Guru Purnima

Guru Purnima

 गुरुपौर्णिमा

Guru Purnima

 

 

आजचा विषय गुरुपौर्णिमा,भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपरंपरा ही खूप प्राचीन व पुरातन काळापासून चालत आलेले आहे व याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पहिले गुरु म्हणजे आपली आई व वडील त्यानंतर घरातील आजी आजोबा व इतर सर्व लोक आजूबाजूची लोक त्यानंतर पहिले पाऊल पडते ते म्हणजे शाळेमध्ये आणि त्यानंतरचा शिक्षक म्हणजे हा आपला गुरु अशी मान्यता याआधी आपण अनेक वेळा ऐकलेली आहे एव्हाना अशा गोष्टी आपण ऐकतो आणि त्या फक्त गुरुपौर्णिमे दिवशीच ठीक आहे. कोणत्या न कोणत्या कारणाने आपण या सर्व गोष्टी ऐकून निदान आपल्या आयुष्यातील निरनिराळ्या गुरूंना अनुभवतो आणि आपल्या पुढील पिढीला गुरु म्हणजे काय आणि गुरुचे महत्व समजावून सांगतो हेही काही कमी नाही.

आजच्या या स्पर्धेच्या जगात धावपळीच्या जगात आपल्या गुरूला आठवण्याची संधी ही गुरुपौर्णिमा आपणा सर्वांना देते परंतु ज्या परीने आपल्या गुरुंनी आपल्या मनात गुरूंचे स्थान रुजवले किंवा गुरुपौर्णिमे दिवशी जी आदराची भावना आपल्या मनात निर्माण होते डोळ्यात ती चकाकी येते आपल्या गुरु बद्दलचे ते स्थान आपण अनुभवतो परंतु आपण जे आजचे गुरु आहोत आपल्या पुढच्या पिढीमध्ये ती भावना तसेच निर्माण करण्यास समर्थ आहोत का किंवा त्यात आपल्याला यश येत आहे का हेही पाहण्याची गरज आहे.

आई वडील माझे पहिले गुरु:

Guru Purnima

 

 

आई माझा गुरु आई कल्पतरू सुखाचा सागरू आई माझी या छोट्याशा श्लोकात आपल्याला आई मध्ये सामावलेलं विश्व दिसून येतं ती भोळी भाबडी भावना आपल्या डोळ्यात लगेच दिसूनही यायचे परंतु आजच्या छोट्या छोट्या चिमुकल्यांच्या नजरेत ती भावना आणण्यासाठी आपण समर्थ आहोत का आजच्या मुलांचे विचारही आज कालचा वस्तू नुसार किंवा फायद्यानुसार झालेले आहेत.

या मुलांच्या नजरेत आई त्यांचा गुरु कशी आहे आणि आई कल्पतरू ही कशी आहे हे जाणून देण्याच्या संकल्पना काहीशा वेगळ्या होत चालल्या आहेत असं वाटत नाही का आता लहानपणीच्या गोष्टी सांगून आपण या मुलांना त्या भोळ्याभाबड्या मुलतत्वाकडे नेऊ शकतो का? थोडासा विचार करण्याची गरज आहे. माझे दैवत उभे माझ्याच घरात या व्यक्तीला सिद्ध करण्याची जबाबदारी आता प्रत्येक आईवर वडिलांवर आहे आहे.

आजूबाजूच्या वातावरणातून भेटणारे गुरु:

आपण जरासा आपल्या इतिहासात डोकावलं तर मुले एकत्र कुटुंबात रहात होती वाड्या वस्त्यांवर खेळत होती त्यामुळे आजूबाजूच्या वातावरणातून त्यांना अनेक गुरु भेटत होते. छोट्या मोठ्या गोष्टी करताना चुकताना इकडून तिकडून मिळणारे शिक्षण ही काही कमी नव्हते गुरुजी जागा ते देखील घेतच होते आपण म्हणतो ना समाजात वावरल्याशिवाय खरे जग समजत नाही तसेच आहे. ते पण आज कालच्या मुलांना कोंडून एका फ्लॅटमध्ये किंवा एका बंगल्यामध्ये ठेवून सामाजिक जीवन समझते का किंवा प्रत्येक वेळी कोण ना कोण मुलांच्या मागे उभे राहून त्यांना सामाजिक जीवन समजण्यासाठी आपण स्वयं सिद्ध करत आहोत का? प्रत्येक वेळी मुलांना निदर्शनाखाली ठेवूनच सर्व गोष्टी शिकवल्या जाऊ शकतात असे नाही स्वयम अनुभवातूनही काही गोष्टी शिकणे अतिशय गरजेचे असते आणि हाच स्वयं अनुभव आजकाल थोडासा मागे पडत चालल्यासारखा वाटतो.

 मित्र-मैत्रिणी मधील सवंगड्यांमधील गुरु:

 

गुरुला वय नसते गुरु कधी छोटा कधी मोठा किंवा समवयस काही असू शकतो त्याचप्रमाणे आपल्या सवंगड्यांमधील मित्र-मैत्रिणी मधील काही चांगल्या सवयी आपल्याला बरच काही शिकवून जातात तसेच मित्र-मैत्रिणी मधील गुरु शोधणे ही देखील काळाची गरज आहे एव्हाना तो कधी कळतही नाही की हा आपला गुरु आहे कारण बराचसा सवयी एकमेकांसोबत एकमेकांसारख्या लागत जातात मग अशावेळी चांगल्या सवयी लागण्यासाठी चांगले मित्र मैत्रिणी सवंगडी असणे ही तितकेच गरजेचे आहे हे कसे बरे समजेल? अनुभवातून जोपर्यंत आपण काही लोकांमध्ये मिसळत नाही.

त्यांच्यासोबत वावरत नाही तोपर्यंत चांगल्या आणि वाईट या मधला फरक करणे अशक्यच आणि तो देखील स्व अनुभवातून जर भेटला तर आयुष्याचा ठेवा होतो त्यामुळेच पुढील काही ओळी अगदी सिद्ध होतात.अधुरे अपुरे सारे तुझं सवे पुरे व्हावे होऊन या प्रसन्न मजवरी तू विद्येचे दान द्यावे.या ओळी आपण कोणासाठी वापरू शकतो आजूबाजूचे गुरु,मित्र-मैत्रिणींमधील गुरु, आईतील गुरु, शेजाऱ्यांमधील आजी आजोबांमधील गुरु हे सर्व काही आपण ज्ञान घेत राहावे आणि त्यांनी आपल्या अनुभवाचे दान देत राहावे असेच काहीच आहे.

आधुनिक गुरु:

ज्या कुटुंबात मुलांना देण्यासाठी वेळ नाही किंवा मुलांना अनुभवातून शिक्षण देण्यासाठी आजूबाजूला लोक नाहीत अशांसाठी आधुनिक गुरु खरंच चांगलं काम करत आहेत फक्त या आधुनिक गुरूला ज्याच्या हातात रिमोट तोच कंट्रोल करत असल्यामुळे थोडासा स्वतःच्या आतील गुरु जागा करणे हे गरजेचे आहे. आधुनिक गुरु म्हणजेच हातात असणारे फोन घरात असलेला टीव्ही इंटरनेट सोशल मीडिया या गोष्टींमधून अनेक सारे अनुभव मुलांना समोर दिसतात फक्त आता कोणत्या प्रकारचे अनुभव पहायचे कशाचा अनुभव घ्यायचा आणि कोणत्या गोष्टी आपल्या आजूबाजूला निहाळायच्या आपल्या घराशी आयुष्य शी निगडित असणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत हे ठरवण्याचे थोडेसे ज्ञान आले की हे आधुनिक गुरुही बरेच चांगले काम करत आहेत बरं का

गुरूंची शिकवण:

आता वरती पडताळलेले गुरु म्हणजेच आईतील गुरू ,मित्र-मैत्रिणी मधील गुरु, आधुनिक गुरु आजूबाजूच्या लोकांमधील गुरु असे अनेक गुरु मी आता वरती सांगितले परंतु हे गुरु ओळखणे आणि या गुरूंनी दिलेली शिकवण वागण्या बोलण्यातून समजावून घेणे म्हणजेच ज्ञान होय. आता या ज्ञानाचे हे सारे भंडार आपल्या आजूबाजूला असताना आपण या गुरूंनी दिलेल्या शिकवणींचा वापर कसा करतो किंवा त्या शिकवणी कोणकोणत्या प्रकारे लक्षात ठेवतो हे जास्त महत्त्वाचे. आधुनिक काळानुसार या धकाधकीच्या जीवनात आपणही धावपळीमध्ये खूपच व्यस्त आहोत .

आपल्या घरातील मुलांना निरनिराळ्या सवयीन मधून समजावून सांगण्यात येणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ कमी पडत आहे आणि त्यामुळे आपली मुलं आपल्याकडूनच नकळत काहीशा चुकीच्या गोष्टींचा अनुभवही घेत आहे .आता जर आजूबाजूच्या गुरूंमधून मुलं बरंच काही शिकत असतील तर त्या गुरूंमध्ये आपणही एक आहोत त्यामुळे आपल्याकडून आपल्या आजूबाजूचा विद्यार्थी किंवा शिष्य काय शिकतोय हे पडताळून पाहण्याची आपल्याला ही गरज आहे.

वेळेवर शिकवणीची आठवण:

आता वरती बऱ्याच सार्‍या गोष्टी आयुष्यातील गुरु गुरूंच्या शिकवणी यापर्यंत आल्या परंतु आता आपल्याला खरी गरज आहे ती म्हणजे मिळालेल्या शिकवण्याची वेळेवर आठवण असण्याची आता याचे उदाहरण बरेचसे काही जुनेच आहेत ते म्हणजे रणांगणामध्ये भावनिकतेने व्याकुळ झालेला अर्जुन ज्यावेळेस गुरुची शिकवण विसरल्यासारखा होतो त्यावेळेस श्रीकृष्णासारखा सारथी मित्र त्याला साथ देतो आणि त्याची सध्या युद्धात असणारी गरज किंवा प्रसंगावधान राखून अर्जुनाची त्यावेळी ची असणारी गरज कृष्ण त्याला समजावून सांगतो अशा प्रकारे आपल्याला जीवन ज्या काही शिकवणी मिळतात त्या आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगानुसार आपल्याला वापरता आल्या पाहिजेत आणि ही सर्वात महत्त्वाची शिकवण मुलांना देणे काळाची गरज आहे.

आयुष्यात येणाऱ्या एखाद्या अपयशाला कसे सामोरे जावे किंवा आयुष्यात मिळालेल्या एखाद्या यशानंतर जमिनीवर पाय ठेवून लहानपणापासून आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक गुरूला कशाप्रकारे लक्षात ठेवावे हे शिकवण्याची गरज आज विद्यार्थ्यांसाठी भासत आहे आणि हे त्यांना शिकवणारे म्हणजे कोण आपणच आजूबाजूचे गुरु आपल्याकडूनच ते मुलं बरंचसं काही शिकणार आहेत ही जबाबदारी आपणही स्वीकारली पाहिजे.

काळानुसार पडणारा विसर:

लहानपणापासून अनेक गोष्टी शिकण्याचा शिकवण्याचा अनुभव सगळ्यांनाच येतो पण या सर्व शिकवणे लक्षात ठेवणे आणि त्यांचा वेळ अनुरूप आठवणीने वापर करणे हे सारे महत्त्वाचे काळानुसार घडत जाणारी पिढी आणि त्या पिढीमध्ये तयार होत जाणारे विचार स्वातंत्र्य यानुसार चांगल्या घरातील मुलं असूनही किंवा चांगल्या संस्कारातून आलेली मुलं असूनही एखाद्या क्षणाचा प्रसंगाचा असा काही अतिरेक होतो .की ना भीती ना आदर या उक्तीप्रमाणे अगदी अनपेक्षित असे वर्तन मुलांकडून घडते .

त्यामुळे मुलांमध्ये संयम निर्माण करणे ही काळाची गरज आहे आणि ते ज्या जडणघडणीत तयार झाले आहेत ती जडणघडण ते विचार एवढे समृद्ध बनवणे गरजेचे आहे की त्याचा कधीही कोणत्याही प्रसंगाने विसर न पडता एक चांगला माणूस आपल्याला लाभेल याची खात्री आपल्याला असली पाहिजे.

 निष्कर्ष:

वरील लेखावरून एकच सांगण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे जुन्या गोष्टींचे दाखले देऊन जुन्या गोष्टींची वर्णाने सांगून त्यातच न रमता आधुनिकतेनुसार आधुनिक गुरुपौर्णिमा साजरी करणे आता आपल्याला शिकायचे व शिकवायचे आहे आणि विद्यार्थ्यांना गुरु म्हणजे भगव्या कपड्यातील कमांडोलो हातात घेतलेली एक व्यक्ती आणि त्याच्या पायाशी नतमस्तक होणारा एक शिष्य एवढेच नसून गुरु आणि शिष्य यांच्यातील आधुनिकतेनुसार तयार होणारे नातेही मुलांना सांगितले पाहिजे तेव्हा कुठे त्यांना गुरुपौर्णिमा ही सर्वसामान्यांची तुझे माझी आपल्या सर्वांचीच आहे हे भासेल धन्यवाद!

3 thoughts on “Guru Purnima”

Leave a comment