Health is Wealth आरोग्य हीच संपत्ती

Health is Wealth म्हणजेच”आरोग्य हीच संपत्ती”

हे सोप्या भाषेत किंवा शब्दांत सांगायच तर  कठीण आहे.पण साधारणपणे शरीराचे सर्वच अवयव अगदी समान्य पणे कामकरतात आणी दैनंदिन हालचाली सहजरित्या होतात अशी शारिरीक व मानसिक अवस्था म्हणजे आरोग्य होय .

या धकाधकीच्या विज्ञान युगात व यंत्राच्या युगात आता गरज आहे ती म्हणजे आपले आरोग्य अगदी धनसंपत्तीप्रमाणे जपण्याची . नाहीतर जमवलेली धनसंपत्ती या आरोग्य जपण्याच्या गुंत्यात दवाखान्यात घालवावी लागेल व  जीवनाच्या खऱ्या आनंदाला मुकावे लागेल. आरोग्य ही खरोखरच संपत्ती आहे. आरोग्य बिघडण्याची कारणे व उपाय पाहूया.

आरोग्य बिघडण्याची कारणे:

 • व्यसनाचे वाढते प्रमाण
 • आहार बदल
 • ऋतुमान बदल
 • कामाचे  बदललेले  स्वरूप
 • धावपळीचे काम
 • कामाच्या अनियमित वेळा
 • व्यसनाचे वाढते प्रमाण
 • अति मोबाईलचा वापर
 • अति मोबाईलचा वापर
 • वाढलेले प्रदूषण
 • अति जागरण
 • व्यायामाचा अभाव

शरीरावर व मनावर होणारे परिणाम:

एकूणच या सर्वांचा परिणाम शारीरिक,मानसिक,बौद्धिक आणि भावनिक यावरती होतो.आणि परिणामी शरीर कमकुवत होते व
शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.त्यामुळे कमकुवत झालेले शरीर रोगांना लवकर बळी पडते.ताणतणावामुळे शरीर व मन यांचे 
संतुलन बिघडत चालले आहे. त्यामुळे विविध प्रकारचे आजार उद्भवण्याची प्रमाण वाढले आहे.काही लक्षणे पाहूया.

पचना संबंधी व्याधी:

तीव्र वेदना:

खूप कमी खाणे किंवा खूप जास्त खाणे:

मन एकाग्र होत नाही:

थकवा आल्यासारखे जाणवने:

शांत झोप न येणे:

आरोग्य स्वस्थ राहण्याचे उपाय

आहार:Diet:

Health is Wealth आरोग्य हीच संपत्ती

आहार- सात्विक व संतुलित घ्यावा. पालेभाज्या, सॅलड्स, मोड आलेली कडधान्ये, ताजा आणि हलका आहार घ्या. मांसाहार, तिखट मसाले, तळलेले पदार्थ, बेकरी पदार्थ, शिळे अन्न, फ्रीजमधील अन्न, फास्टफूड, अतिआहार हे सर्व टाळावे. कॉफी आणि कॅफीनयुक्त पदार्थ टाळावे.  झोपण्याआधी दोन तास जेवण करावे. जेवणानंतर शतपावली करावी.  जेवण करताना पोटभर जेवण करू नये,भूक राखून जेवावे. जेवणाच्या आधी व नंतर लगेच जास्त पाणी पिऊ नये.पाणी शुद्ध आणि जीवाणूरहित पाणी प्यावे.

व्यायाम:Exercise:

Health is Wealth आरोग्य हीच संपत्ती

 नियमित  40 ते 45 मिनिटे चालणे. धावणे ,साइकल चालवणे , दोरी वरच्या उड्या मारणे,विविध प्रकारचे खेळ खेळणे ,त्याचबरोब नियमित योगा  आसनांमुळे  शारीरिक व मानसिक तणाव कमी होईल.

शांत झोप:sleep peacefully

Health is Wealth आरोग्य हीच संपत्ती

शांत झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शांत झोप लागने हे आरोग्य चांगले असल्याचे एक लक्षण आहे.दररोज 7-8 तास झोप घ्या .मानसिक आराम: शांत झोप घेतल्याने मानसिक तणाव कमी होतो. त्यामुळे  दिवसभरातील चिंता, त्रास व अन्य स्थायिक समस्यांचे विसरण होते .चांगली झोपातून तुमच्या शरीराला पूर्णपणे विश्रांती मिळते. शरीराला दिवसभरसाठी ऊर्जा मिळते .झोपेमुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते.

शांत झोप लागण्यासाठी:

व्यायाम,  योगासने किंवा मेडिटेशनचा उपयोग करू शकता.सौम्य संगीत ऐकू शकता.रात्री लवकर झोपावे व सकाळी लवकर उठावे.झोपण्यापूर्वी एक तास इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दूर ठेवा.शक्यतो चांगली झोप लागण्यासाठी डाव्या कुशी वर झोपणे चांगले असते.रात्री झोपताना हलक्या रंगाचे व सैल कपडे घालावे.रात्रीच्या जेवणात तिखट, तेलकट, व मसाले दार पदार्थ खाऊ नका व दोन घास कमी खावे, त्यामुळे जळजळ कमी होईल व झोप शांत लागेल.रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला तेलाने मालिश करावी

व्यसनांपासून दूर:Stay away from addictions:

Health is Wealth आरोग्य हीच संपत्ती

व्यसनापासून दूर राहण्यासाठी दररोज व्यायाम वयोगाभ्यास करणे, सौम्य व शांत संगीत ऐकणे, सकारात्मक व मनोबल वाढवणारे विचारांचे विविध पुस्तकांचे वाचन करणे,काही वेळ मंत्र जप करावे.

दिनचर्या:Routine:

आपली दिनचर्या व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी आपण नियोजन करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेचे नियोजन असले पाहिजे. सध्याच्या काळामध्ये हे नियोजन करणे थोडेसे कठीण होत चालले आहे कारण बदललेली जीवनशैली व बदललेले कामाचे स्वरूप हे आहे. त्यामधून वेळेचे नियोजन आपण करणे गरजेचे आहे.रात्री लवकर झोपावे व सकाळी लवकर उठावे.सकाळी उठल्यानंतर मन मोकळेपणे खळखळून हसावे व दिवसाचे आनंदाने स्वागत करावे. चेहऱ्यावर आपल्या स्मित हास्य ठेवले पाहिजे.

.नियमित योगाभ्यास  व्यायाम करावा व यम ,नियमांचे पालनवेव करावे.मन करा रे करा प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे संतांचे प्रसिद्ध आहे व ते मन प्रसन्न ठेवण्यासाठी सकारात्मक विचार व मनोबल वाढवणाऱ्या पुस्तकांचे वाचन व श्रवण करावे..

निष्कर्ष:conclusion:

आरोग्य हीच संपत्ती” आहे .उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जीवन हे खूप सुंदर आहे ते आपण चांगल्या पद्धतीने जगता आले पाहिजे .त्यासाठी सर्वप्रथम आपले आरोग्य उत्तम असणे हे खूप गरजेचे आहे. जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आपले शरीर व मन सुदृढ व सशक्त पाहिजे. आहार ,व्यायाम ,शांत झोप या गोष्टी आरोग्सायासाठी महत्वाच्या आहेत . आपले  शरीर व मन स्वस्त असेल तर आयुष्य तणाव मुक्त राहील. व जीवनाचा आनंद घेता येईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

7 thoughts on “Health is Wealth आरोग्य हीच संपत्ती”

Leave a comment