका जिल्ह्यातून अर्ज सादर करता येईल अन्यथा उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज सादर केला तर तो बाद ठरवण्यात येईल.

२. तलाठी भरती 2023 MS-CIT Compulsory नाही परंतु नियुक्तीनंतर दोन वर्षात देणे आवश्यक आहे.

  1. संगणकावर (Computer based) होणारी ही परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात आयोजित केली जाणार आहे.त्यामुळे प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत. सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिका स्वरूप व त्याची काठीण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण(normalization) करण्याचे पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. Normalisation बाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे.सर्व परीक्षार्थींना यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षा यांनी नोंद घ्यावी.

४. तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये 200 गुणांसाठी १०० प्रश्न असतील चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग negative marking नसते.

५. गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांचे किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

परीक्षेचा अभ्यासक्रम :-

अ.क्र. पदाचे नाव मराठी

 

इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी/अंकगणित एकूण गुण

 

             
    प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण
. तलाठी  २५ ५० २५ ५० २५ ५० २५ ५० १०० २००

 

परीक्षा कालावधी :- २ तास (१२० मिनिटे)

 

 

Talathi Bharti 2023

 आवश्यक कागदपत्रे संलग्न Upload करणे :-

अ.क्र. प्रमाणपत्र /कागदपत्र अ.क्र. प्रमाणपत्र /कागदपत्र
 

 

१. अर्जातील नावाचा पुरावा एस. एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता १०. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
२. वयाचा पुरावा ११. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
३. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा १२. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
४. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा १३. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
५. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा १४. S.S.C नावात बदल झाल्याचा पुरावा
६. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र १५. अराखीव महिला, मागासवर्गीय,आ.दु.व. खेळाडू, दिव्यांग,माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
७. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा १६. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
८. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा १७. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
९. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा १८. अनुभव प्रमाणपत्र

 

वेतनश्रेणी :

१.जॉइनिंग वेळी पहिले वेतन- बेसिक वेतन असेल २५५००+ वेतन असेल ३४५००+

२. रिटायरमेंट वेळेचे वेतन (कोणतेच प्रमोशन न घेता) बेसिक वेतन असेल ८१,१०० तर एकूण वेतन १,२५,०००+  असेल.

तलाठी भरती 2023 या जाहिरातीसाठी अधिक माहितीसाठी खालील pdf पहा.

 मागील TCS मार्फत तलाठी भरतीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका PYQ ( Previous year question paper) :-

 तलाठी भरतीसाठी वाचावयाची संदर्भ पुस्तके Talathi Booklist :-

  • मराठी व्याकरण – मो.रा. वाळिंबे / बाळासाहेब शिंदे
  • इंग्रजी व्याकरण – पाल & सुरी /बाळासाहेब शिंदे/कोणत्याही क्लास नोट्स
  • बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित – सचिन ढवळे सरांचे पुस्तक किंवा कोणतेही एक basic book
  • सामान्य ज्ञान – विषयानुसार MPSC ची बुक लिस्ट
  • चालू घडामोडी – पृथ्वी परिक्रमा किंवा कोणतेही एक वार्षिक बुक Year book,(simplified or अभिनव प्रकाशन)

Talathi Bharti 2023                   

 

तलाठी पदभरती -2023

तलाठी पदभरती -2023 (1)

3 thoughts on “Talathi Bharti 2023”

Leave a comment