7 Forts in Pune

Forts in Pune

 

 

 

Forts in Pune पुण्याच्या जवळपासबरेच किल्ले आहेत पण ट्रेकिंग साठी सोपे असे काही निवडक किल्ल्यांची माहिती मी खाली दिलेली आहे.हे सर्व किल्ले पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये आवर्जून पाहायला जातात.किल्ला आणि किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आणि सुंदर दिसतो.या किल्ल्यांना आवर्जून सर्वांनी भेट द्यावी.

Forts in Puneसिंहगड किल्ला ( Sinhagad Fort ) 29 km from Pune

Forts in Pune

छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की कोंढाणा किल्ला आपल्या हातात आला पण सेनापती तानाजी मालुसरे यांना मरण आलं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तोंडून निघाले होते की गड आला पण सिंह गेला. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ल्याचे नाव सिंहगड किल्ला असे ठेवले.

किल्ल्याचे नाव (Fort Name) सिंहगड किल्ला
उंची (Height) 1317 मीटर (4320फुट)
प्रकार (Type) डोंगरी किल्ला
ठिकाण (Place) पुणे
Difficulty  Easy-Moderate grade

Forts in Pune

जर तुम्हाला सिंहगड किल्ल्यावर ट्रेक करून जायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी दीड तास लागेल.किल्ल्यावर ट्रेक करून गेल्यावर किल्ल्यावर जायची जी मजा ती खुपच वेगळे असते.सर्वांनी एकदा तरी सिंहगड ट्रेक करावl.

लोहगड किल्ला ( Lohagad Fort ) 66km from Pune

Forts in Pune

मान्सूनसाठी हा किल्ला सर्वोत्तम आहे. मळवली रेल्वे स्थानकापासून ट्रेक सुरू होतो आणि पावसाळ्यात पुणे आणि मुंबईचे बरेच ट्रेकर्स या किल्ल्याला भेट देतात.  .हा एक अतिशय सोपा ट्रेक आहे आणि अगदी नवशिक्या ट्रेकर्सनाही कोणतीही अडचण येऊ नये.गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी सुमारे 250-300 पायऱ्या आहेत. ट्रेकिंगसाठी लागणारा एकूण वेळ सुमारे 1 ते 2 तास आहे.गडावर चढताना एका सलग चार प्रवेशद्वारातून जावे लागते.

गणेश दरवाजा,नारायण दरवाजा,हनुमान दरवाजा,महादरवाजा गडा वर पाहण्यासारखे खूप काही आहे शिवमंदिर अष्टकोनी तळे 16 कोणी तळे लक्ष्मी कोठी

विंचूकडा

लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकडा आहे. हा विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे.विंचूकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. किल्ल्यावरून पाहिलेला हा भाग विंचवाच्या  नांगी सारखीच दिसतो, म्हणून त्याला विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आहे.

Forts in Pune

किल्ल्याचे नाव (Fort Name) लोहगड किल्ला
उंची (Height) 3420 फूट
प्रकार (Type) गिरिदुर्ग
Difficulty   Easy-Moderate grade

 

 

विसापूर किल्ला ( Visapur Fort ) 60km from Pune

Forts in Pune

विसापूर किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम काळ जूनच्या मध्यात आणि फेब्रुवारीच्या अखेरीस असतो.हिवाळ्याचे महिने आदर्श हवामानानुसार असतात, परंतु जूनच्या मध्यापासून सुरू होणाऱ्या मान्सूनला केवळ सुखदायी हवामानच नव्हे तर सभोवतालच्या हिरवळीची सुंदर दृश्ये आणि धबधब्याच्या धबधब्यावरून चालण्याची संधी मिळते.किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत
एक पाटण गावातून,
एक भाजे लेणीतून आणि
गायमुख खिंडमधून.

Forts in Pune

विसापूर किल्ला ट्रेक अनुभवी ट्रेकर्ससाठी शिखर गाठण्यासाठी त्याच्या मूळ गावाच्या पायथ्यापासून सुमारे 2 तास लागतात

किल्ल्याचे नाव (Fort Name) विसापूर किल्ला
उंची (Height) 1,084 मीटर (3,556 फूट)
प्रकार (Type) डोंगरी किल्ला
Difficulty   Easy-Moderate किल्ला grade

 

कोरीगड किल्ला ( Korigad Fort ) 90km from Pune

Forts in Pune

(कुवारीगड / कोराईगड / कोजारी / कुंवारी कोरीगड)

कोरीगड हा किल्ला चढण्यासाठी एक ते दोन तास लागतात आणि पाहण्यासाठी एक तास लागतो या किल्ल्यावर जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे पाणी आणि खाण्यासाठी काही स्नॅक्स आपल्यासोबत घ्यावे कोरीगड हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क घेतला जात नाही. या किल्ल्यावर चढण्यासाठी सहाशे पायऱ्या आहेत तसे या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत त्यातील मुख्य दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा.

कोरीगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे कोराई देवीचे मंदिर,गणेश मंदिर, गुहा ,महादरवाजा, हनुमानाचे मंदिर ,ध्वजस्तंभ ,गणेश टाके ,आणि तोफा पाहायला मिळतील.

Forts in Pune

 

किल्ल्याचे नाव (Fort Name) कोरीगडकिल्ला
उंची १०१० मी.
प्रकार गिरिदुर्ग
Difficulty 
 Easy

 

तुंग किल्ला ( Tung Fort ) 64 Km from Pune

Forts in Pune

तुंग किल्ल्यावरील ट्रेक फार सोपI आहे. परंतु तुम्ही जर पावसाळ्यात जात असाल तर सांभाळून जावे कारण की या किल्ल्यावर पायवाट खूप छोटी आहे.तुंग किल्ला चढायला 1 तास वेळ लागतो.गडावर पाहण्यासाठी गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, गणेश मंदिर, पाण्याच्या टाक्या, सदर, वाड्याचे अवशेष ,तुंग देवीचे मंदिर असे बरेच काही पाहण्यासारखे आहे.

किल्ल्याचे नाव (Fort Name) तुंग किल्ला
उंची (Height) 3,527 फुट (1,075 मी)
प्रकार (Type) गिरिदुर्ग
Difficulty   Easy-Moderate किल्ला grade

 

Forts in Pune

 तिकोना किल्ला ( Tikona Fort ) 50 Km from Pune

Forts in Pune

तिकोना किल्ल्याला वितडगड म्हणून सुद्धा ओळखले जाते.किल्ला चढणे सोपे आणि मध्यम अवघड आहे गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो ट्रेकचा मार्ग व्यवस्थित आहे ट्रेक साठी मार्गदर्शन घेण्याची गरज नाही सुट्टीच्या दिवशी केल्यावर प्रेमींची गर्दी असते हिवाळ्याच्या काळात तापमान कमी असल्यामुळे किल्ल्यावर बरीच गर्दी भेटेल जर तुम्ही पावसाळ्यात भेट देत असाल तर खड्डे आणि निसरडे रस्त्यांमुळे काळजी घ्यावी लागेल किल्ल्यावर पाहण्यासारख्या मोठ्या तटबंदी स्वच्छ पाण्याने भरलेली पाण्याच्या टाकी मोठे दरवाजा आणि बुरुज आहे.

 

 

किल्ल्याचे नाव (Fort Name) तिकोना किल्ला
उंची (Height) 3,580 फुट 
प्रकार (Type) गिरिदुर्ग
Difficulty   Easy-Moderate किल्ला grade

 

तोरणा किल्ला ( Torna Fort ) 60 km from Pune

Forts in Pune

तोरणा किल्ल्याचे प्रचंड गड असे आहे तोरणा किल्ल्यावरून रायगड किल्ला, राजगड किल्ला ,पुरंदर किल्ला ,सिंहगड किल्ला हे सर्व गड दिसतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्य स्थापनेचे तोरणच बांधले असे म्हटले जाते. तोरणा कल्ल्यावर पाहण्यासारखे बिनी दरवाजा, तोरणा दरवाजा, महंगाई देवीचे मंदिर, झुंजार माची ,कोकण दरवाजा ,बुधला माची अशी सर्व ठिकाणी आहेत.

तोरणा किल्ल्यावर सुमारे तीन तास लागतात .तसा किल्ला ट्रेकिंग साठी अवघड नाही.

 

किल्ल्याचे नाव (Fort Name) तोरणा किल्ला
उंची (Height) 1,403 मीटर (4,603 फूट)
प्रकार (Type) गिरिदुर्ग
Difficulty   Easy-Moderate किल्ला grade

 

4 thoughts on “7 Forts in Pune”

Leave a comment