60 Simple Marathi Mhani

Marathi Mhani (  मराठी म्हणी )

 

आज हा लेख मराठी मधल्या प्रसिद्ध म्हणींवर आहे.Marathi Mhani या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला काही म्हणी आणि त्याचे अर्थ सांगणार आहोत हा ब्लॉग लिहिण्याचा एकच हेतू आहे की आपल्याला या ब्लॉग मधील मराठी म्हणी सहज त्याचा अर्थ सांगणार आहोत.

60 Simple Marathi Mhani

अनुभव व्यक्त करण्यासाठी लहान लहान बोध देणारी अशी चटकदार वाक्य बोलण्यात येतात लोकांच्या बोलण्यातून ती प्रकटलेली असतात आणि त्याची यथार्थ त्याचा चटकदारपणा पटल्यामुळे ती वारंवार लोकांच्या बोलण्यात येतात.आपल्या आई-बाबांनी बराच वेळा बोलले असेल अंथरूण बघून पाय पसर त्याचा अर्थआपल्या ऐपतीनुसार वागणे अशा वाक्यांनाच म्हण असे म्हणतात म्हणीतून सूत्रमय पद्धतीने थोडक्यात शहाणपणाचे जणू सिद्धांताचे मांडलेले असते.म्हणी या लहान असतात परंतु याचा अर्थ खूप खोल आणि तंतोतंत असतो शहाणे लोक मराठी म्हणी समजतात आणि न समजणारे विचार करत राहतात.

चला तर मग पाहूया मराठी म्हणी आणि त्याचे अर्थ.

Marathi mhani आणि अर्थ

60 Simple Marathi Mhani

Marathi Mhani

अर्थ

1 वड्याचे तेल वांग्यावर  एकाचा राग दुसऱ्यावर काढणे.
2 नाचता येईना अंगण वाकडे एखादे काम आपल्याला व्यवस्थित जमत नसेल तेव्हा आपण आपला कमीपणा लपवण्यासाठी इतर गोष्टीत चुका  काढणे.
3 पाचाचे पाढे 55 कितीही समजून सांगितले तरी न समजले.
4 धाक ना ढगारा फुटका नगारा कोणाचीही परवा न करणारा.
5 असलं की लागतं नसलं की भागत नसेल तर भागवता येतं पण असेल तर अजून लागतं.
6 80 तिथे 85 थोडा खर्च झालाच आहे तर अजून थोडा होऊ द्या.
7 एक ना धड भाराभर चिंध्या एकही गोष्ट नीट न करता फाफट पसारा करणे.
8 गाढवा पुढे वाचली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता मूर्ख माणसाला समजून सांगण्यात काही उपयोग नाही.
9 म्हणी नाही भाव देवा मला पाव मनात नसताना देव भक्ती दाखवणे.
10 काखेत कळसा गावाला वळसा जवळची वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.
11 कुत्र्याचं शेपूट नळीत घातले तरी वाकडे माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही.
12 खान तशी माती आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वागणे असणे.
13 गर्वाचे घर खाली गर्विष्ठ माणसाची नेहमी शेवटी अपमानच होतो.
14 गोगलगाय अन पोटात पाय बाहेरून निर्मळ असणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती.
15 उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी जेथे उद्योग असतो तेथेच लक्ष्मी संपत्ती येते.
16 ऐकावे जनाचे करावे मनाचे जगाचे ऐकून घ्यावे पण मनाला जे योग्य वाटेल ते करावे.
17 खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी सर्व चांगलंच हवंय नाहीतर काही नको.
18 चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाला चांगले दिवस येतात.
19 चार जणांची आई बाजेवर जीव जाईल जबाबदारी प्रत्येकाची असली तरी मात्र काळजी कोणीच घेत नाही.
20 चोर सोडून संज्ञा न्याशालाच फाशी खरा अपराधी सोडून निरापदा निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
21 चोरावर मोर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला कमी लेखणे.
22 झाकली मूठ सव्वा लाखाची वाईट नेहमी झाकून ठेवावे.
23 दिव्याखाली अंधार मोठ्या माणसातही दोष असतात.
24 देखल्या देवा दंडवत सहज दिसला म्हणून विचारपूस करणे.
25 म्हशीला मनभर  दूध एखाद्याचे मेल्यावर कौतुक करणे.
26 रोज मरे त्याला कोण रडे तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली की तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही.
27 लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून बोलणे पण ते दुसऱ्याला लागेल असे बोलले
28 शहाण्याला शब्दाचा मार शहाण्या शब्दांनी समजले तरी त्याला समजते.
29 हात फिरे तिथे लक्ष्मी वसई प्रयत्नशील माणसाच्या घरी लक्ष्मी आणि संपत्ती नांदते.
30 हाजीर तो वजीर जो ऐन वेळेला उपस्थित असतो त्याचाच फायदा होतो
31 आले अंगावर घेतले शिंगावर संकटाचा सामना धैर्याने करणे करणे.
32 उंटावरून शेळ्या हाकणे कोणत्याही कामात सहभाग न घेता उगाच फुकटचे मार्गदर्शन करणे.
33 उंदराला मांजर साक्ष वाईट माणसाने दुसऱ्या वाईट माणसाविषयी चांगले सांगणे.
34 एकटा जीव सदाशिव एकटा माणूस चिंतामुक्त आणि सुखी असतो.
35 एकादशी आणि दुप्पट खाशी नियमांच्या विरुद्ध वर्तन करणे.
36 एकी हेच बळ एकत्र समुदाय कायम जिंकतो.
37 गड आला पण सिंह गेला एक महत्त्वाची गोष्ट मिळवताना दुसरी महत्त्वाची गोष्ट दूर जाणे.
38 घरोघरी मातीच्या चुली सर्व दूर सारखीच परिस्थिती असते.
39 जिथे कमी तिथे आम्ही पडेल ते काम करून समोरच्याच हातभार लावणे.
40 दक्षिणा तशी प्रदक्षिणा व्यवसायात जसा लाभ तसे महत्त्व आपल्या ग्राहकास देणे.
41 बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर कोणत्याही गोष्टीचा पुरावा मागणे.
42 मनी वसे मनी वसे ते स्वप्नि दिसे आपण ज्या गोष्टीचा सदैव विचार करतो तीच गोष्ट आपल्याला आसपास दिसते.
43 हातावर तुरी देणे एखाद्याच्या कचाट्यातून सुटणे.
44 नावडतीचे मीठ आळणी नावडत्या व्यक्तीने केलेली कोणतीही गोष्ट आवडत नाही.
45 निंदकाचे घर असावे शेजारी आपल्या टीका करांमुळे आपला विकास होतो.
46 निर्लज्जम सदासुखी  वाईट व्यक्तीला त्याचा वागण्याचे काहीही वाटत नाही.
47 दृष्टी आड सृष्टी आपल्या पाहण्यापलीकडे पण जग असते.
48 दुष्काळात तेरावा महिना संकटात अधिक भर पडणे.
49 दिसतं तसं नसतं म्हणून जग फस्त दिखाओ गोष्टी या कायम तकलादू असतात मुळात वेगळेच काही असते.
50 धर्म करता कर्म उभे राहते एखादी चांगली गोष्ट करताना त्याबरोबर एखादी वाईट गोष्ट होते.
51 नाकापेक्षा मोती जड मालकापेक्षा नोकर बाजीराव असणे.
52 पी हळद हो गोरी कोणत्याही गोष्टीत गडबड करणे.
53 मोठं घर पोकळ वासा  दिसण्याची श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव.
54 शितावरून भाताची परीक्षा लहान वस्तूच्या लहान भागावरून त्या पूर्ण वस्तूचे मूल्यांकन करणे.
55 अंगाचा तीळ पण होणे  खूप संतापने.
56 अक्कल खाती जमा नुकसान होणे.
57 कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही दुर्जन व्यक्तीच्या चिंतनाने चांगल्या माणसाचे नुकसान होत नाही.
58 खाली मुंडी पाताळ धुंडी  स्वभावाने गरीब वाटणारा मनुष्य ही धोकादायक असू शकतो.
59 गंगेत घोडे नाले सर्व इच्छा पूर्णत्वास जाणे.
60 जशास तसे जो जसा वागतो त्याला तसेच उत्तर देणे.
61 जावयाचे पोर ह****  माणसाची प्रवृत्ती आपल्या स्वार्थी साधण्यासाठी असते.
62 दाम करी काम पैशाला किंमत असणे.

 

Read More200+Marathi Vakyaprachar

1 thought on “60 Simple Marathi Mhani”

Leave a comment