International yoga day

International yoga day

 

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी जगभरात 21 जून रोजी साजरा केला जातो.संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 27 सप्टेंबर 2014 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. संयुक्त राष्ट्र महासभेने जवळपास 175 देशांनी त्याला पाठिंबा दर्शवला व 11 डिसेंबर 2014 रोजी जाहीर केली की 21 International yoga day साजरा केला जाईल.21 जून 2015 ला पहिला जागतिक पातळीवरील योग दिन साजरा केला गेला.अलीकडच्या काळामध्ये धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मन शांत करण्यासाठी किंवा मन शांत ठेवण्यासाठी योगाभ्यास उपयोगाचा ठरतोतसेच देशभरात शाळा, महाविद्यालय अशा विविध ठिकाणी योग शिबिराचे आयोजन केले जाते.शाळा  महाविद्यालयांमध्ये उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळत आहे.

1.International yoga day २१ जूनच का?

Yoga day 21 जूनला साजरा करण्याच्या पाठीमागे वैज्ञानिक  कारणे आहेत.

वैज्ञानिक कारण:

21 जून रोजी उत्तरायण  संपून दक्षिणायन सुरू होत असते .त्यामुळे दिवस मोठा व रात्र लहान असते.21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो व सूर्यास्त उशीर होतो .त्यामुळे सायंकाळी जास्त वेळ उजेड असतो.21 जून हा दिवस जगभरामध्ये सर्वात मोठा दिवस असतो.  त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे व हा दिवस म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन होय.यामध्ये सूर्याचे दक्षिणायन सुरू होते त्यामुळे प्रकाश व उष्णता कमी होते व वातावरणात ही बदल होतो
त्यामुळे अनेक रोगांचे आजारांची उगमस्थान असलेली जीव जंतू वाढ होत असते वआजारी पडण्याची प्रमाणी वाढत असते.त्यामुळे या दिवसांमध्ये योग अभ्यास केल्यास त्याचा सकारात्मक असा परिणाम आपल्यावरती होत असतो व परिणामी आपल्याला आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते व इतर जीव जंतू पासून होणाऱ्या रोगांपासून किंवा आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते.

 

2.आंतरराष्ट्रीय योग दिवसाची उद्दिष्टे:

 

1.योगअभ्यासाद्वारे शारीरिक व मानसिक स्वस्थाचा अनुभव करून देणे.
2.योग अभ्यासाच्या माध्यमातून तणावातून बाहेर काढणे.
3.योग अभ्यासामध्ये असणारी अद्भुत व प्राकृतिक ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणे.
4.आपल्या व्यस्त वेळापत्रक मधून आरोग्यासाठी एक दिवस काढून सर्वांसाठी देणे.
5.योगाच्या माध्यमातून लोकांना ध्यान धारणीची सवय लावणे.
6.संपूर्ण जगामध्ये विकास व शांतीचा संदेश पोहोचवणे.
7. सर्वांमध्ये बंधूभावता निर्माण करणे.
8.योगाभ्यासांच्या फायद्याची माहिती सांगून लोकांमध्ये असणारी दुर्धर असे आजार प्रमाण कमी करणे.
9. रोगाला प्रतिबंध करण्यासाठी व निरोगी आयुष्य जगण्यासाठी त्याची गुरुकिल्ली म्हणजेच योगाभ्यास होईल त्यामुळे जीवनामध्ये योगाला महत्त्वाचे स्थान द्यायला हवे.

yoga day
.

 

3.योगाचा इतिहास:

अगदी प्राचीन काळापासून योगशास्त्र चालत आले आहे. प्राचीन भारतीय परंपरेला योग ही लाभलेली मोठी देणगीच आहे.योगाचा उल्लेख वेदांमध्येही आढळतो. परंतु योगा विखुरलेल्या स्थितीत होता. महर्षी पतंजली मुनी त्याला सूत्रबद्ध केले व  पातंजलयोग दर्शन निर्मिती झाली व त्यामध्ये 196 सूत्रे आहेत.भारतात योगाची मुळे शोधली तर साधारण पाच हजार वर्षा पूर्वीपासून प्रचलित आहे. योग म्हणजे जोडणे योग शब्द  हा  युज या संस्कृत शब्दापासून आलेला आहे म्हणजे ज्ञानाच्या जवळ जाण्यासाठी शरीर व मन आणि आत्मा एकमेकांशी जोडले जाणे म्हणजेच योग होय.योगावर चर्चा करत असताना महर्षी पतंजली मुनीनी समाधी पाद पहिल्या सूत्रामध्ये अथयोगअनुशासनम आता आपण योगाभ्यासाला सुरुवात करत आहोत तर अनुशासन म्हणजे स्वयंशिस्त स्वतः स्वतःने पाळायची शिस्त.आपल्याला योग अभ्यास असो किंवा आपली जीवन जगत असताना अनुशासन म्हणजेच स्वयंशिस्त ही खूप महत्त्वाची आहे. त्यावरतीच जीवनातील सर्व गोष्टींचा जनुक काय पायाच आहे. योग हे सांगण्याचे किंवा वाचण्याचे शास्त्र नसून ते जीवन जगण्याचे शास्त्र आहे. म्हणजे जीवनात उतरवण्याची शास्त्र आहे.

4.योगाचे महत्व व फायदे:

प्राचीन संस्कृती पासून भारतामध्ये ऋषीमुनींनी साधुसंतांनी आपल्याला वेळोवेळी योगाभ्यासाची महत्त्व पटवून दिले आहे व त्याचबरोबर ती आपल्या शरीरावरती आणि मनावरती त्याची होणारे फायदे ही सांगितलेली आहेत. आताच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये योगाभ्यास आपल्या सर्वांसाठीच किती उपयुक्त आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.

1.योग तुम्हाला वर्तमान काळात जगायला शिकवतो
2.ताण तणाव कमी होतो व शांत चांगली झोप होते.
3.योगाभ्यासामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
4.योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगल्या पद्धतीने सुधारली जाते त्यामध्ये शरीराचे स्नायू सुद्धा बळकट होतात.
5.दोघांमुळे तुमच्या शरीरावर असणारी अतिरिक्त चरबी कमी होते.
6.योगामुळे तुमची पचनक्रिया खूप चांगल्या पद्धतीने काम करते.

7.आपल्या शरीरामध्ये लवचिकता लवचिकता येईल

8.मन शांत व प्रसन्न होण्यासाठी मदत होईल

9.योगामुळे आपली स्नायू बळकट होतील

 

5.conclusion  निष्कर्ष:

रोगाला प्रतिबंध करण्यासाठी व निरोगी आयुष्य जगण्यासाठीची  गुरुकिल्ली म्हणजेच योगाभ्यास होय.त्यामुळे जीवनामध्ये योगाला महत्त्वाचे स्थान द्यायला हवे.साठी आपण सर्वांनी  International yoga day  या अभियानामध्ये सामील होऊन सर्वांनी त्याचा प्रचार व प्रसार करूया व आपण नियमित योगाभ्यास करूया.