PCOD/PCOS

PCOD/PCOS

 

मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा PCOD/PCOS ने वैतागलेल्या आहात का? तर मग नक्कीच वाचा.

PCOD/PCOS
pcod

 

 

निसर्ग नियमाप्रमाणे,दोन वेळेस व्यवस्थित भूक लागणे व एक वेळ पोट साफ होणे आणि रात्री शांत झोप लागणे हे आपलं शरीर आरोग्यदायी आहे असं समजावं तसेच स्त्रीच्या शरीरामध्ये अजून एक चक्र चालतं ते म्हणजे मासिक पाळीचे नैसर्गिक चक्र.

पाळी मध्ये प्रचंड अनियमितता येणे महिन्यां महिने पाळी अडलेली असणे.Bleeding कमी होणे व तसेच शरीराची स्थूलता वाढत जाणे ही सर्व लक्षणे प्रामुख्याने असणारा आजार म्हणजे PCOD/PCOS  pcod full form(Polycystic ovarian disease or Polycystic ovarian syndrome).

आजकाल हा आजार वाढताना दिसत आहे शक्यतो जास्त करून मुलींमध्ये दिसत आहे. आपली पणजी,आजी आणि आई यांना तर या आजाराचे मूळ शक्यतो माहित सुद्धा नसेल. तर त्या बोलतील हा काय नवीन आजार आहेPCOD/PCOS ?

दोन ते तीन दशकांमध्ये हा आजार वाढत आहे तर त्याचे कारण काय तर स्त्रियांची बदललेली जीवनशैली. पूर्वीचा काळ जर डोळ्यासमोर आणला तर चुलीसमोर बसून स्वयंपाक करणे,आडातील पाणी काढणे जात्यावर दळणे, खाली वाकून अंगण शेणाने सारवणे व तसेच लोटणे. मुलींनो हे तुम्हांला ऐकायला सोपं वाटत असेल ना? तर ते बिलकुल नाही कारण जात्यावर धान्यं दळताना किती जोर लावावा लागतो तसेच आडातील पाणी काढणे हा सुद्धा एक मोठा व्यायामाचा प्रकारच आहे जो आपल्या आजी आणि आईला चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणूनच त्यांना PCOD हा आजार माहित नाही.

पण आत्ताच आधुनिक काळातील कामाचं हे स्वरूप बदललेलं आहे जसं की किचन ओट्यापाशी उभे राहून काम करणे, जास्त खाली न वाकता झाडणे MOP/Wiper ने फरशी पुसणे, व तसेच खाली मांडी घालून न बसता डायनिंग टेबलवर जेवायला बसणे. करियर आणि शिक्षण याच्या मागे धावता धावता स्त्रिया खाली वाकून काम करायचं विसरून गेल्या आहेत. ज्यामुळे स्त्रीच्या शरीरामध्ये अशा प्रकारे ओटी पोटावर जो भार पडायला पाहिजे तो पडत नाही. स्त्रियांच्या ओटीपोटाचा व्यायाम होणे फार गरजेचं असतं याचं कारण म्हणजे या ओटीपोटामध्ये दोन महत्त्वपूर्ण अवयव असतात जे स्त्रीचे स्त्रीत्व टिकवून ठेवतात. एक म्हणजे गर्भपिशवी आणि दुसरा म्हणजे बीजांडकोश यालाच आजच्या भाषेत ovaries असं म्हणतात.मग PCOD/PCOS मध्ये म्हणजे नेमकं काय होतं त्याच्या आधी आपण जाणून घेऊयात Normal पाळी येणे म्हणजे काय ?

 

PCOD/PCOS
pcod
PCOD/PCOS
pcod

 

स्त्रीच्या शरीरामध्ये ओटी पोटाच्या आत मध्ये एक गर्भ पिशवी असते आणि दोन Ovaries (बीजांडकोश) असतात. बीजांडकोशा मध्ये अनेक सारे कोश असतात आणि त्या कोशांमधील एक कोश एका महिन्याला वाढत असतो आणि त्या कोशामधून एक स्त्रीबीज(egg) बाहेर येत असतं त्याला Ovulation असं म्हणतात जेव्हा हे स्त्रीबीज महिन्याच्या महिन्याला बाहेर येते तेव्हा जर गर्भधारणा झाली तर गर्भ राहतो आणि नाही झाली तर पाळी येत असते .म्हणजेच महिन्याच्या महिन्याला एक कोश वाढणं Follicle वाढणं आणि त्यातून एक स्त्रीबीज बाहेर पडणं म्हणजेच Ovulation होणं.असं जर झालं तरच नियमित पाळी येते.

PCOD/PCOS PCOD/PCOS

 

 

 

आता एकाच वेळेस बीजांडातील कोश वाढायला लागतात परंतु त्यामधला एकही कोश पूर्ण वाढत नाही आणि त्याच्यातून स्त्रीबीज बाहेर पडत नाही अशा प्रकारे वाढलेले कोश असतात किंवा Follicles असतात त्यांचेच रूपांतर गाठींमध्ये होतं आणि या गाठींना म्हणतात Cyst.अशा प्रकारे अनेक गाठी तयार झालेले आपल्याला दिसतात त्याच्यामुळे या आजाराला म्हणतात Poly आणि Cystic म्हणजे गाठी आणि Ovaries चा आजार.

आता पुढचा प्रश्न येतो की अशा प्रकारे गाठी निर्माण होतातच का त्याच कारण आहे. स्त्रियांच्या धावपळीच्या युगातील बदलत्या जीवनशैलीत असलेला अनियमित आहार व झोपेमध्ये असणारा अनियमितपणा,ताण तणाव. व्यायामाचा अभाव. व तसेच Harmonal imbalance. मग आता harmonal imbalance कारण काय आहे तर तुम्ही Medical Science & Gynaecologist चं पुस्तक उघडून बघितलं तर त्यामध्ये सुद्धा हेच सांगितले Due to stress and change in lifestyle.

तर हे हार्मोन कोणते?

 • Estradiol harmone ची पातळी वाढणे.
 • FSH/LH ची पातळी कमी होणे
 • Prolactin ची पातळी वाढणे.
 • Insulin वाढणे
 • Testesteron / Androgen हार्मोनचे प्रमाण वाढते की ज्यामुळे चेहऱ्यावरती केसांची वाढ होते.

या हार्मोन्सच्या असंतुलनाचा (Harmonal imbalance) PCOD वरती परिणाम होतो.

PCOD/PCOS ची लक्षणे काय?

 • पाळी अनियमित येणे व Bleeding कमी प्रमाणात होणे.
 • शरीराचा स्थूलपणा वाढणे.
 • भूक न लागणे
 • पोटात सतत दुखणे.
 • चेहऱ्यावरती लव (hair) वाढू लागतात.
 • केस गळती व केस पातळ होतात.
 • स्त्रियांमध्ये अबोलपणा वाढतो तसेच चिडचिडेपणा पण वाढतो.
 • स्त्रियांमधील आळशीपणा वाढतो व सतत अनुत्साही असतात.
 • स्त्रियांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो.

   १०.विनाकारण भावनिक ही मानसिकता वाटणे व रडू येणे.

११.सतत नैराश्यग्रस्त असतात.

PCOD/PCOS साठी उपाय कोणते? pcod problem treatment

या आजाराला आयुर्वेदिक उपचार आहेत का? तर हो आहेत. आयुर्वेदानुसार PCOD पासून स्त्रियांना व मुलींना मुक्ती मिळण्यासाठी त्रिसूत्री वापरावे लागतात तर ते त्रिसूत्री कोणती ते आपण पाहूयात.

 • आहार
 • विहार (जीवनशैलीतील बदल आणि व्यायाम)
 • औषध

हा आजार म्हणजे किरकोळ सर्दी खोकला सारखा आजार नाही म्हणून तुम्ही याला गांभीर्याने घेतलं पाहिजे याचे पुढे जाऊन भविष्यात होणारे परिणाम तुम्हाला माहित आहेत का? या आजारामुळे भविष्यात स्त्रियांना मधुमेह,हृदयाशी संबंधित आजार,उच्च रक्तदाब ,चरबीच्या संबंधित आजार,गर्भाशयाचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर ,वंध्यत्व (लग्न झाल्यानंतर मुल न होणे).

आहारामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात :-

 • जास्त करून तरुण मुलींसाठी पॅकेज फुड व जंक पुढे टाळावेत.
 • मैदा व तळलेले पदार्थ खाऊ नये.
 • वांगी,बटाटा,चिवडा व फरसाणा इत्यादी असे जे पदार्थ वात वाढवणारे आहेत ते टाळावेत.
 • शरीरात उष्णता निर्माण करणारे मसाले पदार्थ टाळावेत.

मग आहारात काय घ्यावे?

 • शुद्ध,सात्विक व घरी गरम गरम बनवलेले जेवण घ्यावे.
 • वरणभात व तूप.
 • फळ (पपई गाजर अंजीर नारळ) आणि फळभाज्या (भेंडी,पडवळ,दोडका, दुधी भोपळा,ढोबळी मिरची, कारलं)
 • वेगवेगळ्या भाज्यांच्या कोशिंबीर.
 • हिरव्या पालेभाज्या.
 • ताक तसेच आवळ्याच्या ज्युसचा आहारात समावेश करावा.

विहार म्हणजे काय?

रात्री लवकर झोपणे व सकाळी लवकर उठणे. दुपारचे झोपणे टाळणे. विहारामध्ये अजून एक गोष्ट येते ती म्हणजे व्यायाम.

आत्ताच्या आधुनिक काळातील किशोरवयीन तरुण मुली घरगुती काम करणे टाळतात. व तसेच आधुनिक उपकरणे म्हणजेच मोबाईल यांमुळे त्या एका जागेवर बसून राहतात व या जास्त वापराचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. म्हणून मुलींच्या आईंना कळकळीची विनंती अशी कि आपल्या मुलीला करिअर, शिक्षण आहे सगळं मान्य आहे परंतु घरातलं खाली बसून घर झाडणं आणि खाली बसून फरशी पुसणे हे काम त्यांना रोज करायला लावा. त्यांच्या ओटी पोटावर योग्य तो भार पडेल. त्यांच्या Ovaries व गर्भपिशवीचं कार्य सुधारेल. कारण की हेच वय असतं त्या अवयवांमध्ये बदल सुरू होतात. परंतु आता जास्त मुलींना किंवा स्त्रियांना कुठल्या कारणाने कामासाठी वेळ नसतो.त्यांच्यासाठी मात्र अतिशय महत्त्वाचा व्यायाम किंवा योगासने कोणती?

 • सूर्यनमस्कार
 • हलासन
 • Butterfly exercise

तसेच या आजारासाठी तीन उपयुक्त प्राणायाम कोणते?

.सूर्यभेदी

.अनुलोम विलोम

.कपालभाती

औषध उपचार काय? PCOD/PCOS problem treatment?

शक्यतो आपण किरकोळ आजारांचे उपचार जसे कि ताप सर्दी खोकला हे घरगुती करू शकतो.पण या आजाराचा उपचार शक्यतो करून तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावेत. सोनोग्राफी करून निदान करावे.यासाठी घरगुती औषधी उपचार करू नयेत.

 

 

2 thoughts on “PCOD/PCOS”

Leave a comment