health and lifestyle

health and lifestyle

धावपळीच्या जीवनशैलीमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतात  .काहीजण जिम तर काहीजण योगा व विविध पद्धतीची डायट प्लॅन फॉलो करताना दिसत आहे . योगा आणि फिटनेस याबद्दल आत्ताच जास्त चर्चा होते असं वाटत नाही का कारण याआधी या चर्चा कमी होत असल्याच्या किंवा नाहीच्या बरोबरीने म्हटलं तरी चालेल परंतु आत्ता याच गोष्टींवरती सर्वतोपरी सर्वात जास्त आणि लक्षणीय अशा चर्चा होताना आपल्याला दिसत आहेत. आजच्या काळामध्ये  या बदलत्या जीवनशैलीमध्ये शरीराची होणारी हेळसाड व त्याची काही कारणे खालील प्रमाणे पाहूया.कारण बदललेली जीवनशैली,बदललेले कामाचे स्वरूप आणि चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो.   त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होत आहे व शरीर नकळत अनेक आजारांना आमंत्रण देत असते देत आहे.त्यात वाढलेली वजन ही सध्याच्या काळात एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामध्ये आपली वेशभूषा सुद्धा बदललेली आहे त्यामध्ये अति घट्ट कपडे वापरणे त्याचाही परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो.आपल्या दिनचर्येचा खूप परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. त्यामुळे  दिनचर्या खूप महत्त्वाची आहे.

बदललेली जीवनशैली

Yoga and fitness या बद्दल एवढी चर्चा करण्याची गरज भासते ती म्हणजे या बदलत्या जीवनशैलीमुळे व त्याची कारणे पाहू

  • स्मार्टवर्क गॅझेट्स :
  • वेळ व्यवस्थापन:
  • कामाची पद्धत :
  • खाण्याच्या सवयी :
  • जीवनशैली :
                                      
1.स्मार्टवर्क गॅझेट्स :

स्मार्ट गॅजेट चा वापर तर आज-काल अगदी लहान बाळापासून ते वयस्कर पर्यंत सर्वच करत आहेत पण यामध्ये आपल्या मेंदूचा वापर खूप सारा होतो परंतु त्याचबरोबर हिने आपल्या शरीराच्या हालचाली कमी होत चालले आहेत स्मार्ट गॅजेटच्या वापरामुळे अनेक अपाय देखील होत आहेत परंतु आज कालच्या या एकविसाव्या शतकात त्यापासून दूर राहणे ही अवघड आहे.

2.वेळ व्यवस्थापन:
या गॅजेट चा वापर करत असताना आपला मेंदू एवढा थकून जातो की आपल्याला असं वाटते की मी किती शारीरिक कष्ट केले आहे 
त्यामुळे अनेकदा वेळ असतानाही असे वाटते की मला वेळच पुरत नाही त्यामुळे आता आपल्याला वेळेचा सदैव सदुपयोग करणे म्हणजेच 
टाईम मॅनेजमेंट करणे शिकण्याची आवश्यकता आहे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या स्क्रीन टाईम चेक करावा व 
त्यानुसार आपल्याकडे किती वेळ खरंच वापरात आलेला आहे आणि किती वेळ त्या स्क्रीन वरती गेलेला आहे ते पाहून आपल्या शरीरावरती
 काम करण्यास सुरुवात करावे.
3.कामाची पद्धत :

त्याचप्रमाणे आता आयटी कंपन्यांमधील जॉब्स आहेत की जे जास्त करून पश्चिमात्यदेशांमध्ये चालू आहेत त्यानुसार तिथल्या कामाच्या वेळा म्हणजेच आपल्याकडील रात्र तिथला दिवस अशा तीन-तीन शिफ्ट मध्ये काम करून झोपेच्या वेळा चुकल्यामुळे ओव्हर वर्क झाल्याचे जाणवते व त्यामुळे मानसिक त्रास मेंदूला येणारा थकवा जाणवतो.

4.खाण्याच्या सवयी :

रात्री बे रात्री कितीही वेळ काम केल्यानंतर अचानक एखादं पॅक केज मधलं फूड काढणं आणि ते खाणं म्हणजेच खाण्याच्या सवयी दिवसेंदिवस बदलत चालले आहेत आणि हे प्रिझर्वेटिव्ह असलेले फूड खाऊन ते पचवण्याची ताकद आपल्या शरीरामध्ये तितकीशी नाही त्यामुळे किडन्यांवरती ताण येत आहे.

5. जीवनशैली :

पाश्चिमात्य कामांचे अवलोकन करत असताना त्यांच्या अनेक सवयींचे अवलोकन ही केले जात आहे त्यामुळे आता आपली सर्व जीवनशैली बदलत चाललेली आहे अगदी घालण्याच्या कपड्यांपासून ते जेवणातल्या सवयीन पर्यंत याचाच अर्थ काय या बदललेल्या जीवनशैलीला आपल्या शरीरासोबत जोडत असताना आपण मानसिक स्वास्थ्याचा विचार करतो पण शारीरिक स्वास्थ्य त्यामानाने तेवढेच चांगले काही राहिलेले नाही यासाठी उपाय म्हणून आपण योगाभ्यासाचा विचार करू शकतो.

1.Solutions उपाय:

आता या बदलत्या जीवनशैली आणि होणाऱ्या शारीरिक हानी साठी काय उपाय असेल तर हा उपाय म्हणजे आपल्या सर्वतोपरी शरीरावरती होणारे संस्कार होय आता हेच संस्कार शारीरिक मानसिक आहारिक औषधिक तर औषधी असेही होऊ शकतात ते उपाय आपण खालील प्रमाणे पाहूया.

1.1.Physical health:शारीरिक स्वास्थ:

मित्रांनो ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यात आपण थोडासा जरी बदल केला तरी आपल्याला खूप त्याचा फायदा होऊ शकेल जसे की घरापासून थोडेसे अंतरावरती जाण्यासाठी सायकल किंवा जवळ असेल तर चालत जाण्याचा प्रयत्न करा .उदाहरणार्थ भाजीसाठी किंवा इतर काही वस्तू आणण्यासाठी
त्यामुळे शारीरिक तर फायदा होईलच पण त्याबद्दल त्याबरोबर वाढणारे प्रदूषण आणि होणारा पेट्रोलचा खर्च सुद्धा कमी होईल.

1.2.Mental health मानसिक स्वास्थ्य:

आताच्या काळामध्ये सरास मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूस्चावा वापर होत असतो तो करत असताना सातत्याने त्याच्या अतिरिक्त वापरामुळे शारीरिक व मानसिक तणाव व व्याधी पण वाढत आहेत.  व त्यामधील काही न्यूज त्याचा सुद्धा कळत नकळत आपल्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो त्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकतेची भावना वाढते त्यासाठी ज्यावेळेस आवश्यकता नाही त्यावेळेस त्या वस्तू बंद ठेवण्याचा प्रयत्न करावा किंवा प्रतिवापर टाळावा त्यामध्ये जे आपल्याला कामापुरते किंवा आवश्यक आहे तेवढेच पाहावे त्यामुळे येणारा ताण तणाव कमी होण्यास मदत होईल.त्यामुळे मन शांत व प्रसन्न राहील.

1.3.Design your routine : तुमची दिनचर्या तुम्ही स्वतः डिझाईन करा

त्यामध्ये तुम्ही सकाळी झोपेतून उठण्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतचे वेळेचे नियोजन करा.व लिहून एक चार्ट बनवा त्याच्यामध्ये दररोजच्या
घटनांची नोंद करून ठेवा.काटेकोरपणे पालन करा.त्या नियोजनामध्ये सातत्य ठेवा.

 उदाहरणार्थ :वेळेची नियोजन,व्यायाम,योगा,नाष्टा,जेवण,कामाचे नियोजन

1.4.Eating Habits आहार:

शकतो हलका व सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा. पॅकिंग मधले किंवा जास्त प्रक्रिया केलेली अशा वस्तूंचा आहारामध्ये टाळण्याचा
प्रयत्न करा. त्याचबरोबर,बेकरी पदार्थ,सोडा टाकलेली पदार्थ ,जास्त आंबवलेले पदार्थ,जास्त साखर असलेली पदार्थ,तिखट व मसाले 
युक्त पदार्थ टाळावेत.

2. Result of Yoga:

मानसिक शारीरिक आणि इतर स्वास्थ्य सांभाळण्यासाठी आता आपण त्यावर उपकरणात येणारे उपाय पाहिले. आता यावरती आपण सर्वात महत्त्वाचा असा उपाय म्हणजे योगा तर या योगाचा आपल्या स्वास्थ्यावरती कोणत्या प्रकारे उपयोग होईल हे आपण खालील मुद्द्यांच्या म्हणजेच योगा ही एक उपचार पद्धती कशाप्रकारे आहे त्याचप्रमाणे योगाभ्यासांचा वापर आपण लाईफलॉन रिझल्ट साठी कसा करू शकतो योगाभ्यास करत असताना आपल्याला बिना औषधी उपचार कसे मिळतील स्वतःच्या शरीराला स्वतः बरे करण्याची सवय कशाप्रकारे लावता येते व या सर्वातून स्वतःची कार्यक्षमता कशी वाढवता येते हे खालील मुद्द्यांच्या आधारे पाहूया

2.1.उपचार पद्धती:

आवश्यकता नसताना अतिरिक्त औषधांचा वापर कमी करा.काही प्रमाणामध्ये आपले शरीर स्वतःला बरे करण्यासाठी समर्थ असते 
त्यासाठी आपले विचार सकारात्मक व मनोबल वाढवणारे असावेत.त्यासाठी विविध पद्धतीच्या व्यायाम,योगा,प्राणायाम किंवा काय ओंकार
 झोप अशा विविध गोष्टींचा उपयोग करावा.

2.2.Lifelong Result:

योगाभ्यासामुळे आपल्या शरीराला होणारे फायदे हे चिरकाल टिकणारे असतात म्हणजेच समजा एखाद्या आजारासाठी आपण दवाखान्यात
 गेलो तर डॉक्टरने दिलेल्या तीन किंवा पाच दिवसाच्या डोस नंतर आपल्याला काही दुखणे असतात ती परत एकदा उद्भवल्यासारखी 
वाटतात परंतु योगाभ्यासांमध्ये एखादी गोष्ट व्यवस्थित करायची असेल तर त्याला वेळ लागू शकतो परंतु एकदा त्या दुखण्याचे आजाराचे 
निदान झाल्यानंतर मात्र त्यावरती आपल्याला मिळणार निकाल किंवा रिझल्ट लाईफ लावून दिसतो आणि तो चिरकाल टिकतो.

2.3 No use of Medicines:

आता आपण एखाद्या आजारासाठी दवाखान्यात गेलो तर आपल्याला अपेक्षित असते ते म्हणजे एक इंजेक्शन आणि काही औषधी परंतु याउलट आपण जर एखादे दुखणे बरे करण्यासाठी एखाद्या योगा शिक्षकाकडे गेलो आणि आपल्या शारीरिक व्याधींसाठी एखादा व्यायाम विचारला असता तो व्यायाम करताना तो योगशिक्षक मात्र तुम्हाला कधीच एखादा औषध खाण्यासाठी सांगत नाही यावर औषधे न खाता आहारामध्ये बदल करून तुम्ही कशाप्रकारे एकच व्यायाम त्या ठराविक दुखण्यासाठी कशाप्रकारे सातत्याने करावा हे समजावून सांगून तुम्हाला त्या दुखण्यातून चिरकाल म्हणजेच कधीही पुन्हा न उद्भवणाऱ्या त्रासाकडे तुम्हाला तो योगशिक्षक घेऊन जाईल याचाच अर्थ योगामध्ये एवढी ताकद आहे की लाखोंनी पैसे खर्च करणाऱ्या जनतेने जर का याचा विचार केला तर विना औषध उपचार मिळणे याची हमी मात्र आपल्याला मिळेल.