विड्याचे पान

विड्याचे पान 

 

 

विड्याचे पान

 

अगदी प्राचीन काळापासून विड्याचे पान खाण्याची परंपरा आहे. व ते शक्यतो जेवणानंतर खाल्ली जाते. काही ठिकाणी विड्याच्या पानांना नागवेल तर संस्कृत मध्ये तांबूल असे म्हणतात असे म्हणतात. विड्याची पानाची खाण्याची खूप सारे फायदे पण आहेत परंतु त्यामध्ये इतर तंबाखू किंवा जे शरीराला अपायकारक आहेत असे पदार्थ टाकू नये.विड्याच्या पानांमध्ये काही औषध गुणधर्म पण आहे. त्यामध्ये प्रोटीन ,कॅल्शियम, खनिज ,कार्बोहायड्रेट,फायबर आणि विटामिन सी हे घटक आरोग्यासाठी लाभदायक असतात.

सांगतात.पानाला केवळ महाराष्ट्रीय लोकांमध्येही नाही तर इतर धर्मांतील लोकांमध्ये महत्व आहे .भारतात विड्याचंपान अतिशय आवडीनं खाल्लंजातं. अनेक कार्यक्रर्य जेवणाची सांगता ही पानाचा विडा खाऊनच होते. जर आपण विडा खाणं ही वाईट सवय समजत असाल तर जरा थांबा, जाणनू घ्या विड्याचेपानऔषधीगुण अनेक आजारांवर उपयुक्त.

त्रयोदशगुणी विडा तेरा प्रकारच्या मुखवासाचे पदार्थ वापरून तयार केलेला विडा आहे.

तेरा पदार्थ :चुना,कात,सुपारी,बडीसोप,जेष्ठमध,खसखस,विलायची,जायपत्री,कापूर,लवंग,खोबरे,कंकोळ,केशर

 

विड्याचे पान

विड्याचे पान खाण्याचे फायदे  व औषधी गुणधर्म:  

 

पचनक्रिया सुधारते :

खाल्ल्यामुळे पचनक्रिया करण्यास मदत होती त्यामुळे पोटात होणारे गॅसेस कमी होतात, जळजळ कमी होते. मधुमेह विरोधी आहे, व हे अँटिसेप्टिक व दुर्गंधमुक्त करणारे आहे करणारे आहे.जेवणानंतर पान खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता सुद्धा कमी होते.विड्याची पाने ही देटा सकट खावीत त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते

 

चेहऱ्यावरील पिंपल्स :

विड्याच्या पानांमध्ये आंटीबायोटिक गुणधर्म असतात व ते गुणधर्म पिंपल्स दूर करण्यासाठी उपयुक्त असतात. त्यासाठी थोडीशी पाणी घ्या व त्याची पेस्ट बनवा त्या त्यामध्ये चिमूटभर हळद टाका व चेहऱ्याला लावा साधारण वीस ते पंचवीस मिनिटे ठेवा व नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.व चेहऱ्यावरील डागही निघून जातात व चेहरा चमकदार होतो.

श्वसनासंबंधी विकार :

श्वसन प्रणाली किंवा खोकला दमा यासारख्यांवरती विड्याचे पान फायद्याचे आहे.श्वास घेण्यात थोडीशी अडचणीत असल्यास किंवा छातीत जळजळ होत असल्यास खाण्याची पाने त्यावरती तेल किंवा तूप लावून तव्यावरती गरम करून त्याने छातीला शेक द्यावा जळजळ कमी होईल व कप मोकळा होईल.

गुडघेदुखी व पायदुखी:

गुडघे दुखत असेल किंवा पायाला कुठे मार लागला असेल तर त्यावरती खाण्याची पाणी तूप लावून गरम करावीत व त्याने आपल्या दुखत असलेल्या गुडघ्याच्या किंवा मार लागलेल्या ठिकाणी पायाला शेक द्यावा त्यामुळे गुडघ्याचे व पायाचे दुखणे कमी होण्यास मदत होईल.

भूक वाढवण्यासाठी:

भूक लागण्याची समस्या असल्यास त्यावरती पान खाणे खूप फायदेशीर आहे. नाश्त्याच्या वेळी काळी मिरीची पावडर टाकून पान खाल्ल्यास भूक लागेल.

दात आणि हिरड्यांचे दुखणे:

विड्याच्या पानांमध्ये आंटीबायोटिक गुणधर्म असतात.तोंडामध्ये जखम झाली असल्यास किंवा तोंड आले असल्यास ते सुद्धा कमी होते.विड्याची पाने चावून खाल्ल्यामुळे दात स्वच्छ होतात व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.दुर्गंधमुक्त करणारे आहे करणारे आहे.

आवाजाचा पोत सुधारण्यास:

 विड्याच्या पानामुळे आवाज स्वच्छ व पातळ होतो. अनेक गायक ही विड्याच्या पानाचे सेवन करतात. विड्याची पाने भिजून ते पाणी 
पिल्यास गळ्यासंबंधीची विकार दूर होता वआवाजाचा पोत सुद्धा ही सुधारतो.

तोंडाची दुर्गंधी होईल दूर:

कारण या पानांमधील घटक आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर करतात. यामुळे विड्याच्या पानाचा वापर हा जास्त करून उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो.

विड्याच्या पानामागील धार्मिक कथा:

समुद्रमंथनातून ज्यावेळी अमृत निघते व ते अमृत भगवान  विष्णू मोहिनीची रूप घेऊन सर्वांना वाटप करत असतात व ते वाटून झाल्यानंतर थोडे शिल्लक राहते त्यावेळी उरलेले अमृत जवळ असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या नागाप्रमाणे खुंतावरून जवळ ठेवले होते व थोड्या दिवसांनी त्या अमृताच्या ठिकाणी वेल उगवतो हा वेल नागाप्रमाणे सरसर वरती चढतो व मंडपाप्रमाणे सर्वत्र पसरतो व ते हिरवीगार पाने असलेला वेल पाहून देवांना सुद्धा खूप आनंद होतो त्यामुळे त्याला नागवेल म्हणून ही संबोधले गेले आहे.

व त्यानंतर भोजन झाल्यावर देवही त्या पानाचा विडा आवडीने खाऊ लागली व त्यानंतर देवाला महानैवद्य अर्पण करताना देवा पुढे पानाचा विडा व दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली.कशी आख्यायिका ऐका मिळते.विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा विड्याची पाने वापरली जातात. त्याचबरोबर लग्न, साखरपुडा किंवा घरात पूजा यांसारखे  विविध कार्यक्रमात वापरली जातात.

विड्याचे पान

निष्कर्ष:

वरील विषयावरून आता आपल्याला एक लक्षात आले असेल ते म्हणजे विड्याचे पान खाणे आणि तेही जेवल्यानंतर हा म्हणजे एक फक्त शोक नसून ती म्हणजे एक शरीरासाठी गरज आहे. चला तर मग माहिती तर आता मिळालीच आहे अमलात आणूयात आणि सशक्त राहुयात.

 

 

2 thoughts on “विड्याचे पान”

Leave a comment