Chaturmas

चातुर्मास आणि आरोग्य

Chaturmas

 

Chaturmas -मराठी महिन्यातील चौथा महिना म्हणजे आषाढ महिना. आषाढातील देवशयनी एकादशीपासून ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास समजला जातो.शयनी एकादशी पासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या क्षयेवर निद्रा घेतात म्हणून ही शयनी एकादशी असे म्हटले जाते.आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते. चातुर्मास हा चार महिन्यांचा असतो परंतु यावर्षी 2023 सालामध्ये चातुर्मास हा पाच महिन्यांचा असेल पंचांगानुसार श्रावण महिना मध्ये अधिकमास अधिकमासाची ओळख आणि महत्वआलेला आहे त्यामुळे यावर्षी आठ श्रावणी सोमवार पडतील.

चातुर्मास प्रारंभ 29 जून2023, गुरुवार, देवशयनी एकादशी पासून

चातुर्मास समाप्ती 23 नोव्हेंबर 2023, गुरुवार प्रबोधिनी एकादशीपर्यंत.

Chaturmas / Health आरोग्य

आयुर्वेदानुसार आषाढ महिन्यापासून पावसाळा सुरू होतो त्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी मंदावला जातो. चेतनाशक्ती वीर्य शक्ती इतर ऋतूंच्या मानाने कमी झालेली असते. प्रत्यक्षातही आपल्याला याचा अनुभव येत असतो साक्षात चैतन्यच मंदावते की ताकद उत्साह, वीर्यता कमी होत.चातुर्मास व्रते म्हणजे आषाढ एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतच्या चार महिन्यात करावीची व्रते यात मुख्यत्वे खालील व्रतांचा समावेश होतो.

उपवास /  एक वेळ भोजन ( Fasting )

श्रावण महिन्यात पावसाळा सुरू होतो.पावसाळ्यामध्ये पोटातील अग्नी मंदावतो. पचन संस्थेवर ताण येऊ नये म्हणून उपवास केला जातो.पावसामुळे सूर्यदर्शन होणार नाही त्या दिवशी शक्यतोवर जेवण करू नये असे म्हटले जाते यावरून चातुर्मासातील एक वेळ भोजन याव्रता मागे आरोग्य रक्षणाची कल्पना असल्याचे स्पष्ट होते.उपवास केल्या मुळे शरीरातील दोष पचून जातात . शरीर हलके होते आरोग्य व्यवस्थित राहते तहानभूक नीट लागते अन्नiत रुची वाढते सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताकद आणि वृद्धी होते.चातुर्मासात मांसाहार हा केला जात नाही उलट प्रकृतीला अनुकूल असे साधे हलके अन्न सेवन केले जाते.

मौनव्रत ( Silence )

मौन म्हणजे अर्थात न बोलणे आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात संपूर्ण मौन पाळणे अशक्य आहे. निदान कमीत कमी म्हणजे जेवढे अगदी आवश्यक आहेत. तेवढेच बोलणे वायफळ गप्पा न मारणे इतरांची निंदा नाल असती न करणे. या प्रकारे तीन मौन सांभाळून येऊ शकतात .आरोग्याच्या दृष्टीने मौन धारणेचे प्रयोजन शक्ती रहास होऊ न देणे असते कारण बोलण्यामुळे खूप शक्ती खर्च होत असते.

दीप पूजा ( Deep Pooja )

आषाढातील अमावस्येच्या निमित्ताने दीप पूजा केली जाते. दीप हे प्रकाशाचे, तेजाचे ,अग्नीचे रूप आहे. शिवाय दीपदर्शन हे मंगलदायक समजले जाते. वर्षा ऋतूमुळे मंदावलेल्या अग्नीला उत्तेजना मिळावी. कमी झालेली शरीर शक्ती पुन्हा ताजीतवांनी व्हावी म्हणून दीपपूजा केली जाते.

निसर्गाशी जवळीक

चातुर्मासात पिंपळ, तुळस या वनस्पतींची पूजा, सेवा, प्रदक्षिणा घालण्यात सांगितले जाते. आयुर्वेदात अनेक ठिकाणी वनस्पतींची पूजा सेवा करायला सांगितले आहे. उदाहरणार्थ औषधे म्हणून वनस्पती उपटण्यापूर्वी त्याची पूजा केली जाते. औषधे बनवताना विशिष्ट मंत्र म्हणून विशेष वनस्पती आत टाकल्या जातात वगैरे. चातुर्मासात नेमका याच दोन वनस्पती निवडण्यामागे आरोग्याचा विचार महत्त्वाचा दिसतो.

तुळस

Chaturmas

सर्दी ,खोकला, ताप, भूक न लागणे वगैरे पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या विकारांवर रामबाण उपाय म्हणजे तुळस;तुळस कफ वातशामक असते. जंतुनाशक असते. अग्नीच उत्तेजित करते.तुळशीच्या नुसत्याअस्तित्वाने किंवा तुळशीच्या केवळ संपर्कात आल्याने सुद्धा आरोग्याचे रक्षण होऊ शकते. भूतबादा वगैरे नष्ट होऊ शकते असे आयुर्वेदात सांगितले आहे म्हणूनच चातुर्मासा तुळशीची पूजा आरच्या तुळशीला प्रदक्षिणा घालण्यास सांगितलेले आहे.

पिंपळ

Chaturmas

पिंपळाची साल जुलाब उलट्या आव पडणे वगैरे विकारात औषध म्हणून वापरले जाते. पावसाळ्यात नेमके हेच विकार होण्याची शक्यता जास्त असते चातुर्मासात पिंपळाच्या झाडाची पूजा सेवा करायला सांगितली आहे जेणेकरून पिंपळाच्या संपर्कात राहिल्याने शक्यता हे विकार होणारच नाहीत.

21 पत्रांशी संबंध

Chaturmas

श्रावणात मंगळागौरीच्या व भाद्रपद हरतालिकेच्या निमित्ताने 21 पत्रांशी संबंध येतो या सर्व पत्रींच्या संपर्कांनी आणि पूजेनंतर दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून या पत्रिका काढा करून पिण्याची प्रथा असल्याने आरोग्य नीट राहण्यास मदत होते.

दूर्वा

Chaturmas

अश्विन कार्तिक हे दोन महिने शरद ऋतूचे असतात.अश्विनआतील ललितापंचमीच्या दिवशी ललिता देवीची दूर्वा वाहून पूजा केली जाते. दुर्वा खुडणे, दुर्वाच्या संपर्कात राहणे पित्तशामक असते शरदात वाढलेले पित्त कमी व्हावे म्हणून शितल गुणाच्या दुर्वा वाहून ललिता देवीची पूजा केली जाते.

स्त्रियांसाठी खास

नागपंचमी

Chaturmas

श्रावणातील पंचमी म्हणजे नागपंचमी. या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात या महिन्यांमध्ये शरीरात पित्त साठण्याची सुरुवात झालेली असते. हाता पायांच्या तळव्यावर मेहंदी लावणे हे पित्त शामक असते. श्रावण भाद्रपदात अशा प्रकारे पित्त साठूच दिले नाही तर येणाऱ्या शरद ऋतूमध्ये पित्ताचा त्रास होणार नाही.

हरतालिका

Chaturmas

हरतालिकेच्या दिवशी स्त्रिया फक्त फलाहार करतात. फळे रसधातू पोषक असतात. तसेच प्रकृतीनुरूप व योग्य प्रमाणात घेतल्यास विषद्रव्य काढून टाकण्याचे काम करतात. या दृष्टीने एक दिवस केवळ फलहार उत्तम असतो.

दिवाळी

Chaturmas

कार्तिकाच्या सुरुवातीला दिवाळीचा सण येतो. दीपपूजन, फटाके ,फराळाचे पदार्थ, उत्सव ,यांच्या साह्याने पावसाळ्यातील आलेली मरगळ पूर्णपणे दूर होऊन जाते. या दिवशी अग्नी प्रदीप्त झालेले झाल्याने लाडू ,अनारसे चकली, वगैरे पदार्थांचा आस्वाद घेता येतो .दिवाळीनंतर कार्तिक आतील द्वादशीला चातुर्मासातील व्रतांची सांगता करता येते.

 

अशाप्रकारे चातु चातुर्मासाचा संस्कृतीशी, देवधर्माशी जरी संबंध जोडलेला असला तरीही मनुष्याच्या आरोग्या ंच्या दृष्टीनेही विचार केलेला आहे. चातुर्मासातील व्रतवैकल्ये वैज्ञानिक पायावर आधारित आहे .शरीर- मन आत्म्यास आरोग्य मिळावे.उत्कर्ष व्हावा या हेतूने तयार केलेले आहेत वर्षात येणारे सण व्रतवैकल्ये कुठल्या ना कुठल्या फायद्यासाठी व विशिष्ट कारणासाठी आयोजित केलेली दिसतात.

 

3 thoughts on “Chaturmas”

  1. खरंच अगदी उत्तमरित्या आणि सोप्या भाषेत आपले सण आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला आहे. असेच नवनवीन लेख येत राहू द्या. 👌🏻👌🏻👌🏻

    Reply

Leave a comment