selfie-with-ashadhivari-youth-2023

Selfie-with-Ashadhivari-youth

 

‘सेल्फी विथ वारी’–तरुणाईलाही हवीशी वाटणारी…!

 

‘जेव्हा न्हवते चराचर तेव्हा होते पंढरपूर’ अभंगाप्रमाणे पंढरपूरचा

Selfie-with-Ashadhivari-youth’तरुणाईलाही हवीशी वाटणारी…!

selfie-with-ashadhivari-youth-2023

‘जेव्हा न्हवते चराचर तेव्हा होते पंढरपूर’ अभंगाप्रमाणे पंढरपूरचा पडला. विठुरायाची ओढ लागलेले अनेक भक्त वारकरी यात सामील झाले होते त्यात तरुणाईचा ही खास करून समावेश होता.

पण आता प्रश्न असा पुढे उभा राहतो की…खरंच तरुणाईलाही विठ्ठल आणि आणि त्याच्या ओढीने वेड लावले का…? की नुसती ‘सेल्फी विथ वारी’ पोस्ट टाकण्यापुरतेच वारीची ओळख त्यांच्या पुरती मर्यादित राहिली? सध्याच्या या शहरी दुनियाच्या झगमगाठ ची अधिक सवय असलेल्या आणि सध्याच्या या धावपळीच्या युगातील प्रचंड स्पर्धेत सतत धावत असणाऱ्या तरुणांना या वारीचा अस्तित्व खरच जाणवतं का?

त्यांना वारी त्यांच्या आधुनिक जीवनशैलीतील फोटो, सोशल मीडियावर चे पोस्ट,त्या पोस्टला मिळणारे लाईक्स likes, फॉलोवर्स followers ,Views याही पलीकडेही त्यांना वारीचे आध्यात्मिक अस्तित्व खरच माहिती का? मुळातच वारीला त्यांच्या जीवनात खरंच काही स्थान आहे का? तर ते आज आपण जाणून घेऊयात.

 

तरुणाईच्या दृष्टिकोनातील आधुनिक कि अध्यात्मिक वारी…?

selfie-with-ashadhivari-youth-2023 selfie-with-ashadhivari-youth-2023

Selfie-with-Ashadhivari-youth महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या वारीने आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्रसिद्धी मिळवली. पण आपल्या देशातल्या, राज्यातल्या, गावातल्या तरुण पिढीपर्यंत ती पोहोचली का…? हा प्रश्न नेहमी विचारला जातो. सध्या एकत्र कुटुंबापासून वंचित असणारे आणि विभक्त कुटुंबामध्ये वाढलेली ही सध्याची तरुण पिढी मोबाईल,आधुनिक उपकरणे, आणि गॅजेटच्या विश्वात खूपच रममान झाली आहे. किंवा एका खोलीत बसून ते त्यांच्याच विश्वात मग्न आणि आनंदी आहे.

तसेच हि तरुण पिढी पिझ्झा आणि बर्गरमय झाली आहे.मग आपली संस्कृती त्यांना समजेल का? असं तरुणाईचं नकारात्मक वर्णन अनेकदा तरुणाईवर सहजपणे लादले जाते. पण खरंच मूळची सध्याची परिस्थिती अशी आहे का? तर नाही अगदी अशी बिलकुलच नाही. हे कशावरून आपण ठामपणे सांगू शकतो ते पुढे वाचूयात.

selfie-with-ashadhivari-youth-2023

Selfie-with-Ashadhivari-youth सध्या काही प्रमाणात अनेक तरुण आणि तरुणी आपली संस्कृती अभ्यासात आहेत. त्यांना आपली संस्कृती आणि तिचे अध्यात्म जाणून घ्यायचा त्यांच्यात उत्साह वाढला आहे. तसेच ते प्रचंड प्रमाणात वारीमध्ये सहभागी सुद्धा होत आहेत.हे यंदा याच वर्षी पाहायला मिळाले. पण ते कशासाठी सहभागी होत आहेत..? फोटो काढण्यापुरते…? की सेल्फी काढण्यापुरते…? का समाज माध्यमांवर ते टाकणं…? हा उद्देश तो ठेवून काहीजण येत असतील खरे पण याही पलीकडे वारीचा विलक्षण अनुभव घेण्याची इच्छा अनेकांची होती. हे अनेक लोक वारीमध्ये स्वतःच देहभान हरपून कसे सहभागी होतात…? इतके अंतर हे पायी कसे चालत असतील…? त्यांना थकवा येत नाही का…?

त्यांचे इतके अंतर चालून पाय दुखत नाहीत का…? असे अनेक विविध प्रकारचे नानाविध चे प्रश्न मनात घेऊन तरुण वारी मध्ये सहभागी झाले होते. खूप तरुण वारीला आध्यात्मिक दृष्टीने पाहण्याची इच्छा मनी बाळगून असतात.

मग हि तरुण पिढी वारीत एकत्रितपणे घोळक्याने चालत राहणे…किंवा एकट्यानं…मग मुखाने अभंग म्हणत… वा हात उंचावत ‘सेल्फी’ घ्या असं जरी म्हणत असले तरी प्रत्येकाला येणारी अनुभूती ही एकत्र बांधून ठेवणारी असते. आषाढी वारीत अभंगाच्या तालावर नाचणाऱ्या पावलांचा ठेका, टाळ मृदुंगाची सूर सोशल मीडियावरून लाईव्ह त्याचे दर्शन या तरुणांमुळे नक्कीच झाले.

त्यांच्या जीवनात अडकून पडलेली ही तरुणाई वर्षभर कुठल्या ना कुठल्या शिक्षणात त्यांच्या व्यापात किंवा नोकरी धंद्यात असते.पण वारी आली कि ती त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघते. पण हे वारीत आलेले तरुण फक्त सेल्फीच काढण्यासाठी येतात असा ओरडा दुसऱ्या बाजूकडे चालू असतो. पण सेल्फी काढण्यासाठी का होईना हा वारीचा अद्भुत अनुभव ते ज्या लोकांना पाहायला मिळत नाही त्यांच्यापर्यंत ‘डिजिटल वारी’  अनेकांपर्यंत पोहोचवतात.

कोणी बातमी दाखवण्यासाठी मायक घेऊन वारी चालते तर कोणी वारीचा रिंगण सोहळा उंचावरून कॅमेर्यात टिपण्यासाठी ड्रोन उडवतोय. पण याही पलीकडे डोक्यावरची तुळस, गळ्यात असणारा टाळ, आणि मुखी असणारे विठ्ठलाचे नाव वारकरी समानतेचा संदेश वारीतून देत असतो. कदाचित ह्यानेच आजच्या तरुण पिढीला वारीचे वेड लावले  असेल. ही पाय वारी समानतेचा संदेश तर देते पण माणुसकीचे धडे ही देते कारण या वारी मार्गावर वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक तरुण हात पुढे आले.

प्रत्यक्ष वारीत सहभागी होण्याचा आनंद न घेऊ शकणारी कदाचित सेवेतून आनंद मिळवतात.ते सेवेसाठी देखील आज खूप तरुण पुढे येताना दिसत आहेत. कोण अन्नदान करते…. तर कोण वस्त्रदान करते… तर कोण पाणी दान करते… तर कोणी आरोग्य सेवा पुरवते. म्हणूनच आपण जो दृष्टिकोन ठेवून तरुण पिढीकडे पाहतो तशी ती मुळातच नाहीये. यावरून तर आपल्याला हे नक्कीच पटलं असेल !!!

selfie-with-ashadhivari-youth-2023

selfie-with-ashadhivari-youth-2023

selfie-with-ashadhivari-youth-2023

selfie-with-ashadhivari-youth-2023

वारीचे महात्म्य परदेशातही…?

Selfie-with-Aashadhivari-youth वारी म्हणजे नक्की काय?वारी…यात्राच म्हणावी…शेकडो वर्षांची परंपरा ! वारी हा जीवनाला पूर्णत्व देणारा विसावा. पायी वारीचा सोहळा म्हणजे एक लष्करी शिस्त आणि व्यवस्थापन शास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण. अक्षरशः परदेशातील अभ्यासक व संशोधक यावर संशोधन करत आहेत इतकेच पंढरीचे आणि वारीचे महात्म्य आघात आहे.

परमात्मा पांडुरंग ला मानणारा तो वारकरी.

पाय आषाढी वारी इतिहास काय सांगतो?

असं म्हणतात की, तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडले आहेत. संतश्रेष्ठ माऊलींच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.तसेच ज्ञानदेवांनी भागवत धर्माचे पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले.हेच व्यापक स्वरूप जपत पुढे संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई ,संत कान्होपात्रा यासारख्या संतांनी वारीचे परंपरा पुढे चालू ठेवली. संत तुकाराम महाराज त्यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा अखंड होती. संत

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला गुरु हैबतराव आणि शितोळे सरदार यांनी लष्करी शिस्त आणि लवाजमा देऊन पालखी सोहळ्याची बीजे रोवली.या वारीसाठी कोणतेही आमंत्रण नाही सांगावा नाही ज्या त्या संतांचे पालखी ठरलेल्या तिथीनुसार पंढरपूर प्रस्थान ठेवते.

दरवर्षी या वारीत हे सुरकुतलेले चेहरे,आपले पदर सावरत, पटपट चालणाऱ्या बाया,…. आपली तान्हुली मुलं…घेऊन ही अफाट गर्दी ! या गर्दीला चेहरा नसतो म्हणतात पण या गर्दीला एक वेगळेच भक्तीचं स्वरूप असतं. काय वेडीमाणसं आहेत का वो ही इतका लांबचा प्रवास चालत पार पाडण्याचा वेड असणारी ? असा प्रश्न एरवी या प्रॅक्टिकल जीवनात जगणाऱ्या आणि आधुनिक विचारसरणीच्या असणाऱ्या लोकांना नक्कीच पडत असेल.

एकमेकांना जवळकीने, आपुलकीने,प्रेमाने ‘माऊली’ म्हणत व अनेक अभंग, ओवी गात पुढे जाणाऱ्या कोणाच्याही पायावर चटकन डोकं ठेवावं,जवळ घ्यावं अशी अनामिक जवळीक या वारी मध्ये जाणवते. त्यामुळे विठ्ठल हा अधिकच हृदयाच्या जवळ वाटला.

आयुष्य अशाश्वत आहे पण वारीही शाश्वत आहे. कारण कुठे जातोय हे माहित असल्यानं तिथं जाण्याचा आनंद वाढत असतो. वारीसह पंढरीच्या माहेरी पोहोचेपर्यंत प्रत्येक वारकरी विठ्ठल होऊन जात असतो. इथे कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत तरी ही वारी सर्व बंधनातून मुक्त करणा्री असते.मग ते बंधन संसाराचे का असेना. आणि ना भौतिक सुखाचे.

‘हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा साद घालत भाविक समाधानाने घरी परततो. व पुन्हा पुन्हा भेटीचे ओढ लावणारा हा निस्वार्थ आनंद आणि हा वेगळाच प्रकारचा अनुभव घेऊन एका ना दुसऱ्याला सांगावं आणि दुसऱ्यांना तिसऱ्याला सांगावं अशा या त्यांच्या अनुभवाने प्रेरीत होऊन आणखी कोणीतरी नव्याने वारीत सहभागी होत असतं हे आपण आजूबाजूला पाहतो. अशीच ही वारी अखंड ‘तरुण’ होत रहावी अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना !!!

2 thoughts on “selfie-with-ashadhivari-youth-2023”

Leave a comment