Fasting and health in the month of Shravan 2023

Fasting and health in the month of Shravan 2023

श्रावणातील उपवास व आरोग्य

सर्व प्रकारे आहाराचे विहाराचे नियोजन करून .श्रावण महिन्यातील उपावास हे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असतात.
कारण या महिन्यांमध्ये निसर्गतः वातावरणामध्ये खूप बदल झालेला असतो. त्यामध्ये शरीरातील जठराग्नी मंद झालेला असतो व शरीर ही काही प्रमाणामध्ये दुर्बल झालेले असते याचाच परिणाम सारखा आळस येणे व झोपण्याची इच्छा होणे.

श्रावण महिन्यात मांसाहार करत नाहीत. यंदा अधिक श्रावण असल्यामुळे दोन महिने मांसाहार करत नाहीत. श्रावण हा महिना धार्मिक दृष्ट्या जितका महत्वाचा आहे तितकाच तो आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही महत्वाचा आहे.

श्रावणात श्री शंकराची आराधना-उपासना केली जाते.अनेकजन  संपूर्ण श्रावणाच्या प्रत्येक दिवशी भगवान शंकराची पूजा करतात आणि पाणी, दूध आणि बेलची पाने अर्पण करतात.

Fasting and health in the month of Shravan 2023

Fasting and health in the month of Shravan 2023

अध्यात्मिक दृष्टिकोन:

श्रावण महिन्यात उपवासाचा प्रथम आध्यात्मिकदृष्ट्या विचार करू. सत्त्व, रज, तम असे मनाचे तीन गुण सांगितले आहेत. देवाच्या जास्तीत जास्त जवळ जायचे असल्यास मनाचा ‘सात्त्विक’ गुण वाढवणे गरजेचे असते. सात्विक गुण हा सात्विक गुणधर्माच्या आहार-आचार-विचारानेच वाढतो. म्हणूनच ऋषीमुनींनी सात्विक आहार सांगितला आहे. जेणे करून पचायला हलका असेल.यामुळेआपल्या मध्ये जास्तीत जास्त सात्विक गुण वाढेल व ईश्वर भक्ती मध्ये अधिक जवळीकता साधता येईल.

यामुळे धार्मिक दृष्टीकोनातून मांसाहार करत नाहीत. पण त्याच बरोबर श्रावण या महिन्यात वातावरणही  वेगळ्या प्रकारचे असते. या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. म्हणूनही आरोग्याच्या दृष्टीकोनातून मांसाहार टाळणे आवश्यक असते.

तसेच, अनेक प्रमुख हिंदू सण श्रावणमध्ये येतात जसे की  कृष्ण जन्माष्टमी, रक्षा बंधन आणि नाग पंचमी. त्यामुळे पवित्र श्रावण महिन्यात मांसाहार टाळावा, असे सांगितले जाते.

श्रावण महिना हा सर्व प्राण्यांचा प्रजनन काळ मानला जातो, मग ते जलचर असोत किंवा इतर प्राणी. हा महिना प्रेमाचा देखील प्रतीक आहे आणि हिंदू धर्मात कोणत्याही सजीवाला मारणे हे पाप मानले जाते.

Fasting and health in the month of Shravan 2023

श्रावण महिन्यात उपवास का करावा ?

श्रावण महिना हा वर्षा ऋतूची सुरुवात असते यामध्ये सूर्यप्रकाश कमी प्रमाणामध्ये पडत असतो त्यामुळे आपली पचनक्रिया मंद झालेली असते यामध्ये भूक जाणवत नाही .आणि अन्न पचायलाही जास्त वेळ लागतो . यामध्ये उपवास केल्यास पचायला हलके पदार्थ खाल्ल्यास आपला अग्नी म्हणजेच पचनशक्ती वाढते. या ऋतूमध्ये पचनाचे आजार वाढत असतात त्यामुळे पचायला हलके असणारेअन्न खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरते.

Fasting and health in the month of Shravan 2023

श्रावण आहार:-

या पदार्थांचा करा समावेश

Fasting and health in the month of Shravan 2023

श्रावण महिन्यामध्ये उपवास करताना नेमके काय खावे हा प्रश्न बराच वेळा पडतो. त्यावेळी तुम्ही दूध ,दही, ताप ,राजगिरा ,खजूर, नारळ ,शेंगदाणे अशा पदार्थाचे सेवन करावे. या उपवासामध्ये तुमचे शरीर हायड्रेट राहावी त्यासाठी दिवसभरामध्ये चार ते साडेचार लिटर पाणी प्यावे. यामध्ये भरपूर पोषक तत्वे असलेली लिंबू पाणी नारळ पाणी यांचा देखील सामावेश करावा.यात,संत्रे , लिची, ,द्राक्ष किंवा कोणतेही हंगामी फळे अशा फळांच्या सेवनाने तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते. तुम्ही जर केळी,सफरचंद, ,डाळिंब. नासपती, मनुके, किवी, , अननस अशा फळांचे उपवसदरम्यान सेवन केले तर तुम्हाला अधिक प्रमाणात फायबर मिळते.

श्रावण महिन्यात तुम्ही बटाटा, सुरण,रताळे, अशा भाज्यांचा आहारात समावेश करावा.  यामुळें तुमच्या शरीरातील ऊर्जा निर्माण करून तुमचे शरीर निरोगी राहील.तुम्ही राजगिरा, शिंगाडे, अरारूट,साबुदाणे यांचे पीठ बाजारात तसेच किराणा दुकानात सहज मिळतात, किंवा तुम्ही घरी देखील बनवू शकतात. दरम्यान या पीठांचा तुम्ही पुरी, भाकरी, थालीपीठ बनवून छान बटाट्याची कडी बनवून खाऊ शकता.

ड्राय फ्रूट्स हे एक उत्तम पोषक अन्न आहे. ज्याच्या सेवनाने तुमचे पोट भरलेले राहील. तुमच्या आहारात काजू, बदाम, मनुका, अक्रोड यांचा समावेश करा. हे ड्राय फ्रूट अधिक पौष्टिक असतात आणि हे ड्राय फ्रूट शरीरात ऊर्जा राखून ठेवतात.

उपवासाचे फायदे:

 

Fasting and health in the month of Shravan 2023

तज्ञांच्या मते उपवास योग्य पद्धतीने केल्यास शरीरासाठी चांगलीच असते . उपवासाच्या दिवशी आहारामध्ये फळांचा वापर केल्यास नक्कीच लाभदायक ठरते.

मागील काही वर्षापासून उपवासाचा एक नवा ट्रेंड आला आहे. यामध्ये तोंडावर ताबा राहत नाही .त्यामुळे वजन कमी होत नाही . पण जर श्रावणात उपवास केले तर आपोआपच आपले वजन नियंत्रणात येईल असे बरेच जण विचार करत असतात .त्यामध्ये डायटिंग साठी उत्तम श्रावण उपवास या दृष्टीने पाहत असतात . यामध्ये उपवास श्रद्धापूर्वक केल्यास उत्तमच असते . परंतु या सर्वांसोबत तुम्हाला तुमच्या आरोग्याला उपवास मानवतोय का नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.

श्रावण महिन्यामध्ये जर उपवास ठेवला तर तुम्ही आरोग्य संबंधित अनेक समस्या टाळता येतात यामध्ये पोट दुखी, गॅसेस, ऍसिडिटी ,बद्धकोष्टता ,अपचन च्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो त्याचबरोबर उपास केल्याने भूक चांगले लागते व वजन कमी होण्यास देखील मदत होते .उपवासाच्या वेळी द्रव पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जातात. त्यामुळे आपल्या शरीर हायड्रेट राहते. आपल्या आहाराचा थेट परिणाम हा आपल्या शरीरावरती त्वचेवरती होत असतो. उपवास केल्याने  रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर शरीरामध्ये साखरेची पातळी नियंत्रणात राहण्याची मदत होते.उपवासामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

Fasting and health in the month of Shravan 2023

शास्त्रीय कारण:

श्रावण महिन्यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते .त्याच बरोबर आपली पचनक्रिया कमकुवत होते. पचन मंद गतीने होत असते. या वातावरणामध्ये संक्रमणाचा धोका व सर्व आरोग्य संबंधित समस्या जास्त होत असतात. यामध्ये आपण मांसाहार करत असेल तर आपली आरोग्य आणखीन बिघडण्याची शक्यता असते. यामध्ये सातत्याने पडणारा पाऊस त्यामुळे बुरशी आणि विषाणूची ही संक्रमण वाढू लागते.

या महिन्यामध्ये सूर्यप्रकाश कमी प्रमाणामध्ये पडत असतो .त्याचा परिणाम अन्नपदार्थावरती ही होत असतो. त्यामध्ये अन्नपदार्थ लवकर संक्रमित होतात व त्या अन्नपदार्थाचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. यामुळे शरीरामध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते अशा विविध प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे या महिन्यांमध्ये शक्यतो मांसार टाळावा.

मानवी शरीर हवा, सूर्यप्रकाश, माती आणि पाणी यांसारख्या विविध नैसर्गिक घटकांपासून बनलेले असल्याने, एखाद्याची कमतरता आपल्या शरीराच्या कार्यामध्ये गुंतागुंत करू शकते आणि आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करू शकते.

पावसाळ्यात जीवाणू आणि रोग जास्त प्रमाणात आढळतात कारण ओलसर परिस्थिती त्यांची वाढ आणि संक्रमणास प्रोत्साहन देते. श्रावण महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते. पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे अनेक आजार बळवत असतात त्यामुळे पोटांच्या बऱ्याच समस्या देखील या महिन्यांमध्ये होतात. या महिन्यात उपवास केल्याने रोजच्या जेवणामध्ये पालेभाज्यांचाही समावेश केला जात नाही त्यामुळे तुम्ही संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्यास मदत होते.

निष्कर्ष:

शास्त्रीय दृष्ट्या उपवास आरोग्यासाठी लाभदायक आहे .परंतु प्रत्येकाची प्रकृती भिन्न प्रकारची असते .त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून उपवास करावा.

Fasting and health in the month of Shravan 2023

 

 

Leave a comment