More protein is found in veg food

More protein is found in veg food

Veg पदार्थामध्ये मिळतात जास्त Protein

 

बऱ्याच जणांना असं वाटतं की Non veg पदार्था पेक्षा veg पदार्था मध्ये कमी प्रमाणात protein मिळतात पण तसं नाही. असे बरेच पदार्थ सुद्धा आहेत ज्यामध्ये मुबलक प्रमाणात protein आहे.
आणि हे पदार्थ तुम्ही नियमित पणे खाल्ले तर तुमच्या शरीरातील protein ची कमतरता नक्कीच भरून निघू शकते.
.
हे ‘ veg पदार्थ खा protein ची कमतरता कधीच भासणार नाही.

More protein is found in veg food

1) ग्रीक योगर्ट:

More protein is found in veg food

 दुग्ध जन्य पदार्थ ग्रीक दही हे खूप जाड दही असतं, अतिशय चवदार आणिपोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहे. ग्रीक दही तुम्हाला बाजारात 
सहज उपलब्ध होऊन जाईल .तुम्ही तुमच्या आहारात साध्या दह्या ऐवजी ग्रीक योगर्टचा समावेश करू शकता आपण ह्यामध्ये चवीसाठी 
मीठ अक्रोड व मध सुद्धा वापरू शकता.ग्रीक योगार्टमध्ये दही पेक्षा कमी साखर असते.एक कप ग्रीक योगार्टमध्ये 25 ग्रॅम इतकी प्रथिने
 असतात तर दहीत 15 ग्रॅम प्रथिने असतात. १०० ग्रॅम ग्रीक दहीमध्ये सुमारे १५-२०० मिलीग्राम कॅल्शियम असते.मजबूत हाडे आणि 
दातांसाठी हे आवश्यक आहे.

2) high protein दूध:

More protein is found in veg food

More protein is found in veg food

केवळ कॅल्शियमच नाही तर दुधातही प्रथिने भरपूर प्रमाणात असतात दूध हा उच्च दर्जाचा प्रथिनांचा उत्कृष्ट सोर्स असू शकतो याशिवाय एक ग्लास दुधाला संध्याकाळचा परफेक्ट ब्रेकफास्ट म्हणता येईल ज्यामुळे तुमचं पोट जास्त काळ भरलेलं राहील आणि प्रोटीन प्रोटीन सुद्धा मिळतील.दूध हाडांसाठी चांगले असते.दुधामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणामध्ये मिळतात.हाडे आणि दात मजबुत होतात.

3) नट्स आणि बिया:

More protein is found in veg food

संध्याकाळच्या स्नॅक्स साठी अक्रोड बदाम आणि पिस्ता यांसारखे dryfruits सर्वोत्तम मानले जातात जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हे हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी करण्यास मदत करतात आणि तुमच्यासाठी एक आदर्श नाष्टा देखील आहे बियांमध्ये कॅलरीज जास्त असतात त्यामुळे ते मर्यादित प्रमाणातच घ्यावे

4) पनीर:

More protein is found in veg food

पनीर हा शाकाहारी पदार्थ प्रोटीन्सचा उत्तम सोर्स आहे पनीर मध्ये अनेक पोषक तत्वे असतात जी प्रोटीन ची कमतरता दूर करतात आणि पनीर हे सहज उपलब्ध होणार प्रोटीन सोर्स आहे.पनीरमध्ये भरपूर प्रथिने असतात. ज्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की दररोज पनीर खाणे चांगले असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे.त्यांनी पनीरचा आहारामध्ये समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते.

5) डाळी:

More protein is found in veg food

डाळी हे शहाकारी लोकांसाठी प्रोटीन सुप्रसिद्ध स्त्रोत आहे केवळ प्रोटीनच नाही तर डाळींमध्ये फायबर फोलेट मॅंगनीज लोह फॉस्फरस पोटॅशियम आणि विटामिन बी यांसारखी पोषक आहे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करतात.

6) ओट्स:

More protein is found in veg food

ओट्स हे सहसा निहारी दरम्यान खाल्ले जातात. ओट्स हे प्रोटीनच उत्कृष्ट सोर्स आहे . ओट्स कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स मध्ये समृद्ध आहेत तुम्ही ताजी फळे आणि नट्स यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांसोबत ओट्स सुद्धा खाऊ शकता.ओट्स खाल्ल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा दिवसभर टिकून राहते. ओट्स खाण्यामुळे यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते . कोलेस्ट्रॉल नियंत्रण राहण्यासाठी मदत होते. मधुमेह असल्यास तो नियंत्रण राहण्यास फायदा होतो.

7)राजगिरा:

More protein is found in veg food

आपल्याकडे फार पूर्वीपासून राजगिरा खाल्ला जातो.यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने असतात. विशेष करून उपवासामध्ये राजगिऱ्याचे विविध पदार्थ आपण सेवन करत असतो. उपवासासाठी राजगिरा एक वरदानच म्हणावी लागेल. राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस व पोटॅशियम यासारखी आवश्यक तत्वे राजगिऱ्यामध्ये असतात. राजगिरा हा पचनासाठी ही हलका व पौष्टिक आहे. यापासून लाडू व चक्की पदार्थ जास्त प्रमाणात बनवले जातात. राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी फायदा होतो.

8)सोयाबीन:

सोयाबीन हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. सोयाबीन सहज प्रथिनांची कमतरता पूर्ण करते .याशिवाय सोयाबीनचे दूध, सोया सॉस आणि सोयाबीन पेस्टमध्येही भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. यामुळे आहारात समावेश करणे फायदेशीर आहे .वजन कमी करण्यास मदत होते.हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

9)चणे(हरभरा):

चणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. चणे यामध्ये प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. फक्त चवीपुरते भाजलेले चणे खायला आवडतात. परुंतू चणे फक्त चवीसाठीच नाहीतर ते आपल्या आरोग्यासाठी सुध्दा खूप फायदेशीर आहेत.भाजलेल्या चणामध्ये जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम, फायबरचे आणि लोहचे भरपूर प्रमाणात असते.किंवा  भिजवलेले हरभरे खाण्याचे खूप फायदे आहेत, हे खाल्ल्याने शरीरातील एनर्जी वाढण्यास मदत होते.प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, फायबर, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे आढळतात.

10)बटाटा:

बटाट्यामध्ये प्रोटीन सोबत इतर पोषक तत्वांचा चांगला समावेश आहे एक उकडलेला बटाटा प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट सारख्या महत्त्वपूर्ण पोषकतत्त्वानी समृद्ध आहे.बटाटे खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. पण बटाट्याचे प्रमाणामध्येच सेवन करावे. अन्य़था वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

 

More protein is found in veg food

Leave a comment