child stress management

child stress management

मुलांचा होणारा चिडचिडेपणा_

ताण तणाव मनुष्य जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. परंतु त्यात आता मुलांचाही ताण तणाव मध्ये समावेश झालेले चित्र दिसते. ताण हा शारीरिक व मानसिक स्वरूपाचा असतो. धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मनुष्याला विशेष करून कुटुंबासाठी वेळ मिळत नसल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये मनुष्याच्या कामाच्या स्वरूपामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे त्याला कुटुंबासाठी किंवा मुलांसाठी खूप कमी प्रमाणामध्ये वेळ मिळतो. .यामध्ये आधुनिक उपकरणे मोबाईल ,टीव्ही, लॅपटॉप ,अशा विविध गोष्टीचा वापर आपण मुलांना शांत करण्यासाठी उपयोग करत असतो.अशा गोष्टींमुळे मुलांमध्ये एकटेपणाची भावना वाढीस लागते त्यांच्यामध्ये भीती व चिडचिडेपणा यासारख्या गोष्टीं मुलांमध्ये दिसून येतात. .आपला वेळ हा काही प्रमाणामध्ये मुलांसाठी किंवा कुटुंबासाठी दिला पाहिजे त्यामुळे मुलांमध्ये मित्रपूर्ण संबंध बनतात व मुलांमध्येही सकारात्मक दृष्टिकोन वाढण्यास मदत होते. मुलांमध्ये एकटेपणाची भावना,भीती किंवा चिडचिडपणा इत्यादी गोष्टी कमी होतात.

child stress management

🔸ताण तणावाची कारणे:

1)मोबाइलचा वाढता वापर
2)बदललेली कुटुंब व्यवस्था
3)पालकांचे होणारे दुर्लक्ष
4)सोशल मिडियाचा वापर
5)वाढता ताणतणाव

child stress management

 

🔸मुलांचा होणारा चिडचिडेपणा कारणे परिणाम:

1.मोबाइलचा वाढता वापर:

मोबाईल वरती गेम खेळत बसणे, काही ना काही सातत्याने शोधत राहणे किंवा एकदा कंटेंट पाहत राहणे.आजकाल जेवण करताना मुलांना मोबाइल देणे  जणू काही फॅशन झाली आहे.पण मोबाइलचे अत्यंत घातक परिणाम मुलांवर होत आहेत हे माहिती असूनही आपण त्याचा गांभीर्याने विचार करत नाही.मोबाइलच्या अति वापराने मुल रागीट आणि चिडचिडी होत आहेत.मोबाईलच्या अतिवापरामुळे मुले भावना शून्य व संवेदनशील होत चालली आहे.त्यांची शारीरिक क्षमता व मानसिक क्षमता ही कमकुवत होत चाललेली आहे.अगदी कमी वयामध्ये चष्मा लागणे,केस पिकणे, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणे, डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे बनणे, अशी विविध लक्षणे दिसून येत आहेत.

2.बदललेली कुटुंब व्यवस्था:

मी व माझे या विचारसरणीमुळे आधुनिक काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धती वाढत चाललेले चित्र आपल्याच दिसत आहे.पूर्वी एकत्र कुटुंब व्यवस्थेमुळे मुलांवरती घरातील सर्व सदस्यांचे संस्कार होत होते.पण आता पालक विभक्त कुटुंब पद्धती पसंत करतात.मुलांना आजी-आजोबा, काका-काकी,मोठा भाऊ,बहिण यांच्याकडून मिळ्णार्या संस्कारांवर मर्यादा निर्माण झाल्या.पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांवरती चांगल्या पद्धतीचे संस्कार होत होते मुलांची सकारात्मक भावना वाढण्यास व मनोबल वाढण्यास मदत होते परंतु आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या सर्व गोष्टींपासून मुले वंचित राहता आहेत.. या सर्व गोष्टींमुळे मुलांमध्ये नकारात्मकतेची भावना वाढत आहे.

3.पालकांचे होणारे दुर्लक्ष:

वाढत्या गरजा भागवण्यासाठी आई-वडील दोघांनाही पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असल्याने त्यांचे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. मुलं एकलकोंडी बनत आहेत.आपल्या पाल्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालक कमी पडत आहेत.

4.सोशल मिडियाचा वापर:

सोशल मिडियाच्या वापरामुळे जग जवळ येत आहे हे जरी खरे असले तरी त्याच्या दुष्परिणामांचा गांभीर्याने विचार करावा लागत आहे

सोशल मिडियावर दाखवण्यात येणाय्रा पोस्टचे अनुकरण मुले करत आहेत. त्यात चांगले वाईट हे पाहत नाहीत.दिखाव्याप्रमाणे प्रतिक्रिया देऊन रिकामे होतात.

5.वाढता ताणतणाव:

पालकांचा कामाचा स्ट्रेस आणि त्यामुळे निर्माण होणारा ताणतणाव यामुळे पालक घरात जसे वागतात त्याचे अनुकरण मुलांकडून होते.त्यामुळे मुलांना आपल्या रागावर नियंत्रण करता येत नाही.ते मनाविरुद्ध काही घडताच लगेच रिऍक्ट होतात.

🔸मुलांच्या चिडचिडेपणावर उपाय:

child stress management:

आजकाल आपण पाहतो,लहान मुलांमधील चिडचिडेपणा वाढत चालला आहे.यावर वेळीच उपाय केले नाहीत तर गंभीर प्रश्न निर्माण होतील. मुलांमधील चिडचिडेपणा विकोपाला जात असल्याचे चित्र आज समाजात पहावयास मिळत आहे.मुलांना रागावर नियंत्रण करता येत नाही.यामध्ये पालक व मुलांमधील नातेसंबंध दुरावत झालेली चित्र आपल्याला पहावयास मिळत आहे.या सर्व गोष्टींकडे आपण गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

1.मोबाइलचा कमीत कमी वापर

मुलांना मोबाइलचे व्यसन लावण्याऐवजी जेवण भरवताना मुलांना चांगले तात्पर्य असणाय्रा गोष्टी सांगा. त्यांच्याशी गप्पा मारत त्यांना बोलते करा.मुलांना त्यांच्या दिनक्रमाची विचारपूस करा.

 2.चुकांकडे जाणिव

मुलांच्या होणाय्रा बारीक-सारीक चुकांकडे दुर्लक्ष करु नये.

उदा.खोटं बोलणं, वस्तू फेकणे,वस्तू आपटणे इ. या बारिक वाटणाय्रा चुका पुढे जावून गंभीर रुप धारण करतात. त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे.

 3.मुलांशी मनमोकळ्या गप्पा

child stress management

मुलांना पालकांनी वेळ दिला पाहिजे. मान्य आहे ते फारसं शक्य नाही परंतु मुलांना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने गप्पा मारल्या पाहिजेत तरच मुले आपले विचार विनासंकोच पालकांना सांगतील. त्यातुन मुलांचा होणारा चिडचिडेपणा कमी होऊ शकतो.

 4.एकत्र कुटुंब पद्धतीत:

child stress management

आई-वडील जरी कामानिमित्त बाहेर जात असतील तर घरात मुले एकट्याने राहतात. त्यामुळे त्यांना आपल्या सर्व वस्तू एकट्याने वापरायची सवय लागते.अशी मुले जेव्हा समाजात वावरतात तेव्हा त्यांना आपल्या वस्तूला कोणी हात लावला तर पटकन राग येतो.परिणाम ती आक्रमक बनतात.म्हणून एकत्र कुटुंबात राहण्याचा शेअरिंग हा फायदा असू शकतो.

 5.गंभीर शिक्षा टाळणे :

child stress management

काही पालक रागाच्या भरात मुलांना गंभीर शिक्षा करतात.याचेच अनुकरण मुलांमार्फत केले जाते. मुले ही आपला राग याच पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात.म्हणून पालकांनी आपला राग सौम्यपणे व्यक्त करावा.

6.ताणतणावाचे समायोजन:

     बर्याचदा पालकांना कामाच्या ठिकाणी येणारा तणावामुळे त्यांच्या घरातील वर्तनात बदल होतो. त्याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर होतो. हे टाळण्यासाठी पालकांनी ताणतणावाचे नियोजन करावे.

 

 

1 thought on “child stress management”

  1. It’s really informative blog… Now a days many children are suffering with these issues … 👍🏻

    Reply

Leave a comment