Heart attack

Heart attack

२१ व्या दशकातील तरुणाईसाठी थोडंसं महत्त्वाचं !!!

पन्नाशीच्या आत heart attack येण्याच्या प्रमाणात वाढ…?

हो…! अगदी बरोबर ऐकलंत तुम्ही.

मित्रांनो काही वर्षांपूर्वी पन्नाशीच्या आत Heart attack येण्याचे प्रमाण अल्प होते; परंतु आता यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंडियन हार्ट हेल्थ असोसिएशनचा अहवाल तर याबाबत धक्कादायक असून हृदयविकाराचा झटका आलेल्या एकूण लोकांपैकी तब्बल ५०% हे केवळ वयाच्या ५० च्या आधीचे होते असे स्पष्ट झाले आहे. जाणून घेऊयात काय आहे हा अहवाल, इंडियन हार्ट असोसिएशन नुसार ५० पेक्षा कमी वयाच्या नागरिकांनाही जेष्ठ नागरिकांन एवढाच हृदयविकाराचा धोका आहे.तर ४० पेक्षा कमी वयाच्या २५% नागरिकांना हृदयविकाराचा झटका आला होता महत्त्वाचे म्हणजे महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक आहे.सध्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं  कठीण होत आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. परंतु, अशाच दुर्लक्षामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा कळत नाही. कारण केवळ छातीत दुखणं म्हणजे heart attack असू शकतो हे कुणाला खरं वाटत नाही.

1.Reason हार्ट अटॅक का येतो:

शरीरामध्ये हृदय हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. .व हृदयाचा आकार आपल्या आताच्या मुठीच्या बरोबर आहे. हृदय हे छातीच्या डाव्या बाजूला आहे. ते पंपाप्रमाणे काम करते.सातत्याने आकुंचन व प्रसरण पावत असते.त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यातून रक्त प्रवाहित  होत असतो.त्या रक्तप्रवाह मध्ये  जेव्हा खंड पडतो किंवा अगदी कमी प्रमाणात होतो.अशावेळी हृदयविकाराचा झटका येतो.त्यामध्ये रक्तपुरवठा  करणाऱ्या वाहिन्या मध्ये कोलेस्ट्रॉल चरबी पदार्थांचा संचय होतो. त्यामुळे त्या वाहिन्या आकुंचन पावतात. त्यांच्यामध्ये असणारी पोकळी कमी होते त्यामुळे हृदयास होणारा रक्तपुरवठा अगदी अल्पशा प्रमाणात होतो.

2.heart attack symptoms  हृदयविकाराची लक्षणे:

2.1. छातीत दुखणं –

सौम्य वेदना किंवा किंवा छातीवर दाब आल्यासारखे वाटणे,छातीत जळजळ होणे

2.2.  मळमळ –

बऱ्याच वेळा दुसऱ्या कोणत्यातरी कारणाने मळमळ होत आहे असे वाटणे किंवा ऍसिडिटी पित्तासारखा त्रास आहे असे वाटणे त्यामुळे मळमळी कडे दुर्लक्ष होऊ शकते.

2.3. दम लागणे-

सामान्यपणे पेक्षा श्वास घेण्यात जास्त प्रयत्न करावे लागणे

2.4. चक्कर येणं –

अचानक काही काही कारण नसताना  चक्कर येणं

2.5. अस्वस्थता-

विनाकारण खूप भीती वाटणे.

2.6. घाम येणं

जास्त मेहनतीचे काम न करता घाम येणे.

3. हृदयविकराबाबतची भारतातील सद्यस्थिती:

प्रामुख्याने बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहाराच्या पद्धती, कामाचे स्वरूप व मानसिक ताण तणाव  अगदी कमी वयातच हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेली दिसते.भारतात हृदयविकाराचे प्रमाण वाढण्यास मधुमेह कारण ठरत आहे असे संशोधनानंतर स्पष्ट झाले आहे देशातील अठरा वर्षे वयाच्या तब्बल ७ कोटी ७० लाख नागरिकांना मधुमेहाचा विळखा आहे.तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्यपान ही भारतात हृदयविकारास कारण ठरत आहे.विशेष म्हणजे योग्य वेळी या आजाराचे निदान होत नसल्याने झटका येण्याचे प्रमाण भारतात अधिक आहे.आपल्या हृदयाचा पहिला ठोका हा आपल्या आईच्या गर्भात ऐकू आला तो त्याचा प्रवास हा मानवाच्या मृत्यूपर्यंत थांबला. जेव्हा आपण हृदयविकारा बाबत बोलतो तेव्हा फक्त उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि अति लठ्ठपणा आणि अशा खूप काही गोष्टी बोलल्या जातात. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ताणतणाव हे आपण नाकारू शकत नाही कारण अति ताणतणावाने कोर्टिसोल हार्मोनचे शरीरातील वाढते प्रमाण अप्रत्यक्षरीत्या आपल्या शरीरातील उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल रक्तातील साखरेचे प्रमाण यावर परिणाम करते.ताण तणाव ही गोष्ट आता सर्वसामान्य झाली आहे.कारण आता या विळख्यात लहान मुले त्यांच्यातील वाढणारा चिडचिडेपणा आणि तरुण पीढीही अडकले आहेत.

4. सहाय्यक ठरणारी अन्य कारणे

 • हृदयविकारासंबंधी कुटुंबामध्ये अनुवंशिकता असणे.
 • व्यायामाचा व शारीरिक कष्टांचा अभाव असणे.
 • सिगारेट, तंबाखू ,अल्कोहोल यासारखी विविध व्यसने असणे.
 • तेलकट ,चरबीयुक्त, खारट, मैद्याचे, केक व मिठाई यासारखे पदार्थ सातत्याने खाण्यामुळे.
 • जेवणामध्ये तंतुमय पदार्थ किंवा हिरव्या पालेभाज्या खाण्याची सवय नसणे.
 • धावपळीची जीवनशैली शारीरिक व मानसिक ताण तणाव असणे.

5.Pranayama to prevent heart disease 

हृदयाला निरोगी आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी 

योगासने व प्राणायम:

ला तर मग जाणून घेऊयात काही शास्त्रीय अभ्यासानुसार योगा आणि प्राणायाम या काही पद्धतीने आपण आपल्या हृदयाला निरोगी आणि आरोग्यदायी ठेवू शकतो.व ही पद्धत आपल्याला आपला ताण तणाव कमी करण्यासाठी नक्कीच मदत करते.व त्यामुळे हृदयापासून पुरवठा होणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे ४० ते ९० टक्के पर्यंत वाढते. व आपल्या शरीरातील रक्तप्रवाह हा सुरळीत चालतो.

 

5.1.भुजंगासन –

अति लठ्ठपणा कमी करता येतो. पोट व पाठीवरची अतिरिक्त चरबी कमी होते.

5.2.शीर्षासन –

रक्त प्रवाह सुरळीत होतो

5.3.कपालभाती –

शरीरातील विषाणू बाहेर टाकतो. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

5.4. अनुलोम विलोम –

शरीरातील रक्तप्रवाह मध्ये सुधारणा होते.तसेच मानसिक आरोग्य स्वस्थ व तंदुरुस्त राहते.

 

6.हृदयविकार टाळण्यासाठी:

त्या पुढील प्रमाणे :-

 • धूम्रपान व मद्यपान वर्ज्य करावे.
 • तूप,लोणी,चीज इत्यादी तेलकट पदार्थ कमी खावे.
 • अंडी,मटन,मासे(मांसाहार) इत्यादी वर्ज्य करावे.
 • आपल्या आहाराच्या कामाच्या झोपेच्या वेळेत नियमितपणा ठेवावा.
 • खारट पदार्थ,मीठ यांचा मर्यादित वापर करावा.
 • नियमितपणे व्यायाम करा.
 • अती स्पर्धात्मक, ताण तणाव यांनी भरलेले जीवन यांचा निश्चितपणे आरोग्यावर परिणाम होतो म्हणून आनंदी व चिंता रहित जीवन जगण्याचा प्रयत्न करा.