baby tips

Baby Tips  बाळाची काळजी घेण्याबाबत टिप्स

 

मूल जन्माला येणार म्हणजे घरामध्ये एक आनंदाचे वातावरण तयार झालेले असते व त्याचबरोबर व्यवस्थित संगोपनाची पण जबाबदारी आलेली असते ती व्यवस्थित पार पडणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते विशेष करून त्याच्या आहार व स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते.साधारणपणे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर तीन ते पाच दिवसात हॉस्पिटल मधून घरी सोडले जाते किंवा सिजरिंग झाल्यानंतर साधारणपणे आठवड्याभरात घरी सोडले जाते त्यानंतर त्यानंतर बाळाची व्यवस्थित काळजी घेणे खूप गरजेचे असते. कोणत्याही पद्धतीने इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

 

types of newborn care:

Baby care
Baby care

स्वच्छते विषयी काळजी घ्या: 

अगदी सुरुवातीची पायरी म्हणजे स्वच्छता होय कारण बाळाला निरोगी ठेवण्यासाठी आईनेही स्वच्छते विषयी काळजी घेतली पाहिजे जसं की बाळाला घेण्यापूर्वी हात स्वच्छ धुऊन घेतली पाहिजे स्वतःही स्वच्छ कपडे घातले पाहिजेत आणि मुलाला सैल व सुती कपडे घातले पाहिजे.बाळाची ओले झालेली कपडे लगेच बदलावी ते जास्त काळ अंगावरती ठेवू नये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.व बाळाची नखे खूप वेगाने वाढत असतात त्यामुळे ती जर वेळेवर नाही कापली तर बरेच वेळा शरीरावरती बारीक जखम होतात.बाळाची नक्की ही अगदी नाजूक असतात त्यामुळे काढताना विशेष करून काळजी घ्यावी.

बाळाला हाताळणे:

बाळा घेण्यासाठी सर्वजणच घेण्यासाठी आतुर असतात परंतु बाळ हे अत्यंत नाजूक असते .ते घेत असताना आपल्याला काळजी घेणे खूप गरजेचे असते. बाळाला स्वतःची मान सावरता येत नसल्यामुळे आपल्याला एका हाताने डोक्याला व मानेला आधार द्यावा लागतो व दुसऱ्या हाताने तळ हातावरती पकडावे लागते.बाळाला हाताळताना प्रत्येकाने स्वच्छतेची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. बाळाला घेणे पूर्वी आपण आपले हात व कपडे स्वच्छ आहेत का नाही ते पहावे .बाळाला घेत असताना अगदी जोरात किंवा त्यावर दाब पडेल अशा पद्धतीने घेऊ नका कारण बाळाची शरीर हे खूप नाजूक असते.

अंघोळ घालताना घ्यावयाची काळजी:

बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी पाण्याची तापमान योग्य आहे का नाही याची खात्री करावी ते पाणी जास्त गरम किंवा अति थंड असू नये.सुरुवातीच्या काळामध्ये अंघोळ घालताना अनुभव असलेल्या व्यक्तीनेच अंघोळ घालावी कारण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये बाळ हे अत्यंत नाजूक असते. अंघोळ घालताना साबण हा सौम्य स्वरूपाचा असावा.

व बाळाला एलर्जी होत असेल तर कोणती बाह्य वस्तू वापरू नये उदाहरणार्थ बेसन लावणे, हळद लावणे. बाळाला आंघोळ घातल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे व स्वच्छ व सुती कपडे घालावेत.बाळाला आंघोळ करताना हळुवारपणे तेलाने मालिश करावी. व त्याच्या नाका तोंडात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.बाळाला आंघोळ करताना खोबरेल तेल किंवा बदाम तेल असे तेलाने हळुवारपणे मालिश करावी हे प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेले आहे. ही मालिश करत असताना कोणतेही केमिकल युक्त तेलाचा वापर टाळावा.

आईचे स्तनपान:

मूल जन्मल्यानंतर सुरुवातीचे काही महिने साधारणपणे सहा महिने बाळाला आईचे दूध द्यावे कारण आईचे दूध हे बाळासाठी उत्तम आहार असतो त्या दुधामध्ये विविध प्रकारची प्रथिने व घटक असतात त्यामुळे बाळाची वाढ चांगल्या पद्धतीने होते व बाळाची रोगप्रतिकारशक्ती ही खूप चांगली वाढते.आईच्या दुधामुळे आई मध्ये व मुलांमध्ये एक प्रकारचे घट्ट नाते तयार होते. व आईच्या अंगावर ही पुरेसे दूध येण्यासाठी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, डाळी,मासे, अंडी अशा विविध प्रकारच्या घटकांचा आहारामध्ये समावेश करावा.

परंतु त्यामुळे बाळाला त्रास होणार नाही याची पण काळजी घ्यावी.व पाणीही भरपूर प्यावे.बाळ स्तनपान करत असताना त्याला व्यवस्थित पद्धतीने श्वास घेता येतो की नाही ते आईने व्यवस्थित पाहावे.जर बाळाला बॉटल ने फीडिंग करत असाल तर ती बॉटल व्यवस्थित पद्धतीने स्वच्छ करून घ्यावी नंतरच दूध पाजावे.प्रत्येक वेळी जेवणानंतर किंवा दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावरती उभे स्थित धरून पाठीवरती हळुवार एक थाप मारावी व ढेकर बाहेर काढावी.

आईच्या त्वचेचा स्पर्श:

आई झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्पर्शाने बाळाला प्रेम व काळजी कळते. व स्पर्शमुळे बाळाला उष्णता व उबदारपणा मिळतो त्यामुळे बाळ निरोगी राहण्यास मदत होते.आईने छातीशी कवटाळावे व कुशीत घ्यावे. त्यामुळे बाळाला शांतपणे झोप लागण्यास मदत होईल.

झोपताना ची काळजी:

बरेच वेळा लहान मुले झोपताना खूप चिडचिड करतात, रडतात व उशिरानी झोपतात. व त्यांना होणारा त्रास ते सांगू पण शकत नाही. अशावेळी मुलांसाठी अंगाई गीत गावे व हळुवारपणे पाठीवरती थाप मारावी.आपल्याकडे नवजात बालकाला कपड्यांमध्ये घट्ट गुंडाळून ठेवण्याची प्रथा आहे परंतु आपल्याला असे वाटते यामुळे बाळाला काही त्रास तर होणार नाही ना पण गुडाळून ठेवल्यामुळे बाळाल गर्भाशयामधील उब जाणवते. त्यामुळे बाळाच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. व शांत झोप लागते. आरोग्यासाठी फायदेशीर आहे.बाळाला सातत्याने एकाच पोझिशनमध्ये झोपू नका नाहीतर डोक्याचा काही भाग सपाट होतो. त्यामुळे डोक्याची स्थिती झोपवताना बदलत जावी.

 

 

2 thoughts on “baby tips”

Leave a comment