Fungal Infection

 Fungal Infection 

बुरशीजन्य संसर्ग 

पावसाळ्यात Fungal Infectionचा धोका खूप जास्त असतो त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो आणि यात फंगल इन्फेक्शनचा धोका खूप जास्त वाढतो आणि दमट वातावरणामुळे फंगल इन्फेक्शन वाढत जातं आणि अशा वेळेस संपूर्ण शरीरावर ते पसरण्याची शक्यता असते काय करावे तर त्यासाठी सहा टिप्स.

 Fungal Infection

1 )पावसाळ्यातील सुती कपडे घालावे:

पावसाळ्यामध्ये सुती व सैल कपडे वापरावेत त्यामुळे त्वचेला श्वास घेण्यासाठी मोकळी जागा मिळेल. यामुळे शरीर ओलसर राहणार नाही. यामुळे तुमची त्वचा कोरडी राहील व इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल.पावसाळ्यामध्ये सुती कपडे लवकर सुकले जातील.  जाड वओले कपडे वापरू नका. जाड व ओले कपडे वापरल्यामुळे आणखी इन्फेक्शन वाढू शकते.

2) टॉवेल दररोज दुवा आणि इस्त्री करा:

कारण संक्रमणा ला प्रतिबंध करण्यासाठी कॉटन टॉवेल वापरणं हा खूप चांगला उपाय आहे त्यामुळे चुकल्यानंतर तो लगेच धुऊन घ्या आणि शक्य असल्यास इस्त्री सुद्धा करा

3) innerwearओल्या वापरू नका:

undergarments मुळे fungul infection चा धोका सर्वाधिक असतो म्हणून कधीही पावसाळ्यामध्ये ओल्या under wear वापरू नका .आधी त्या व्यवस्थित सुकू द्या त्यानंतर वापरा .

4)अंघोळीनंतर शरीर नीट पुसून घ्या:

आंघोळीनंतर शरीराचे सर्व अवयव नीट स व्यवस्थित पुसून घ्या आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय गुडघ्यामधील बाजू मान बोटांमधील जागा म्हणजे जे अवयव दुमडले जातात .ते व्यवस्थित पुसून घ्या कारण अशा अवयवांमध्ये पाणी तसं राहतं आणि त्या ओलाव्यामुळे देखील धोका वाढत जातो. आणि शक्यतो कॉटन टॉवेलचा वापर करा.

5) व्यायाम केल्यानंतर लगेच कपडे बदला:

अनेक जण जिम केल्यानंतर अंगावर घामाचे कपडे सुकण्यासाठी तसेच सोडून देतात. पण यामुळे अजून फंगल इन्फेक्शनवा  शकते म्हणून जीम मधून आलात की लगेच कपडे बदला आणि अंघोळ करा.आंघोळीसाठी अति गरम किंवा अति थंड पाणी वापरू नका.

6) steroid क्रीम चा वापर टाळा

फंगल इन्फेक्शन वर स्टेरॉईड क्रीम चा वापर न करण्याचा सल्ला डॉक्टर देतात कारण यामुळे इन्फेक्शन आणखी शक्यता  वाढ आणखी होऊ शकते.यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

7)पायांना होणारे इन्फेक्शन:

पावसाळ्यात दिवसांमध्ये अनेक लोकांना पायाला Fungal Infection होऊन त्रास होतो. रस्त्यावर साठलेले घाण पाणी किंवा पाय सातत्याने ओलसर राहणे. यामुळे बरेच वेळा पायाला खाज सुटणे, बोटांच्या मध्ये इन्फेक्शन होणे किंवा पायाला जखम होणे अशा समस्या निर्माण होत असतात. अशा बुरशीजन्य संसर्गामुळे जास्त काळ त्रास होत असतो. अशा समस्या वाचण्यासाठी घरगुती काही उपाय उपयुक्त ठरतील. घरी आल्यानंतर आपले पाय स्वच्छ धुऊन घ्यावेत. एका टपमध्ये पाय बुडतील एवढे कोमट पाणी घ्यावे. त्यामध्ये तीन ते चार चमचे मीठ टाकावे. वीस ते पंचवीस मिनिटे पाय कोमट पाण्याच्या टपामध्ये ठेवावे. व नंतर पाय बाहेर काढून टॉवेलने स्वच्छ पुसून घ्यावे. बोटांमधील जागा कोरडी करून घ्यावी. त्या ठिकाणी इन्फेक्शन कमी होईल व जळजळ ,खाजगी कमी होईल.

 Fungal Infection :

1 thought on “ Fungal Infection”

Leave a comment