10 Free Trekking Tips

MansoonTrekking Tips in Marathi

10 Free Trekking Tips

 

 

Trekking Tips पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ दिसू लागते. मातीचा सुवास व रिमझिम बरसणाऱ्या सरीमुळे वातावरणात गारवा निर्माण होतो त्यामुळे आपल्याला बाहेर फिरण्याच्या इच्छा निर्माण होते.  पावसाळा सुरू झाला अनेकजण ट्रेकिंगला जाण्याचे प्लॅन असतात.ट्रेकिंगची फारच क्रेझ बघायला मिळते. पावसाळ्यात अनेक जण ट्रेकिंगला जाण्याचे प्लॅन करतात.डोंगराळ भाग हा शहरासारखा नसतो त्यामुळे त्या ठिकाळी गाडी जात नाही. डोंगराळ भागात ट्रेकिंगला जाताना आपण आपली शारीरिक व मानसिक तयारी करायला हवी.ट्रेकिंग केवळ फिरायला जाणं इतकं सोपं नाही त्यामुळे ट्रेकिंगला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळे तुमचा प्रवास आणखी सुखकर आणि चांगला होऊ शकतो.

Trekking Tips 1) व्यायाम ( Exercise)

पहिल्यांदाच ट्रेक ट्रेकला जात असाल तर किमान 30 मिनिटे बॉडी स्ट्रेचिंग आणि इतर पायांचे व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच चालण्यासाठीही दिवसातली तीस मिनिटे खूप झाले थोडक्यात ट्रेकला जाण्यापूर्वी निदान महिनाभर आधी व्यायाम केला पाहिजे.

2) ठिकाणाची माहिती 

ज्या वेळेस आपण एखाद्या ट्रेकिंगचा प्लॅन बनवतो त्यावेळेस एखाद्या ठिकाण फिक्स केलं जातं त्या ठिकाणची संपूर्ण माहिती असणे फार गरजेचे आहे.त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचे मार्ग मॅप्स आसपासची गावे या सर्वांचे माहिती असणे फार गरजेचे आहे.

3) ट्रेकिंग शूज (Trekking Shoes )

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे शूज मिळतात त्यामधल्या ट्रेकिंग शूज हा ट्रेकिंग साठी वापरला जातो.ट्रेकिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पायांची काळजी घेणे उत्तम पकड असलेले ट्रेकिंग शूज तुम्ही पायात घातले पाहिजे जे शूज तुम्ही घालणार आहात त्यांची पायांना सवय असली पाहिजे नवीन शूज लगेचच ट्रेकिंगला घालू नये तो आठवड्याभरापूर्वी वापरला गेला पाहिजे.ट्रेकिंगला जाण्यापूर्वी पायांची नखे कापा वाढलेली नखे आणि बूट यांच्या घर्षणामुळे बोटांना खूप वेदना होतात.पावसाळ्यात शूज हा पूर्ण ओला होतो त्यामुळे स्पेअरला एक चप्पल किंवा फ्लोटर्स सोबत घ्यायला विसरू नका.

4) कपडे / रेनकोट

पावसाळ्यातील ट्रेक साठी रेनकोट घेणे गरजेचे आहे.कपडे घालताना घट्ट कपडे घालू नये. घट्ट कपडे घातल्यामुळे हालचाल कमी होऊन त्यांनी शरीरावर ताण येऊ शकतो त्यामुळे हलके आणि मोकळे कपडे घालावेत पावसाळ्यात ट्रेक करताना नेहमी कपड्यांची एक जोडी बरोबर ठेवावी.पावसाळ्यात एक टॉवेल जवळ असावा.

5) गरजेच्या वस्तू 

ट्रेकला जाताना हात मोकळे असावेत त्यामुळे त्यासाठी तुमच्याकडे एक बॅग असावी त्या बॅग मध्ये सर्व गरजेच्या वस्तू ठेवाव्यात उदाहरणार्थ मोबाईल ,हेडफोन, चार्जर ,पावर बॅंक, कॅमेरा ,फ्लॅश लाईट, बॅटरी या सर्व वस्तू पाण्यात भिजणार नाहीत अशा पद्धतीने प्लास्टिक मध्ये घालून बॅगमध्ये ठेवाव्यात.

6) खाण्याचे पिण्याचे पदार्थ

ट्रेकला जाताना जरी तुम्ही नाश्ता करून जाणार असाल तरीही आपल्या बॅगमध्ये दोन लिटर पाण्याच्या बॉटल सुखा खाऊ हा असलाच पाहिजे.एखाद्या वेळेस जर भूक लागलीच तर तुम्ही तो खाऊ खाऊ शकता त्यामुळे सुखा खाऊ ठेवणे गरजेचे आहे जसे बिस्किट्स, चिप्स ,फ्रुट्स.

टीप : जर तुम्ही गडावर जाण्याचा प्लान केला असेल आणि ह्या सर्व सुखा खाऊन येणार असाल तर त्यांचे प्लास्टिक आणि रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आपल्या सोबतच घेऊन यावेत गडावर कचरा करू नये

10 Free Trekking Tips
Rohida Fort

7) चढताना घ्यायची काळजी

चढताना एकमेकांशी जास्त बोलू नये ऑक्सिजन पुरवठा शरीराला कमी पडतो. जास्त दम लागत असेल तर दहा पावलानंतर थांबून श्वास घ्या. तोंडाने श्वास घेण्याचे टाळा.
चढताना तहान लागल्यास थोडे पाणी प्या जास्त पाणी पिऊ नका जास्त पाणी पिल्याने पोटात दुखायची शक्यता असते.

8) उतरताना घ्यायची काळजी

उतारावर पाऊल तिरकं टाका. ज्यामुळे शरीराचं संतुलन राखणं सोपं होतं. शरीराचा पूर्ण भार एका पायावर देण्याआधी पायाखालची माती/ दगड घसरणार नाही याची काळजी घ्या.खाली उतरताना टाचेकडचा भाग आधी मातीत रोवावा. त्यामुळे पायांना चांगली पकड मिळते. उतरताना ओल्या दगडांवरुन अजिबात चालू नका. उतरताना आपल्या गुडघ्यांवर अधिक जोर येतो. म्हणून एखाद्या काठीचा आधार घेऊन उतरा.

9) नियमांचे पालन करा

जेथे तुम्ही ट्रेकला जाणार आहात तिथे काही नियम आणि अटी यांच्या पाट्या लावलेल्या असतात ते नियम आणि अटी ते तुम्ही पाळले गेले पाहिजे पाळावेत.
उदाहरणार्थ एखाद्या कड्यावर पोहोचले की दरीत वाकून पाहू नये अशी जर पाटी असेल तर त्या दरीत वाकून पाहू नये. डोंगरांची उंची दुःख निसरडी जमीन आणि हवेचा जोर याचा अंदाज नसल्यामुळे अपघात होऊ शकतो

सोपी वाट दिसत असताना केवळ थ्रिल म्हणून कठीण वाटेने जाणे शक्यतो टाळा.

टीप : ट्रेक झाल्यावर जर पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात पाय ठेवल्यास पायांना बराच आराम मिळतो.

10) हवामान माहिती ठेवा

हवामान हा ट्रेकिंग वर परिणाम करणारा घटक आहे.  ट्रेकिंग वर जाण्यापूर्वी हवामानाचे भान ठेवा म्हणजेच “पाऊस” पावसाचे वातावरण कसे आहे? पाऊस किती पडणार आहे? मुसळधार पावसाची लक्षणे आहेत की नाही? वाऱ्याचा वेग दिवस किती आहे? यासारखी माहिती नक्की ठेवा. खरंतर ही मूलभूत गोष्ट आहे परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करतात हवामानाच्या परिस्थितीनुसार आपल्या ट्रेकच नियोजन करा.

 

2 thoughts on “10 Free Trekking Tips”

Leave a comment