Ash Gourd Juice Benefits in Marathi

Ash Gourd Juice Benefits in Marathi

कोहळा रस पिण्याचे फायदे

भोपळ्यासारखी दिसणारी ही भाजी अनेक पोषक तत्वांनी युक्त आहे.कोहळ्याचे अनेक प्रकारे सेवन केले जाते. काही लोक त्याची भाजी बनवून खातात, तर काहींना मिठाई बनवून खायला आवडते. पण तुम्ही कधी कोहळ्याचा रस प्यायला प्यायला आहे का?कोहळ्याचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. कोवळ्याचे रसामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयुक्त आहे.

या रसामुळे शरीरामध्ये साठलेली घाण (डिटॉक्स होते )बाहेर काढून टाकण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.सर्वसामान्यपणे रोजच्या वापरात कोहळा ही भाजी दिसत नाही .परंतु कवळ्याची अनेक सारे फायदे आहेत हे ऐकून आपल्याला असे वाटेल की नियमित किचनमध्ये कोहळा असावा. कोवळ्याच्या ज्यूस चे अनेक सारे फायदे आहेत .त्यामुळे शरीरातील अनेक विकार दूर होण्यासाठी ही मदत होते.

आपण शरीराच्या बाह्य स्वच्छतेची खूप काळजी घेत असतो. त्यासाठी आपण विविध प्रकारचे साबण व क्रीम्स यासारख्या गोष्टींचा उपयोग करत असतो. परंतु बाह्य स्वच्छतेबरोबरच आपल्या शरीरा अंतर्गत स्वच्छता तेवढीच महत्त्वाची आहे .
शरीराला डिटॉक्स करण्याची आवश्यकता असते.शरीर डिटॉक्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये नको असलेले घटक शरीराच्या बाहेर पडणे. कारण आजकालच्या वेगवान जीवनामध्ये निरोगी अन्न खाल्ले जात नाही .त्यामध्ये बेकरी पदार्थ ,पिझ्झा बर्गर ,पॅक बंद खाद्यपदार्थ ,मिठाई ,तळलेले किंवा साखरेचे पदार्थ हे खाण्यामध्ये येत असतात. अशा विविध पदार्थामुळे आपल्या शरीरामध्ये कितीतरी  विषारी घटक जमा होत असतात. याची कल्पना आपल्याला नसते.

आयुर्वेदानुसार कोहळा त्याच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखला जातो. विषाणूजन्य संसर्गावर ही घरगुती उपाय म्हणून फार पूर्वीपासून कोहळ्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर कोहळा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर ठरू शकतो.

आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते कोहळ्यांचा उपयोग ब्रेन टॉनिक म्हणून केला जातो. पित्त आणि वात शांत करण्यास उपयोग होतो. मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम असे अन्न आहे. त्याचबरोबर मन शांत होते व तणाव कमी करण्यास मदत होते.

कोहळ्याची विविध भाषांमधील नावे:.

कोहळा रस पिण्याचे फायदेहिंदीे :सफेद पेठा

मराठी: कोहळा

संस्कृतः कुष्मांडा, कुष्मांडम

इंग्रजी : ash gourd, wax gourd

गुजराती: कोलू

बंगाली: कुमरा, चल कुमरा

तमिळः नीर पुस्निकाई

तेलुगुः बडीज गुम्मदिकाया

कन्नडः बुडुगुंबला

आसामी : कोमोरा

मल्याळमः कुंभलंगा

उर्दू: पेठा

Ash Gourd Juice Benefits in Marathi

कोहळाचे पौष्टिक असलेली पोषकतत्त्वे :

कॅलरी : 17Kcal

कोलेस्टेरॉल : ०.०० ग्रॅम

कर्बोदके:4 gm

मॅग्नेशियम:3% मिलीग्राम

प्रथिने:0.5 gm

 सोडियमः145 मिलीग्राम

फायबर:3.8 gm

पोटॅशियम:7.9 मिलीग्राम

चरबी :0.3 gm

कॅल्शियम 2%

व्हिटॅमिन बी:60%

लोह 2%

व्हिटॅमिन C:2%

फॉस्फरस : 5.०%

जस्तः 7.2%


मँगनीज :12.5%

कोहळा रस बनवण्याची पद्धत:

कोहळा रस पिण्याचे फायदे

कोळ्याचा रस बनवण्यासाठी साधारणपणे दीड किलोच्या पुढील कोहळा घ्यावा.यामध्ये रसाचे प्रमाण जास्त असते. सुरुवातीला कोहळा आवश्यकतेनुसार कापून घ्यावा. व वरील हिरवी साल काढावी. त्यानंतर आत मधल्या असणाऱ्या बियांचा भाग कापून बाजूला काढावा. व राहिलेला गर त्याचे तुकडे करून मिक्समध्ये टाकून ते बारीक करावे. व थोडेसे पाणी घालावे. त्यानंतर गाळणीने गाळून ग्लासामध्ये घ्यावे.हा रस काही न मिसळता साध्या स्वरूपात आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.

कोहळा रस उपाशीपोटी  घ्यावा:

कोळ्याचा रस सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी एक ग्लास प्यावा. त्यामुळे शरीरामध्ये असलेली विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत होते व दिवसभर शरीरामध्ये उत्साह आणि ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते . अनेक ठिकाणी कोहळ्याचा वापर केला जातो यामध्ये ऋतुमान बदलल्यामुळे होणारे आजार या रसामुळे बरे होतात असा अनेकजणांचा अनुभव आहे .औषधी गुण आणि जीवनसत्त्वामुळे तब्येतीत सुधारणा होते .बरेच जण वजन कमी करण्यासाठी या रसाचा उपयोग करतात.

कोहळा रस पिण्याचे फायदे:

वजन कमी करण्यासाठी:

कोवळ्याच्या ज्यूस मध्ये अतिशय कमी प्रमाणात कॅलरीज असतात. व यामध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कोहळा हा उपयुक्त मानला जातो. कोहळ्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते त्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते आणि सारखी भूक लागण्याचे प्रमाणही कमी होते त्यामुळे जेवणाचे प्रमाण आपोआप कमी होऊ लागते.त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

शरीरातील विषारी द्रव्य काढणे:

चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे बरेच आजार ह्या कोवळ्याच्या रसामुळे काही दिवसातच कमी होण्यास मदत होते. शरीरामधील साठलेली गहाण बाहेर पडते. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य कमी होतात.कोहळ्यामुळे चांगले प्रकारचे जिवाणू तयार होण्यास मदत होते व आपल्या शरीरामधील आतड्यांची सफाई चांगल्या प्रकारे होते त्यामुळे शरीर शुद्ध होते. व मानसिक आजार ही दूर राहतात.

शरीर थंड ठेवण्यास मदत करते:

कोहळ्याचा रस शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो.उन्हाळ्यामध्ये कोहळ्याचा ज्यूसपणे जास्त फायदेशीर असते त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणास ठेवण्यास मदत होते व उष्णतेपासूनही सुटका होते.

उत्साहीपणा वाढतो:

कोहळ्यामध्ये अनेक शरीराला आराम देणारे घटक असतात त्यामुळे जडपणा, थकवा यासारखे विकार दूर होतात.कोळ्याच्या रसामध्ये कॅल्शिअम, झिंक, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन या प्रकारचे अनेक पोषक घटक असतात त्यामुळे शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

अ‍ॅसिडिटी कमी करते.

आपल्याला अ‍ॅसिडिटी च्या समस्या असल्यास कोहळ्याचा रस खूप गुणकारी आहे. कोळ्याचा रस दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यावा. त्यामुळे आपले आम्लपित्तापासून आराम मिळण्यास मदत होते.त्याचबरोबर अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता वअल्सर यासारख्या त्रास ही कमी होण्यास मदत होते.

 निष्कर्ष:

कोहळा हा इतर भाज्याप्रमाणेच आहे.परंतु याचा उपयोग आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे.. तसेच याच्या सेवनाने शरीर निरोगी व स्वस्त ठेवण्यास मदत होते. कोहळ्याच्या रसाने किंवा सेवनाने शरीरामध्ये खूप चांगले परिणाम दिसून येतात. कोहळाचे सेवन नियमित करू शकता किंवा आठवड्यातून चार दिवस करू शकता.

कोहळा रस पिण्याचे फायदे

Leave a comment