5 Homemade Facepack for Glowing Skin

Homemade Facepack for Glowing Skin

 

 

Homemade  Facepack for Glowing Skin सुंदर आणि नितळ त्वचा प्रत्येकीला हवी असते.त्यामुळे नियमित स्कीन केअर करणं फारच गरजेचं झालं आहे. मात्र त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत पार्लरचा खर्च प्रत्येकीला परवडेलच असे नाही.पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल किंवा पुरेसे पैसेही नसतील तर घरच्या घरी आपण पार्लर सारखं सौंदर्य मिळवू शकतो . प्राचीन काळापासून सौंदर्य खुलवण्यासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठी अनेक घरगुती गोष्टींचा वापर केला जातो. स्वयंपाक घरात अनेक गोष्टी असतात ज्यांचा वापर करून आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो. घरगुती फेस पॅक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि सगळे सामान हे घरातच उपलब्ध असल्यामुळे पैसेही वाचतात. घरी केलेल्या फेस पॅक मध्ये सर्व इन्ग्रेडियंट हे घरातील स्वयंपाक घरातील असल्यामुळे कोणतीही हानी चेहऱ्याला होत नाही.त्यामुळे वस्तू नुकत्याच वयात आलेल्या मुलींपासून ते साठ वर्षांच्या आजी पर्यंत सर्वजण वापरू शकतात.

Homemade Facepack for Glowing Skin बेसन आणि मध 

  • दोन चमचे बेसन
  • अर्धा चमचा हळद

एक चमचा कच्चे दूध / दही

एक चमचा मध

Homemade Facepack for Glowing Skin

हे सर्व पदार्थ एका बाऊलमध्ये घ्यावेत त्यांची चांगली पेस्ट करावी जर पेस्ट घट्ट वाटली तर त्यात आणखीन दूध मिक्स करावे . फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा हा फेसवॉशने स्वच्छ धुवावा.हा फेस पॅक चेहऱ्याला लावावा. वीस मिनिटं लावून ठेवा नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा बेसन आणि दुधामुळे तुमची त्वचा निथळ दिसेल मधामुळे तुमची त्वचा मऊ होईल. आठवड्यातनं एकदा हा फेस पॅक तुम्ही लावू शकता यासाठी लागणारे सर्व साहित्य सहज उपलब्ध होण्यासारखे आहेत.

कॉफी आणि टोमॅटोचा रस 

एक चमचा कॉफी

अर्धा चमचा हळद

दोन चमचे टोमॅटोचा रस

अर्धा चमचा मध

Homemade Facepack for Glowing Skin

 

 

ज्या ज्या मुलींचा चेहरा उन्हामुळे TAN झालेला आहे. त्यांच्यासाठी कॉफी आणि टोमॅटोच्या रसाचा फेसपॅक हा सर्वात उत्तम आहे. वरील सर्व इन्ग्रेडियंट एका बाऊलमध्ये मिक्स करून त्याची चांगली पेस्ट करून घ्या. फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा हा फेसवॉशने स्वच्छ धुवावा. ती पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये वेगळीच चमक जाणवेल आठवड्यातनं किमान एकदा तरी हे फेसपॅक लावायला पाहिजे.

कोरफडीचा गर (AloveraGel)

Homemade Facepack for Glowing Skin

कुठल्याही ऋतूत कोरफडीचा वापर करता येतो. कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात.एक कोरफडचं पान घ्या आतून कोरफडीचा गर काढा. त्याची पेस्ट करा फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा हा फेसवॉशने स्वच्छ धुवावा.ती हलक्या हाताने चेहऱ्याला लावा .पंधरा मिनिटे ती लावून ठेवा नंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन टाका. कोरफड मध्ये अँटिबॅक्टरियल गुणधर्मामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही हे एक उत्तम नैसर्गिक फेसपॅक आहे.

रात्रभर चेहऱ्यावर कोरफड लावून ठेवा. यातील पोषण तत्त्वे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. सर्वप्रथम फेस वॉशने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर कोरफड जेल चेहरा आणि मानेवर लावा.

या दोन्ही पद्धतीने तुम्ही कोरफडचा रस चेहऱ्याला लावू शकता.

मुलतानी माती ( Multani Mitti )

दोन चमचे मुलतानी माती

गुलाब जल

Homemade Facepack for Glowing Skin

मुलतानी माती नुकसानकारक बॅक्टेरिया, त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि धूळ-माती हटवण्यास मदत करतात. नियमितपणे मुलतानी मातीचा वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते. चेहऱ्यावर मुरुमांच्या समस्येवर मुलतानी उत्तम उपाय आहे. तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी मुलतानी माती खूप फायदेशीर आहे. यासाठी एका भांड्यात दोन चमचे मुलतानी माती घ्या. त्यात गुलाबजल टाका. फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा हा फेसवॉशने स्वच्छ धुवावा.काही काळ त्वचेवर फेस पॅक राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा.

चंदन पावडर ( Chandan Powder)

दोन चमचे चंदन पावडर

चिमुटभर हळद

दूध / गुलाबपाणी /पाणी

 

 

फार पूर्वीपासून चंदनाच्या लेपा चा वापर केला जातो. पूर्वी चंदनाचे खोड उगाळून त्याचा लेप त्वचेला लावला जायचा पण आता आयुर्वेदिक  चंदनाची पावडर तयार मिळते.
दोन चमचे चंदन पावडर, चिमूटभर हळद आणि दूध एकत्र करून त्याचा फेस पॅक तयार करून घ्या.फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा हा फेसवॉशने स्वच्छ धुवावा आणि तो फेस पॅक पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावा. पंधरा मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. चंदन पावडर थंड असल्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.हळदीच्या घटकामुळे तुमच्या त्वचेवरील पुरळ पिंपल्स कमी होतात.

 

चेहरा सुंदर चेहरा सुंदर आणि नितळ दिसण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याची देखील गरज आहे. काम आणि धावती जीवनशैली यामुळे बऱ्याचदा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो.सुंदर चेहरा हवi असेल तर पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. शरीर हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, पोषक आहार, सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यसनांपासून दूर राहा .या अगदी छोट्या छोट्या गोष्टी कटाक्षाने पाळल्यास तुमची त्वचा सुंदर आणि फ्रेश दिसेल. त्वचेची निगा राखण्यासाठी स्किन केअर रुटीनCTM Routine स्किन केअर रुटीन In Marathi-दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी? आणि घरगुती फेस चा वापर फेस पॅक चा वापर जरूर करा आम्ही दिलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट द्वारे नक्की आम्हाला कळवा.

 

 

2 thoughts on “5 Homemade Facepack for Glowing Skin”

Leave a comment