Stress

Stress

तणाव

 

आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये Stress, टेन्शन ,तणाव असे शब्द सातत्याने आपल्या कानावरती पडत असतात किंवा आपण नकळत त्या अनुभवातून आपण जात असतो.काही प्रमाणामध्ये ताण हा मनुष्य जीवनामध्ये फायद्याचाही असतो .परंतु हा ताण प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात वाढल्यास त्याचा परिणाम शरीरावरती व मनावरती होत असतो.उदाहरणार्थ परीक्षेत चांगले यश मिळवायचे असेल तर काही प्रमाणामध्ये ताण घेऊन अभ्यास चांगल्या पद्धतीने करावा लागेल.पण तोच ताण जास्त प्रमाणात घेतला तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.

ताण म्हणजे मनुष्य जीवनातील दैनंदिन दडपणाची किंवा दबावची सामान्य प्रतिक्रिया असते .परंतु जेव्हा तुमच्या दैनंदिन कामकाजात बिघाड होऊन शरीर व मन अस्वस्थ होऊ लागते. यामध्ये शरीराच्या जवळ जवळ प्रत्येक प्रणालीवर बदल होतो .त्याचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यवर्ती होत असतो. आधुनिक काळामध्ये ताण तणाव ही खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणेही दिवसेन दिवस वाढतच चाललीआहे.यामध्ये अगदी छोट्या मुलापासून ते वयस्कर माणसांपर्यंत Stress, टेन्शन ,तणाव समस्या जाणवत आहे.

वास्तविक पाहायला गेले तर विज्ञान  युगात मनुष्य जीवन सुखकर व आनंदी  होण्यासाठी खूप सार्‍या गोष्टी उपलब्ध  आहे परंतु त्याचा आपणास चांगल्या पद्धतीने आनंद ही उपभोगू शकत नाही. ही सध्याची वास्तविक परिस्थिती आहे.ताणतणावामुळे निद्रानाशा सारखी मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी जगभरामध्ये अब्जाधीश डॉलरच्या निद्रानाशाच्या गोळ्या विकल्या जात आहेत.निद्रानाशामुळे अनेक लोक त्रस्त आहेत.आधुनिक वैदिक शास्त्रामध्ये जे ताण-तणावरती औषध उपचार केले जातात त्याने आजाराचे समूळ नष्ट होत नाही परंतु त्याचे काही प्रमाणामध्ये दुष्परिणाम ही दिसून येतात.ताण तणाव वाढण्याची खूप सारी कारणे आहेत.

 तणाव व्याख्या मानसशास्त्र:  stress definition psychology:

 • वैयक्तिक कुवती पेक्षा जास्त अपेक्षा ,संघर्ष व तणाव निर्माण करणारी परिस्थिती म्हणजेच ताण होय म्हणजेच समृद्ध व यशस्वी होण्यासाठी
  व्यक्तीला जी किंमत मोजावी लागते तिला Stress असे म्हणतात.
 • एखाद्या पदार्थाच्या स्वरूपात बदल घडवून आणण्यासाठी ज्या बाह्यशक्तीचा वापर करावा लागतो ,त्यामुळे त्यावेळी त्या बाह्यशक्तीला
  विरोध करणारी आंतरिक शक्ती त्या वस्तूत निर्माण होते त्यालाच आपण ताण किंवा Stress असे म्हणतो.

 

तणाव म्हणजे काय?  What is stress?

ताण तणाव हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आपल्यावर जी संकटे येतात त्यांच्याशी आपण जो संघर्ष करतो परंतु ज्यावेळेस ती परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जात आहे असे आपल्याला वाटते त्यावेळेस आपल्याला टेन्शन किंवा ताण आल्याची जाणवते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये शारीरिक व मानसीक बदल होत असतात.

Stress

ताण तणावाची कारणे?  What causes stress?

types of stress:

नैसर्गिक व अनैसर्गिक असे प्रमुख दोन कारणे आहेत.

नैसर्गिक:

दुष्काळ, महापूर ,वादळे ,भूकंप यासारखे

अनैसर्गिक:

 • बदललेली जीवनशैली
 • बदललेले कामाचे स्वरूप
 • अनियमित आहार व निद्रा
 • सामाजिक व कार्यालयीन काम यांचा दबाव
 • व्यायामाचा अभाव
 • वैयक्तिक समस्या
 • आर्थिक समस्या
 • बेरोजगारी
 • एकटेपण
 • आजूबाजूचे वातावरण
 • कौटुंबिक समस्या
 • मी व माझे अशा फक्त स्वतःपुरतेच पाहण्याच्या भूमिकेमुळे विभक्त कुटुंब पद्धती होत आहेत व त्यामुळे नात्यांमध्ये असलेला दुरावा वाढत चाललेला आहे त्यामुळे सुद्धा मानसी ताण तणाव वाढत जात आहे.
  अशी विविध कारणे आहेत.

.

तीव्र ताण लक्षणे:chronic stress symptoms: 

शारीरिक लक्षणे:
 • आपल्या श्वासाची व हृदयाची गती वाढते .
 • श्वासावरती नियंत्रण राहत नाही.
 • बद्धकोष्ठता किंवा पचनक्रियेच्या समस्या निर्माण होतात.
 • छातीत दुखणे किंवा हृदयाची धडधड वाढणे.
 • शरीरामध्ये अशक्तपणा जाणवणे व शांत झोप न लागणे.
 • उच्च रक्तदाब निर्माण होतो.
 • शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते.
मानसिक व भावनिक लक्षणे:

psychological,emotionalsymptoms of stress

 • मनामध्ये सातत्याने नकारात्मक विचार येणे.
 • शरीराने किंवा मनाने सातत्याने दुःखद भावना निर्माण होणे.
 •  रागावर ती नियंत्रण राहणे.
 • व्यसनांना बळी पडणे.
 • अति औषधांचा वापर करणे.
 • आहाराची दिनचर्या व्यवस्थित नसते कधी जास्त खाणे किंवा कधी काहीच न खाणे.

  तणावाचा सामना करणे:  coping with stress:

 • StressStress
 • दिनचर्या बनवा.
 • जीवनामध्ये निश्चित एक ध्येय ठरवावे व त्या दिशेने दररोज काहीतरी प्रयत्न करावेत.
 • सकाळी लवकर उठणे व लवकर झोपणे.
 • सकाळी उठल्यानंतर चालणे,दोरीच्या उड्या,सायकलिंग करणे,व पोहणे या गोष्टींचा समावेश करा.
 • योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यासारख्या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करावा.
 • मन प्रसन्न करण्यासाठी एखादा छंद जोपासा.
 • काही वेळ ओमकार जप करा.
 • सकारात्मक व मनोधैर्य वाढवणारे वाचन व मनन करा.
 • दीर्घकाल श्वासाचा अभ्यास करा.
 • जे लोक तुम्हाला शांत ठेवण्यास किंवा भावनिक आधार देण्यास मदत करतात अशा लोकांच्या संपर्क रहा.
 • तणावा वरती थेट उपाय करता येत नसला तरीपण ज्या समस्या आहे त्यांवर ती छोटी छोटी उपाय करावे
  उदाहरणार्थ निद्रानाश भीती नैराश्य व पोटासंबंधी काही व्याधी त्यांवरती उपचार करावे.
 • समुपदेश ज्या गोष्टींमुळे ताण तणाव वाढला असेल त्या विषयासंबंधी समुपदेशन  घेऊन काही प्रमाणामध्ये
  तणाव कमी करण्यास व मनोधैर्य वाढवण्यास मदत होईल.
 • ज्या गोष्टींमुळे आत्मविश्वास व मन धैर्य वाढेल अशा गोष्टी जोपासण्यास सुरुवात करावी.

 

 निष्कर्ष:

धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे झाले आहे. जीवन जगत असताना किती मोठी समस्या आली तरी घाबरून जाऊ नका. योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या.खरोखर जीवन हे खूप अनमोल आहे . त्यामुळे निसर्गतः मिळालेली जीवन आपण अगदी आनंदाने जगूयात आणि कितीही मोठी समस्या असली तरी त्यावरती प्रयत्नाने नक्कीच मात करू.

 

4 thoughts on “Stress”

Leave a comment