Adhikmas 2023

Adhikmas 2023

Adhikmas

Adhikmasअधिकमास म्हणजे काय? दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिकमासा बद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात अनेक प्रश्न नेहमीच जागत असतात अधिक मास म्हणजे काय? तो का येतो ?त्या महिन्याचे महत्व काय? त्या महिन्यात काय करावे ?काय करू नये? त्या महिन्याचे महत्व काय? त्या महिन्यात करावयाची दान, पूजा ,व्रते यांची गरज काय? त्यातून मिळणारी फलश्रुती काय? याविषयी आपल्या मनात नेहमीच कुतूहल आणि जिज्ञासा असते.

2023 मध्ये अधिकमास 18 जुलै 2023 पासून सुरू होईल तर 16 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल. या महिन्याला भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना म्हटलं जातं. हा महिना श्रावण महिन्यातच सुरू होणार असल्याने महादेवाची भक्ती करणाऱ्यांना अधिक वेळ मिळणार आहे.

Adhikmas अधिकमास म्हणजे काय? तो का येतो?

पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवर केली जाते. सूर्यगतीवरून केला जाणाऱ्या कालगणनेला सौरवर्ष तर चंद्राच्या गतीवरून केल्या जाणाऱ्या गणनेला चंद्रवर्ष असे म्हणतात. या दोन्ही कलागणांमध्ये दरवर्षी 10 -11 दिवसाचा फरक पडतो आता हा प्रत्येक वर्षी पडणारा दहा अकरा दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकरांनी दर तीन वर्षांनी एक जास्तीचा जास्त मासाची योजना केली आहे यालाच अधिक मास असे म्हणतात.

सूर्य हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत म्हणजेच बारा महिन्यात बाराही राशीतून संक्रमण करीत असतो. सूर्याप्रमाणेच चंद्र सुद्धा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रेभोगीत असतो मात्र चंद्र- सूर्याच्या कालगणनेतील हा 10 -11 दिवसांचा दरवर्षी होणारा फरक भरून काढण्यासाठी जो अधिक मास येतो त्यात मात्र सूर्य संक्रमण होत नाही सूर्य- संक्रांत नसलेल्या त्या चंद्रमासात म्हणजेच अधिक मासात वातावरण हे गढूळ ,मलिन असते या त्यांच्या मलीनेतेवरूनच त्याला मलमास असेही म्हणतात.

हा मलमास सर्व मंगल कार्यासाठी जरी निषेध मांडला असला, तरीसुद्धा हा अधिक मासात स्नान ,दान, पूजा ,जब इत्यादी जी धर्मकृत्य केली जातात त्यांचा फल मात्र उपासकाला अधिक प्रमाणात नक्कीच मिळते .अधिक महिन्यात केलेल्या तीर्थयात्रा पवित्र क्षेत्रातील पुण्य पावन नद्यांची स्नाने केलेली विविध दान जप आणि पूजन याचे फल अधिक; कारण मलमासाचा प्रत्यक्ष श्रीकृष्णाने स्वीकार केला आहे आणि त्या मासाला पुरुषोत्तम मासा हेही नाव दिले आहे तसेच या अधिक महिन्यात अर्थात पुरुषोत्तम मासात केलेल्या धर्म चरणाला अधिक फलप्राप्तीचे वरदानही दिलं आहे त्यामुळेच हा अधिक मासाचा महत्त्व आणि महात्मे हे पण फार थोर आहे.

Chaturmas Ajun mahiti sathi ya link war click kara.

Adhikmas अधिकमासाचे महत्व

”अधिकस्य अधिक फलम”

या अधिक मासात पूजा- अर्चा देवधर्म दान ,स्नान ,जप्, तीर्थटन इ करतील त्यांना ‘अधिकस्य अधिक फलम ‘या न्यायाने जास्तीत जास्त चांगले फळ सुखआणि समाधान व शेवटी भगवत कृपा प्राप्त होईल या महिन्यात दानाला फार मोठे महत्त्व आहे मग ते दान अन्न वस्त्र किंवा धनाचे असेल या महिन्यात जावयाला सुद्धा दान दिले जाते त्याला धोंड्याचा महिना Dhodyacha Mahina असेही म्हणतात. कळत नकळत हातून घडलेल्या अन घडणाऱ्या पापांचे शालन करून घ्यायला शीघ्र फलप्राप्तीसाठी श्रीमत नारायणाच्या कृपाप्राप्तीसाठी सहज तीन वर्षांनी येणाऱ्या या महिन्यात प्रत्येकानेच त्यांचे यथाशक्ती यथामती का होईना पण पालन करायलाच हवे.

Adhikmas आरती | पुरुषोत्तममास आरती 

जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम । सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ धृ० ॥
दीन म्हणोनी कृष्णे उद्धार केला ॥ निज नामे ‘पुरुषोत्तम’ धन्य तुला केला ।। दाने त्यागे स्नाने पूजा जप माला ।। व्रताचरण फलदायी निश्चय ठरवीला ।। निःस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य ।। सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ।। जय जय अधिकमास ० ॥ १ ॥
पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला । मेधावी-कन्येला तो नच आवडला । परि शिवपूजा करण्या सांगुनिया तिजला || पांडवपत्नी म्हणूनी जन्म धन्य केला ॥ वनवासी पंडुसुता कथिले महिमान || सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिकमास० ॥ २ ॥
अधिक मासामाजी दाने जे देती । दीप निरंतर देवापुढती लाविती ॥ राधाकृष्णांची ही पूजा जे करिती ।। अथवा उपवासा मासभरी धरिती ।। अनारसे तेहतीस जामाता दान ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ जय जय अधिकमास० ॥ ३ ॥
दृढधन्व्याला पोपट करितो उपदेश ।। गतजन्मीची सांगे पुण्याई त्यास । अधिक मासी घडता स्नाने उपवास ।। पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास ॥ सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ जय जय अधिकमास०॥४॥
रानी मणिग्रीवाते उग्रदेव बोले ।। पुरुषोत्तम मासाचे व्रत त्या सांगितले ॥ त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले ॥ चित्रबाहु म्हणुनिया वैभव भोगियले ॥ सहज जरी व्रत घडले तरि होई धन्य ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ जय जय अधिकमास० ॥ ५ ॥
कदर्यु आख्यान नारायण कथिती ।। दुर्गति होऊनियाही प्राप्त पुण्य अंती ॥ वानर-जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती ॥ मासभरी उपवासे तयास होई ती ।। कथा पुराणा मधल्या कित्येक अन्य ॥
सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ जय जय अधिकमास० ॥ ६ ॥
धर्म सत्य मर्यादा नीती आचरणी ।। कैसे पुण्य करावे दंपति जीवनी । अनेक ऋषि वचने ऐकावी श्रवणी ।। माहात्म्य पोथी वाचन करणे सर्वांनी ॥ निःस्वार्थे वागावे तोच धर्म मान्य ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ जय जय अधिकमास०॥७॥

3 thoughts on “Adhikmas 2023”

Leave a comment