Do 15 minutes every day: lose weight

Do 15 minutes every day: lose weight

 

आताच्या काळामध्ये प्रत्येकाला घाई गडबड आहे .त्यामुळे बऱ्याच वेळा एक्सरसाइज करण्यासाठी वेळ मिळत नाही असे आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो.वजनावर नियंत्रण मिळवणे हे सध्याच्या काळामध्ये समस्या निर्माण झाली आहे. वजन वाढण्याची प्रमाण हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत दिसत आहे. यामुळे हार्ट अटॅक ,ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल, गुडघे दुखणे यांसारख्या व्याधीचे प्रमाण वाढले आहे.आपले वजन नियंत्रण ठेवण्यासाठी आपली पचनक्रिया व्यवस्थित चालणे महत्त्वाचे असते.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला घराबाहेर पडण्याचा कंटाळा वाटत असल्यास किंवा व्यायामासाठी बाहेर जाणे शक्य होत नसल्यास आपण घरी योगाभ्यासाची मदत घेऊ शकतो.जेवणानंतर आपण दहा ते पंधरा मिनिटं वेळ काढून वज्रसन करावे.त्यामुळे आपले अन्नपचन चांगल्या पद्धतीने होईल व आपल्याला वजन नियंत्रणात येण्यासाठी फायदा होईल.वजन नियंत्रणात येण्यासाठी वज्रासन हे फायदेशीर आहे.हे आसन आपण जेवणानंतर करू शकतो . जेवणानंतर केल्यास आपणास चांगला लाभ होऊ शकतो.पचन चांगले होण्यासाठी हे दोन नियम पाळावे.1.जेवणापूर्वी चाळीस मिनिटे पाणी प्यावे.2.जेवणानंतर एक दोन घोट पाणी प्यावे व एक तासाने पाणी दोन ते तीन ग्लास पाणी प्यावे.

Do 15 minutes every day: lose weight

 

 

वज्रासनाचे फायदे:

 • वज्रासनामुळे पचनक्रिया चांगल्या पद्धतीने कार्यकर्ते व अपचन किंवा बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात.
 • अन्नपचनास मदत होते.
 • वजन नियंत्रणात येण्यासाठी वज्रासन हे फायदेशीर आहे.
 • पचनक्रिया चांगली राहिल्यामुळे अल्सर सारखे आजार किंवा ऍसिडिटी यासारखे विकार दूर होण्यास मदत होते.
 • वज्रासनामुळे आपल्या मांडीचा व पायाच्या पोटरी चा भाग मजबूत होतो व पाठीचा कणा सरळ राहिल्यामुळे पाठदुखीला ही आराम मिळतो.
 • वज्रासन हे ध्यानासाठी ही उपयुक्त आहे.
 • पायांच्या मसल्स वरती जास्त दाब पडल्यामुळे ब्लड सर्कुलेशन ही चांगल्या पद्धतीने होते.

Do 15 minutes every day: lose weight

वज्रासन करण्याची कृती:

 • आपले पाय वाकवा आणि गुडघ्यावरती बसा .
 • दोन्ही पायाचे पंजे उलट्या स्थितीमध्ये मागे खेचा .
 • व पंजावरत्यावरती सावकाश बसा.
 • तुमचे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा पाठीचा कणा ताट राहील व मान सरळ राहील.
 • डोळे बंद करा. व आपले लक्ष श्वास आत मध्ये येताना व श्वास बाहेर जाताना या हालचाली वरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
 • वज्रासन हे 5 मिनिटांपासून सुरुवात करावी .
 • या आसनाचा कालावधी हळू हळू वाढवावा आणि साधारणपणे 25 ते 30 मिनिटापर्यंत करावे.

वज्रासन करण्यापूर्वी:

 • गुडघ्याला पायाला काही दुखापत झाली असल्यास करू नये.
 • हर्निया, अल्सर, यासारखे विकार असल्यास तज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा.
 • Do 15 minutes every day: lose weight आपण वज्रासन करून आपले वजन कमी करू शकतो व आपली पचनक्रिया चांगली होण्यास मदत होईल.

निष्कर्ष:

आपल्या दैनंदिन जीवनातून काही वेळ आपल्या शरीरासाठी देणे आवश्यक आहे. परंतु आपल्या शक्य नसल्यास आपण छोट्या छोट्या गोष्टी अमलात आणून आपण आपले शरीर सुदृढ व निरोगी ठेवू शकतो.

 

 

2 thoughts on “Do 15 minutes every day: lose weight”

Leave a comment