Blood Pressure Control

Blood Pressure 

अगदी अलीकडच्या काळामध्ये blood pressure हा सर्वांचा परिचयाचा शब्द झाल्याचा दिसते कारण अगदी कमी वयातच ब्लड प्रेशर सारखी व्याधी वाढलेली दिसते. रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या औषध उपचार केले जातो. आता धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये व स्पर्धेच्या युगात तणाव वाढल्याचे चित्र दिसते. त्यामुळे व्याधीचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसते.रक्तदाबाचा संबंध हृदयाशी आहे. आपल्या शरीरामध्ये हृदय हा महत्त्वाचा अवयव आहे.
हृद हे सातत्याने आकुंचन व प्रसरण पावत असते. त्या हालचालीमुळे आपल्या शरीरामध्ये शरीरभर रक्त फिरत असते. हे रक्त वाहत असताना जो दाब रक्तवाहिन्यांवर पडत असतो किंवा ज्या दाबाने रक्त संपूर्ण शरीर फिरत असते. त्या दाबाला रक्तदाब असे म्हणतात.रक्तदाबासाठी विशेष असे कोणते कारण दिसत नाही परंतु बदललेली जीवनशैली , कामाचे स्वरूप, खाण्यापिण्याच्या सवयी, अनुवंशिकता, व ताण तणाव यासारख्या गोष्टी काय प्रमाणात कारणीभूत ठरतात.

1.What should be the blood pressure?

रक्तदाब किती असावा?

सामान्य वयाची                  उच्च                              कमी

नॉर्मल                              120                               80

वाढलेले                            120-129                        80 पेक्षा कमी

हाय बीपी स्टेज                    1130-139                      80-89

हाय बीपी स्टेज 2                 140 पेक्षा जास्त                 90 पेक्षा जास्त

2.Blood Pressure Control: योगासने करून ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यास मदत होईल.

काही योगासने करून ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यास मदत होईल. कोणतीही औषधं खाऊन शरीरावर नको नको तेे साइड इफेक्ट्स करुन घेण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात योग करा.जाणून घेऊया कोणते योगासनामुळे फायदा होईल.योगासने करताना सकाळी रिकाम्या पोटी करावीत. व योगासने करण्यापूर्वी सूक्ष्म हालचाली त्याची पूरक असणे करणे आवश्यक आहे.योगासने करताना योग्य प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घ्यावे.

योगासने:

2.1विपरीतकरणी आसन:

1.योगासन करण्यासाठी भिंतीजवळ  चटई टाका व  नंतर पाठीवरती झोपा.

2.सुरुवातीच्या काळामध्ये भिंतीचा आधार घ्या व दोन्ही पाय आकाशाकडे वरती 90 अंशात उचला.

3.दोन्ही पाय डोक्याकडे घ्या. व दोन्ही हाताने आपल्या पाठीला सपोर्ट द्या.

4.व कंबर वर उचला आपल्या पाठीच्या पाठीमागे 45 अंशाचा कोण बनेल व आपले दोन्ही पाय वरती राहतील.

5.आपल्या डोळ्यांची नजर पायांच्या बोटाकडे राहील व आसन सोडताना सावकाश पाय डोक्याकडे न्या व आपले हात सावकाश खाली ठेवा आणि सावकाश दोन्ही पाय हळूहळू खाली घ्या.

 

2.2मत्स्यासन:

1.चटईवर पद्मासनात बसा.
2.दोन्ही कोपऱ्याचा आधार घेत सावकाश पाठीवरती झोपा.
3.दोन्ही हात खाली टेकवा व मांडी जवळ राहतील.
4.दोन्ही हात मांडीखाली ठेवा आणि शरीराला आधार द्या.
5. कोपऱ्यांनी कंबर वरती उचला व चेहरा मागे ताणून ठेवा आणि छाती वरच्या बाजूस ताणून ठेवा व त्यावेळी डोक्याचा वरचा भाग 
6.जमिनीवरती टेकेल.
7.आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याला उजव्या हाताने पकडा व उजव्या पायाच्या अंगठ्याला डाव्या हाताने पकडा.
8.व अ स्थिती पूर्ण झाल्यानंतर सावकाश दोन्ही पायाचे पकडलेले अंगठी सोडा.
9.व सावकाश कोपऱ्याचा आधार घेत मान सरळ करा व सावकाश पाठ जमिनीला टेकवा. त्यानंतर दोन्ही पाय हळूहळू खाली सोडा.


 2.3.सेतुबंधासन:

1.चटई घ्या व  पाठीवर झोपा
2.दोन्ही पायांमध्ये थोडेसे अंतर घ्या.त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्या.
3.दोन्ही हातांनी आपल्या पायाच्या घोट्यांना पकडा.
4.व आपली कंबर वरती उचला आणि छाती हनुवटीच्या दिशेने खेचा.
5.त्यावेळी आपली हनुवटी वरती उचलायची नाही आपल्या छातीचा भाग अनवटीकडे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.
6.आसन स्थिती पूर्ण झाल्यानंतर सावकाश कंबर खाली घ्या.
7.व दोन्ही हात बाजूला घ्या आणि सावकाश दोन्ही पाय खाली सोडा.

2.4.उष्ट्रासन:

1. योगा मॅट जमिनीवर पसरवून सावकाश वज्रासनात बसा.
2.त्यानंतर गुडघ्यावरती उभा राहा.
3.दोन्ही गुडघ्यांमध्ये साधारण खांदेवडे अंतर घ्या.
4.दोन्ही हात समोरच्या दिशेला घ्या खांद्याच्या रेशेत.
5.आपला डावा हा डाव्या बाजूने सावकाश मागे घ्या व आपल्या डाव्या पायाच्या टाचेवरती ठेवा.
6.आणि आपला उजवा हात उजव्या बाजूने सावकाश मागे घ्या व आपल्या उजव्या पायाच्या टाचेवरती ठेवा.
7.व आपली कंबर पुढच्या बाजूस ताणण्याचा प्रयत्न कराप्रयत्न करा.
8.मान पाठीमागे घ्या.
9.आसन स्थिती पूर्ण झाल्यानंतर डावा हात सावकाश डाव्या बाजूने पुढे घ्या. व उजवा हात उजव्या बाजूने सावकाश पुढे घ्या.
10.आणि दोन्ही हात खाली घ्या सावकाश वज्रासनात बसा.

3. Routine दिनचर्या:


 आपल्या दिनचर्येत व्यायाम व्यायाम आणि सकस सकस आहारामध्ये राजगिऱ्याचे लाडू ,मुगाची डाळ, नारळ पाणी ,खजूर, केळी,
 टोमॅटो, पालक, गाजर,मुळा, कांदा ,आवळा,पपई, लिंबू  इत्यादी गोष्टीचा समावेश करा. आहारामध्ये मिठाचे व साखरेचे प्रमाण 
कमी करा. आहारामध्ये पोटॅशियमचे प्रमाण वाढवा. सिगारेट, अल्को, प्रक्रिया केलेले अन्न,  या गोष्टी टाळाव्यात. तुमच्या डॉक्टरांना
 नियमित भेट द्या आणि त्यांचा सल्ला घ्या.