Oily food

Oily food

स्वयंपाकासाठी घरामध्ये सरास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे तेल / Oily food  होय. बरेचसे पदार्थ बनवण्यासाठी तेलाचा उपयोग करावा लागतो. पदार्थ बनवताना तेलाचा उपयोग किती असावा? बाबत आपण बरेच वेळा चर्चा ऐकत असतो. आहारामध्ये जास्त तेलाच्या समावेशामुळे आपल्याला गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होत असतात. आपल्याला जेवणामध्ये नेहमीच चटपटीत व मसाले तर पदार्थ खाण्यास आवडते. पण आपण विचार केला तर हे प्रमाण जास्त असेल तर त्याचा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होत असतो.त्यामुळे शरीरामध्ये जास्त चरबीचे प्रमाण वाढते. जास्त तेलकट व फास्ट फूड यामुळे शरीरामध्ये लठ्ठपणा वाढत जातो. पचनासंबंधीचे आजार वाढतात.

Oily food

 

Effects of oily food:

 लठ्ठपणा:

शरीरामध्ये लठ्ठपणा वाढण्याची प्रमुख दोन कारणे आहेत .पहिले म्हणजे शरीरामध्ये अनहेलदी फॅट जमा होतात आणि दुसरे म्हणजे मेटाबोलिजम संथ होते व तेलकट ,तिखट खाल्ल्याने असे दुष्परिणाम होतात.

त्वचेवर होणारे परिणाम:

तेलकट तिखट आहारामुळे आपली त्वचा तेलकट किंवा ऑयली होते. व आपल्या शरीरामध्ये हार्मोनल असंतुलन होऊ शकते. यामध्ये पिंपल्स च्या समस्या वाढतात. व शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाणही वाढते.

शांत झोप होत नाही:

रात्रीच्या जेवणामध्ये तेलकट किंवा तिखट अशा पदार्थाच्या सेवनामुळे आपल्या पोटामध्ये अपचन गॅस अशा संबंधी व्याधी जाणवतात त्यामुळे आपले शरीर सुस्त होते व शांत पद्धतीने झोप होत नाही.

हार्ट अटॅक:

जास्त तेलकट व फास्ट पुढच्या सेवनामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढते व कॅलेस्टरचे प्रमाणही वाढते रक्तदाब नियंत्रणात राहत नाही. व रक्तवाहिन्या मध्ये ब्लॉकची प्रमाण वाढते. यामुळे हार्ट अटॅक चे प्रमाण वाढते.आपण हे लक्षात ठेवली पाहिजे की जे अन्न घेतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. चांगले ठेवण्यासाठी आपल्याला आहारामध्ये काही प्रमाणामध्ये बदल करायला हवा. त्यामध्ये तेलकट ,जास्त मसालयुक्त पदार्थ ,फास्ट फूड ,जास्त साखर असणारे पदार्थ, त्याचबरोबर मिठाचे प्रमाणही कमी घ्यावे.

पचना संबंधीच्या व्याधी:

आपल्या शरीरामध्ये चरबी किंवा फॅट हे किती प्रमाणात आहेत हे आपल्या आहारामधील तेलकट पदार्थाच्या प्रमाणावरून समजते. तेलाच्या जास्त सेवनामुळे आपल्याला पचनासंबंधीच्या व्याधी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पोट फुगणे पोटदुखी अपचन, आंबट ढेकर येणे, गॅस होणे यांसारख्या समस्या होतात व छातीत जळजळ होणे असा त्रास जाणवतो.

मधुमेह:

तेलकट आहारामुळे मधुमेह वाढण्याचा धोका वाढतो त्यामुळे शरीरामध्ये रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढते अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की तेलकट पदार्थांमुळे टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो त्यामुळे आपला आहार नेहमी संतुलित असायला हवा त्यामध्ये तेलकट चरबीयुक्त किंवा पचनास जड असणारी पदार्थ शक्यतो खाण्याचे टाळावे.

तेलकट जेवणानंतर काय काळजी घ्यावी:

Oily food

कोमट पाणी प्यावे:

तेलकट पदार्थाच्या सेवनानंतर जर कोमट पाणी पिल्यास आपले पचन जलद गतीने होते. व शरीरामधील टाकाऊ घटक बाहेर पडण्यास मदत होते. व शरीर डिटॉक्स होते. व नंतर भरपूर प्रमाणामध्ये पाणीही प्यायला हवे.लिंबू पाणी पिऊ शकता

थंड पदार्थ खाऊ नका:

तेलकट पदार्थ पचवण्यास वेळ लागतो. यानंतर थंड पदार्थ खाल्ले तर आणखी पोट फुगल्यासारखी जाणवते. त्यामुळे पचनक्रियाशी संबंधित व्याधी वाढतात.

जेवणानंतर लगेच झोपू नका:

झोपण्याच्या आधी किमान दोन ते अडीच तास जेवण करायला हवे. जेवणानंतर लगेच झोपल्यावर आपली पचनक्रिया मंदावते व होणारे पचन व्यवस्थित पद्धतीने होत नाही. यामुळे ऍसिडिटी चे प्रमाण ही वाढते.तेलकट पदार्थामुळे आपल्या छातीमध्ये जळजळ होणे असाही त्रास जाणवतो. तेलकट जेवण असो किंवा कोणते जेवण असले तरी पण दररोज जेवणानंतर चालायला हवे.

हलका आहार घ्यावा:

पुढील 24 तासांमध्ये आपल्या आहारामध्ये हलका व पचनास त्रास न होणारा आहार घ्यावा.त्यामुळे पचन  जलद गतीने होईल.

पॅकिंग मधील तेल व घाण्याचे तेल:

रिफाइंड तेल चांगले दिसावे व गंधरहित व्हावे त्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते .त्यामुळे त्यामध्ये असणारे पौष्टिक घटक संपुष्टात येतात. त्यामुळे रिफाइंड तेलापेक्षा घाण्याचे तेल हे आहारामध्ये घ्यावे असे नेहमी आयुर्वेद तज्ञ सल्ला देत असतात.रिफाइंड तेल काढताना त्यामध्ये उष्णता दिली जाते व गाण्याचे तेल काढताना दाब देऊन काढले जाते. यामुळे घाण्याच्या तेलात असणारी पौष्टिक घटक चांगले राहतात आरोग्यासाठी चांगले असते.ज्या तेलावरती कमी प्रक्रिया केलेली असते ते नेहमीच आरोग्यासाठी चांगले असते.पॅकिंग मधील तेल हे दोन वेळेस फिल्टर होती त्यामुळे त्यातील असणारी पौष्टिक घटक ही कमी होत असतात.

घाण्याचे तेल

तेलाचे प्रमाण किती असावे:

तेलाचे प्रमाण हे प्रतिव्यक्तीस साडेसातशे ते साडेआठशे मिली लिटर एवढे प्रमाण एका महिन्यासाठी एका व्यक्तीस साधारणपणे असावे.प्रौढांच्या आहारामध्ये दोन ते तीन टीस्पून तेल असावे त्यामध्ये पुरुष स्त्री हे प्रमाण साधारणपणे सारखेच असते परंतु व्यक्तीच्या प्रकृतीनुसार वेगळे असू शकते.नेहमी आहारामध्ये तेल हे एक प्रकारचे वापरण्यापेक्षा वेगवेगळे वापरावे त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारचे घटक मिळत असतात. उदाहरणार्थ शेंगदाणा तेल ,सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल ,मोहरी तेल ,तिळाचे तेल आणि खोबऱ्याचे तेल.

निष्कर्ष:

कोणतेही तेल हे जास्त प्रमाणामध्ये आरोग्यास नेहमीच घातक असते त्यामुळे आपल्या आहारामध्ये तेलाचे प्रमाणही योग्य ठेवणे आवश्यक आहे. व त्याचबरोबर आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात व्यायाम ,योगा, सायकलींग ,स्विमिंग व विविध प्रकारचे खेळ यांचा समावेश करावा.

 

4 thoughts on “Oily food”

  1. आषाढ महिन्याच्या मुहूर्तावर उत्तम post… 👍🏻

    Reply

Leave a comment