200+Marathi Vakyaprachar

200+Marathi Vakyaprachar

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 200+Marathi Vakyaprachar ( मराठी वाक्यप्रचार )इंग्रजीमध्ये वाक्यप्रचाराला Phrases असे म्हणतात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला मराठी वाक्यप्रचार याची यादी देणार आहे तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल.

200+Marathi Vakyaprachar

Marathi Vakyaprachar

200+Marathi Vakyaprachar सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरण वाक्यप्रचार

‘वाक्प्रचार म्हणजे काय’? जेव्हा एखाद्या शब्द समूहाचा शब्दश: अर्थ न होता त्यापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थ रूढ झालेला असतो, अश्या शब्द समूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. चला तर आज आपण असेच काही महत्त्वाचे मराठी वाक्प्रचार 200+Marathi Vakyaprachar त्यांचे अर्थ पाहूया!

200+Marathi Vakyaprachar

वाक्यप्रचार

 

अर्थ

1  निर्वाह करणे कारभार करणे, व्यवस्था करणे.
2 तमाशे दाखविणे विशेष कर्तबगारी करून दाखविणे.
3 मोक्ष होणे सुटका होणे.
4 ग्रहण लागणे संकटग्रस्त होणे.
5  ग्रह पसरणे समज होणे.
6 चेव येणे हुरूप येणे.
7 रसातळाला जाणे नाश होणे.
8 सुरूंग लावणे इच्छा ढासळणे.
9 ठेका घेणे मक्ता घेणे.
10 प्रस्कर्त होणे स्फुरण येणे.
11 हास होणे लयास जाणे.
12 कीर्ती अर्जणे कीर्ती मिळवणे.
13 मीमांसा करणे सर्व बाजूंनी सखोल स्पष्टीकरण करणे.
14 तोंडचे पाणी पळणे अतिशय घाबरणे.
15 गंगेत घोडे न्हाणे इच्छा पूर्ण होणे.
16  मूठभर मांस चढणे स्तुतीने हुरळून जाणे.
17 जीव चाचरणे क्षणभर गडबडून जाणे.
18  गणित बरोबर येणे अंदाज योग्य असणे.
19  हातावर हात मारणे अनुकरण करणे.
20 डोक्यात मशाल पेटणे खूप राग येणे.
21  निर्भान होणे भान हरपणे.
22 कानात मुंग्यांचे वारूळ होणे अतिशय राग येणे.
23  राजी नसणे   नाखूश असणे.

 

Read More 400 +Opposite words in Marathi

24 हैदोस मांडणे गोंधळ माजविणे.
25 हलकल्लोळ माजणे गोंधळ उडणे.
26  जीव कासावीस होणे व्याकूळ होणे.
27  गिल्ला करणे गोंगाट करणे.
28  नाकासमोर जाणे सरळ मार्गाने जाणे.
29  समाचार घेणे पाहुणचार घेणे.
30 जतावून ठेवणे बजावून ठेवणे.
31 नेट लावणे  जोर लावणे.
32 विपर्यास करणे चुकीचा अर्थ लावणे.
33 जीव बारीक बारीक होणे शरम वाटणे.
34 लाग नसणे हिंमत नसणे.
३५ अन्नाला मोताद होणे खायला न मिळणे.
36  अन्नास जागण उपकाराची जाणीव ठेवणे
37 आकाशपाताळ एक करणे प्रयत्नांची पराकष्टा करणे.
38 आगीत उडी घेणे स्वतःहून संकटात पडणे.
39 आभाळ कोसळणे मोठे संकट कोसळणे.
40  आडवे होणे झोपणे.
41 डोळा लागणे झोप येणे.
42 उंटावरुन शेळ्या हाकणे काम न करता नुसत्या सूचना देण
43 ओहोटी लागणे उतरती कळा लागणे.
44  कळ लावणे भांडण लावणे.
45 कचाट्यात सापडणे तावडीत, अडचणीत सापडणे.
46 आगीत तेल ओतणे पूर्वीच्या भांडणात आणखी भर
47 अंत पाहणे सतत त्रास देऊन हैराण करणे.
48 काट्याने काटा काढणे दुष्टाकडून दुष्टाला शासन करणे.
49 कुरघोडी करणे दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे..
50  खजील होणे शरम वाटणे.
51 कोंड्याचा मांडा करणे हालाखीच्या परिस्थितीत सुख मानणे
52 खोड मोडणे अद्दल घडविणे.
53 गंध नसणे माहिती नसणे.
54 गर्क असणे मग्न राहणे
55  गट्टी जमणे मैत्री होणे.
56  गहिवरून जाणे मनातून गलबलून जाणे.
57  घर चालणे कुटुंबाचा निर्वाह होणे.
58  घरोबा असणे जिव्हाळ्याचे संबंध असणे.
59 घर डोक्यावर घेणे खूप गोंगाट करणे.
60  तप घालीत बसणे अंतर्मुख होऊन बसणे.
61 आब राखणे अब्रू राखणे.
62 संवाद साधणे संपर्क साधणे.
63  ताबा घेणे आपल्या स्वाधीन करून घेणे.
64 जिवाचा आटापिटा करणे खूप प्रयत्न करणे.
65 चाल करून येणे हल्ला करणे.
66  चीज होणे घेतलेली मेहनत सफल होणे.
67 चंग बांधणे निश्चय करणे.
68  ठाव घेणे शोध घेणे.
69 अगतिक होणे कासावीस होणे.
70 जिवाचे रान करणे. प्रयत्नांची पराकष्टा करणे.
71  जिवात जीव येणे हायसे वाटणे.
72 जिवाला जीव देणे सहकाऱ्याला मदत करणे.
73 कृतार्थ होणे धन्यता वाटणे
74 खाक होणे संपून जाणे, राख होणे.
75  टेंभा मिरवणे ऐट दाखवणे.
76  डाव साधणे संधी मिळताच स्वार्थ साधणे.
77  डाळ न शिजणे काम न साधणे.
78 जवळीक करणे संबंध वाढविणे.
79 टोमणा मारणे खोचक बोलणे..
80 तणतणत निघून जाणे रागाने निघून जाणे.
81 डोळ्यात भरणे नजरेत भरणे, आवडणे.
82  घृणा वाटणे तिरस्कार वाटणे.
83  आवेदन करणे नम्रपणे मागणी करणे.
84 तिखट बोलण जहाल बोलणे.
85 तिळपापड होणे अतिशय संताप होणे.
86 तोड नसणे योग्यतेचे दुसरे नसणे.
87 दवंडी पिटणे सर्वांना जाहीर करणे.
88 दिवस पालटणे परिस्थिती बदलणे.
89 गर्वभार वाहण उगीचच गर्व करणे.
90  दिवस फिरणे वाईट दिवस येणे.
91  दत्त म्हणून उभे राहाणे अनपेक्षितपणे समोर येणे.
92 धडकी भरणे खूप भीती वाटणे.
93 पर्वणी येणे शुभकाळ येणे.
94 धाबे दणाणणे खूप घाबरणे
95 हुरहुर वाटणे अस्वस्थ वाटणे.
96 खट्टू होणे नाराज होणे.
97  धुळीला मिळणे नाश होणे.
98  धूम ठोकणे पळून जाणे….
99  उपेक्षा करणे निराशा करणे.
100 धूळ चारणे पूर्ण पराभव करणे.
101 नाव मिळवणे कीर्ती मिळवणे.
102  शक्कल लढवणे युक्ती काढणे.
103 कानोसा घेणे अंदाज घेणे.
104 निपचित पडणे हालचाल न करता पडणे.
105 . पदरमोड करणे स्वतःसाठी न खर्चता दुसऱ्यासाठी खर्चणे
106 पराचा कावळा करणे अतिशयोक्ती करणे.
107  उद्विग्र होणे चिडून हताश होणे.
108  आकाशाला गवसणी घालणे अशक्य गोष्ट शक्य करणे.
109 पाचावर धारण बसण भयभीत होणे.
110 आक्काबाईचा फेरा येणे गरिबी येणे.
111 आघाडी सांभाळणे पुढारी बनणे.
112 आवरते घेणे संपवत आणणे.
113  कान टवकारणे ऐकण्यासाठी तयार होणे.
114 कालवश होणे देहान्त होणे.
115 कावरेबावरे होणे सैरभैर होणे
116 काळजाचे पाणी होण मन घाबरून जाणे.
117 घायाळ होणे व्याकूळ होणे.
118  चेव येणे जोर चढणे.
119 डोळे फिरणे चकित होणे.
120 तरणोपाय नसणे दुसरा उपाय नसणे.
121  दुवा देणे  आशीर्वाद देणे.
122 धुव्वा उडणे नाश होणे.
123 पोवाडे गाणे कौतुक करणे.
124 पाया घालणे स्थापना करणे..
125 प्रतीक्षा करणे वाट पाहाणे.
126  प्राण कंठात येणे अतिशय चिंता करणे.
127 फडशा पाडणे संपविणे.
128  इतिश्री होणे शेवट होणे.
129  इनाम देणे बक्षीस देणे.
130 अनुमान करणे  अंदाज करणे.
131 कणव असणे सहानुभूती असणे.
132  कटाक्ष असणे रोख असणे, नजर असणे.
133 काळीज सुपाएवढे होणे मन आनंदी होणे.
134 काखा वर करणे जबाबदारी टाळणे.
135 आयासायास करणे खूप प्रयत्न करणे.
136  समरस होणे मिसळून जाणे.
137 खुसपट निघणे उणीव निघणे.
138 कोंडी फोडणे उणीव दूर करणे.
139 गगन ठेंगणे होणे अतिशय आनंद होणे.
140 मान खाली घालणे  लज्जास्पद वाटणे.
141 मुभा असणे  परवानगी असणे.
142 रया जाणे वैभव कमी होणे.
143 रक्ताचे पाणी करणे खूप कष्ट करणे.
144 लंकेची पार्वती होणे गरिबी येणे.
145 वेठीस धरणे फुकट राबवणे.
146 शुकशुकाट होणे शांतता पसरणे.
147 हातपाय गाळणे धीर सोडणे.
148 हंबरडा फोडणे ओक्साबोक्शी रडणे.
149 कालवाकालव होणे बेचैन होणे.
150 मागमूस न लागणे पत्ता न समजणे.
151 मुसंडी मारणे वेगाने घुसणे.
152 टक्कर देणे संकटाशी लढणे.
153 चंग बांधणे निर्धार करणे.
154 डोळे चढणे खूप राग येणे.
155 तडीस जाणे पूर्ण होणे.
156 चांदण्या दिसणे धक्का बसणे.
157 तजवीज करणे उपाययोजना करणे.
158 तोंड काळे करणे वाईट कृत्यामुळे तोंड लपवणे.
159 दंडवत घालणे साष्टांग नमस्कार घालणे:
160  पगडा असणे प्रभाव असणे.
161  पदरात पाडून घेणे प्राप्त करून घेणे.
162  तुच्छ लेखणे कमी लेखणे.
163 बांगडी फुटणे वैधव्य येणे.
164  बाधा आणणे अडचण निर्माण करणे.
165 पारंगत असणे निपुण असणे.
166 पाणी पडणे फुकट जाणे.
167 पोटात शिरणे विश्वास संपादन करणे.
168 रस नसणे आवड नसणे.
169 पण करणे निश्चय करणे.
170 हस्तगत होणे प्राप्त होणे.
171 शह देणे हुसकावून लावणे, जशास तसे होणे
172 विधिनिषेध करणे रीतिरिवाजांचे पालन करणे.
173 वहिवाट असणे  रीत, पद्धत असणे.
174 रिठावर दिवा लावणे वंश चालविणे.
175 विटंबना करणे मानहानी करणे, अब्रू काढणे.
176 होरपळून निघणे संकटात सापडून खूप नुकसान होणे.
177 राजी असणे एखाद्या गोष्टीला मान्यता देणे.
178 वंचित राहणे  एका गोष्टीपासून मुकणे.
179 पदरी बाळगणे आश्रय देणे.
180 दगा देणे फसवणे.
181 खुशामत करणे खोटी प्रशंसा करणे.
182 सुरूंग लावणे उद्ध्वस्त करणे.
183 पाठबळ असणे आधार असणे.
184 पाय घसरणे तोल जाणे.
185 पायबंद घालणे आळा घालणे.
186 बोटावर नाचवणे पूर्ण ताब्यात ठेवणे.
187 मांडीवर घेणे दत्तक घेणे.
189 रक्त आटवणे अतिकष्ट करणे.
190 हात आखडणे देण्याची क्षमता असून कमी देणे.
191 हात देणे ‘मदत करणे.
192 हरभऱ्याच्या झाडावर चढवणे खोटी स्तुती करणे.
193 हेळसांड करणे आबाळ करणे.
194 बाळसेदार होणे अंग धरणे.
195 खजील होणे लाज वाटणे.
196 माशी शिंकणे कामात विघ्न येणे.
197 मूग गिळणे दुर्लक्ष करुन गप्प बसणे.
198 वाट लागणे नुकसान होणे.
199 हाय खाणे धास्ती घेणे.
200 सवड मिळणे मोकळा वेळ मिळणे.
201 शख करणे आरडाओरडा करणे.
202 लालूच दाखविणे मोहात पाडणे.
203 डोळे पडणे पश्चाताप होणे.
204 छत्तीसचा आकडा असणे वैर असणे.
205 हळद लागणे विवाह होणे.
206 शहानिशा करणे खात्री करणे.
207 विडा उचलणे प्रतिज्ञा करणे.
208 वाऱ्यावर सोडणे दुर्लक्ष करणे, जबाबदारी टाळणे.
209 राम राम करणे निरोप देणे.
210 वर्ज्य करणे टाळणे.
211 खसखस पिकणे मोठ्याने हसणे
212 चोरावर मोर होणे वरचढ होणे.
213 ग्वाही देणे साक्ष देणे, आश्वासन देणे.
214 कळीचा नारद भांडणे लावणारा.
215 नाकी नऊ येणे बेजार होणे.
216 दात ओठ खाणे अतिशय संतापणे.
217 दुधात साखर पंडणे आनंदात भर पडणे.
218 कंठ दाटून येण दुःख होणे, वाईट वाटणे.
219 कपाळी असणे  नशिबात असणे.
220 केसाने गळा कापणे विश्वासघात करणे.
221 एक ना धड भाराभर चिंध्या असणे अनेक कामे हाती घेतल्यामुळे एकही
काम पूर्ण न होणे.
222 आकाशाला गवसणी घालणे अशक्य गोष्ट करून पाहणे.
223  हात तोकडे पडणे ‘क्षमता कमी पडणे.
224 कागदी घोडे नाचवणे काहीच कृती न करता नुसतं बडबडणे.
225 पोटात कावळे कोकलणे खूप भूक लागणे.
226 हाता तोंडाशी गाठ पडणे जेमतेम खाण्यास मिळणे.
227  ताकास तूर लागू न होणे थांगपत्ता लागू न देणे.
228 दुथडी भरून वाहणे मोठ्या प्रमाणात अस्तित्व जाणवणे.
229 नाव सोनेरी अक्षरात उमटवणे अजरामर होणे.
230 सळो की पळो करणे सतावून सोडणे.
231 खाजवून खाज काढणे भांडण उकरून काढणे.
232 लष्कराच्या भाकऱ्या भाजणे निष्कारण नको त्या उठाठेवी करणे.

 

 

200+Marathi Vakyaprachar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

4 thoughts on “200+Marathi Vakyaprachar”

Leave a comment