Healthy School Tiffin Ideas for Kids

                   Healthy School Tiffin Ideas for Kids

                    मुलांना शाळेत जाताना डब्बा असा द्यावा

Healthy School Tiffin Ideas for Kids दररोज मुलांना शाळेत जाताना डब्बा हा द्यावा लागतो. त्या डब्यात रोज काय जेवण द्यायचे याचा विचार सर्वच पालक करत असतात. जे मुलांना आवडेल ही आणि ते आवडीने खातील ही,अनेक मुलांची तक्रार असते की रोज एकाच प्रकारचे जेवण करून कंटाळा येतो इतरांच्या डब्यात जास्त चविष्ट पदार्थ असतात.मुलांच्या विकासासाठी घरचे बनवलेले ताजे अन्न जास्त फायदेशीर ठरते. पुरेसे पोषक घटक त्यांच्या टिफिन बॉक्स मध्ये असायला हवेत जाणून घेऊया दररोज जेवणाच्या डब्यात मुलांना आपण काय काय देऊ शकतो.

Healthy School Tiffin Ideas for Kids सोमवार ( Monday )

पराठा किंवा चपाती भाजी

 • बटाट्याचा पराठा – Aaloo Paratha, चीज पराठा ,कोबी पराठा किंवा चपाती भाजी ( भरलेली भेंडी,कोबी,फ्लावर ,मटकी )
 • काकडीच्या गोल चकत्या कराव्यात आणि डब्बा पूर्ण करावा.
 • आवडेल ते फ्रुट Apple  ,Banana , Chikoo ,Pomegranates
चपाती मध्ये भातापेक्षा जास्त फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन पोट साफ होण्यास मदत होते त्याचबरोबर त्यामुळे बद्धकोष्ठ अपचन कॉन्स्टिपेशन यांसारख्या समस्यांपासून सुटका होते बटाट्यापासून ते कारल्यापर्यंत सर्व भाज्या रोज आहारात घेणे आवश्यक असते पण लहान मुले ठराविक भाज्या खातात हरकत नाही त्यांच्या आवडीनुसार त्यांना भाज्या बनवून दिल्या की ते खातील.

 

मंगळवार ( Tuesday )

 

साउथ इंडियन फूड

 • इडली चटणी
 • इडली सांबर
 • डोसा चटणी

इडलीत प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं.. शरीराच्या प्रथिनांची ही गरज इडलीद्वारे भागवली जाते. तसेच इडलीत कर्बोदकंही असतात, जी शरीरास फायदेशीर असतात. इडलीतल्या या गुणधर्मांमुळे इडली खाल्ल्याने पोट भरल्यासारखं होतं आणि हलकं फुलकं खाल्ल्याचं समाधान मिळतं. इडलीची पौष्टिकता त्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या नारळाच्या ओल्या चटणीमुळेही वाढते. तसेच इडलीसोबत चटणी आणि भाज्या घातलेल तुरीच्या डाळीचा सांबार खाल्ल्यानं शरीराला प्रथिनं, फायबर आणि आवश्यक ॲसिड आणि विकर एकाच वेळी मिळतात. इडली चटणी आणि सांबार हे हेल्दी काॅम्बिनेशन म्हणूनच लहान मुलांच्या डब्याला इडली चटणी इडली सांबर डोसा असे पदार्थ द्यावेत.

बुधवार  ( Wednesday )

सँडविच अँड फ्रुट

 • चीज सँडविच
 • नॉर्मल सँडविच
 • आलू सँडविच
 • सीजनल फ्रुट्स ( Mango , Grapes ,Orange ,Banana )

चीज सँडविच हे लहान मुलांसाठी जास्त फायद्याचे ठरते चीज हे लहान मुलांना आवडते त्यामुळे ते सँडविच ही आवडीने खातात.सीजनल फ्रुट्स हे नेहमी टिफिन मध्ये दिले पाहिजेत

गुरुवार (Thursday ) 

भाताचे प्रकार

 • वरण-भात
 • व्हेज पुलाव
 • व्हेज बिर्याणी
 • मसाला भात

भात पचनासाठी सहज हलका असतो भातामुळे हार्मोन संतुलित राहते त्वचेसाठी भात खाणे उत्तम आहे केसांच्या वाढीसाठी ही भात मदत करतो खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.सर्वच मुलांना वरण-भात आवडतो असे नाही त्यासाठी व्हेजिटेबल पुलाव चा ऑप्शन दिलेला आहे व्हेजिटेबल पुलावामुळे भाज्या सुद्धा पोटात जातात.

शुक्रवार ( Friday )

 

पारंपारिक पदार्थ

 • थालीपीठ,धपाटे
 • तिखट पुरी
 • साखर चपाती
 • बेसन पोळी किंवा मुलांच्याआवडीचा कोणतेही पदार्थ

थालीपीठ हा मराठमोळा पदार्थ आहे किंवा पारंपारिक पदार्थही म्हणू शकता एकदा जीवेवर चव रेंगाळली की मुले आवडीने थालीपीठ खातात.थालीपीठात कार्बोहायड्रेट मिळतात सोबत प्रथिनांनी समृद्ध असलेली कडधान्य आहेतच शिवाय भाजून घेतल्यामुळे पचायलाही हलके असते.साखर चपाती आपण सर्वांनीच खाल्ली आहे ती किती छान लागते हे वेगळं सांगण्याची गरज नाही.त्यामुळे लहान मुलांनाही साखर चपाती आवडतेच.

 

 

2 thoughts on “Healthy School Tiffin Ideas for Kids”

Leave a comment