विठ्ठलाची मूर्ती

विठ्ठलाची मूर्ती

 

आषाढी एकादशी

एकादशी आज आषाढी एकादशी आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आपण बऱ्याच प्रकारचे सण या भारत वर्षामध्ये साजरे करतो,आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी वैष्णव संप्रदाय मध्ये विशेष महत्त्व असते. या दिवशी लाखोंनी भक्त संप्रदाय हा पंढरपूर मध्ये येत असतो. आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणले जाते. खरंतर आराध्य दैवत आणि आदर्श अशी संस्कृती असणारा आपला महाराष्ट्र आणि त्याच्यात विठुराया म्हणजे तर सर्वांचे लाडके दैवत पण आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विठुरायाच्या मूर्तीला व्यवस्थित निहाळ आणि का कोणास ठाऊक हा एक प्रश्न पडला विठुरायाची मूर्ती एवढीच सुंदर पण तिचे डोळे असे थोडेसे खाली झुकल्यासारखे का बाकीच्या देवांचे डोळे अगदी आपल्या डोळ्यात डोळे घालून पाहिल्यासारखे वाटतात परंतु या मूर्तीकडे पाहून आज हा पडलेला प्रश्न आणि त्यामुळे उत्तर शोधण्यासाठी झालेली लगबग त्यामुळे हा लेख लिहिण्याची इच्छा झाली आणि ही लेख म्हणजे खरच पडलेल्या प्रश्नाची म्हणजेच गरज ही शोधाची जननी यातून निर्माण झालेला आहे असं म्हणता येईल.

आषाढी एकादशी

विठ्ठलाची मूर्ती:

सुंदर अशी सावळीशी विठुरायाची मूर्ती कमरेवरती हात ठेवलेली विटेवरी उभी राहिलेली डोक्यावरती सरळ अशी एक टोपी कानाच्या भोवतीने मासे आणि कपाळावरचा तो चंदनाचा सुंदर असा टिळा काय सुरेख दिसते विठुरायाची मूर्ती परंतु त्याचे डोळे असे झाकलेले का हा पडलेला प्रश्न आणि त्यासाठी निहाळलेली मूर्ती आणि त्यावरून शोधाशोध केली आणि खरंच की विठुरायाच्या मूर्तीबद्दल बरीच माहिती भेटली तर आता विठुरायाची मूर्ती आणि त्याच्या भोवतीने त्याच्या प्रत्येक मुद्रेचा अविष्कार आणि त्याच्याबद्दल मिळालेली माहिती पुढील प्रमाणे

मूर्तीचे सौंदर्य:

विठुरायाच्या पायापासून सुरुवात करूयात मुक्त केशी नावाची एक दासी होती तिला तिच्या सौंदर्याविषयी खूप गर्व होता ती विठुरायाच्या दर्शनाला आली तेव्हा तिने देवाच्या पायाला स्पर्श करतात तिची बोट देवाच्या पायात रुतली तेव्हा तिला उपरती झाली की माझ्या सौंदर्य पेक्षाही विठुरायाचे सौंदर्य खूप कोमल आहे त्या मुक्तकेशीची बोटं रुतल्याची खूण म्हणून विठुरायाचे पाय दाबल्यासारखे आहेत बरं का

पदकमल:

पायाबद्दलच दुसरी गोष्ट सांगायची ती म्हणजे विठुराया हे स्वतः एक कृष्ण स्वरूप विठुराया हे श्रीकृष्ण अवतारात गुराखी होते .त्याची साक्ष पटवणारी  एक खूण देवाच्या मूर्तीवर आजही दिसून येते ती म्हणजे देवाच्या दोन्ही पायात एक घुंगुरवाडी काठी आहे.

देवाचे वस्त्र:

आता देवाचे वस्त्र देवाने वस्त्र नेसले असून त्याचा सोगा दोन्ही पायाच्या मधोमध म्हणजे घुंगुरवाडी काठीच्या वरील बाजूस व मूर्तीवर दिसून येतो.

देवाचे हात:

विठुरायाचा डाव्याप्रमाणे उजवाही हात कमरेवर असून तो उघडा आहे या हाताच्या अंगठा वळलेला असून त्यात कमलपुष्पाचे देठ आहे.कमरेवर ठेवलेले हात आणि त्या दोन्हीही हातामध्ये छान असे मनगटात दोन कडी आहेत.महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने सकाळी शंख फुंकल्यावर युद्ध सुरू होत असे व सायंकाळी शंख फुंकल्यावर बंद होत असे पंढरीच्या विठुराया हा श्रीकृष्ण अवतारच असणार याचा अजून एक प्रतीक म्हणजे पांडुरंगाच्या हातात शंख आहे बर का.विठुरायाच्या दोन्हीही दंडांमध्ये बाहूभूषण कडी आहे की ज्यांच्यामुळे विठुरायाची समर्थ शक्ती दिसून येते.

छातीवरती खून :

विठुरायाला प्रार्थना घालताना विठुरायाच्या छातीवरती एक खून दिसते तीच म्हणजे मृग ऋषींनी केलेल्या प्रकाराचे म्हणजेच मृगलांछन खूण होय
आपल्या विठुरायाच्या गळ्यात कौस्तुभ मण्यांचा कोरलेला कंठा आहे तो छातीवर भारदस्तपणे दिसून येतो.

मुख:

विठुरायाचा चेहरा किंचितसा उभट आकाराचा वाटतो देवाच्या मुकुटामुळे तसा भासतो कदाचित गाल गोल व फुगीर आहेत.विठुरायाच्या डोक्यावरील मुकुट हा इतर देवांसारखा अगदी नक्षीदार दिसत नाही तो पारशी लोकांच्या टोपी सारखा दिसतो यालाच शिवलिंग असेही संबोधले जाते देवाच्या मस्तकी म्हणजे एकदम वरील बाजूस शिवपिंड आहे.देवाच्या कानात मकर कुंडले आहेत म्हणजेच ते कानातले मासे बर का ती खांद्यावर विसरल्यासारखी दिसून येतात.

अशा आपल्या सावळ्या विठ्ठलाची मूर्ती जरी तीन फूट नऊ इंच असली तरीही ही सुरेख मूर्ती पाहण्यासाठी एव्हाना या विठुरायाच्या मंदिराचा कळस पाहण्यासाठी आपले वारकरी भाविक मैलोन मैल चालत ऊन पावसाची तमा न बाळगत किती सुंदर रित्या माऊली माऊली असे भजन गात आपल्या सवंगड्यांसोबत चा प्रवास पूर्ण करतात हे तर काही आपल्यासाठी नवीन नाही. जगाच्या पाठीवरती असा अनोखा सोहळा आपणास आळंदी ते पंढरपूर या वारीचे निमित्ताने आपणास पहावयास मिळतो हे आपले भाग्यच म्हणावे लागेल.

एकूण काय मूर्ती लहान आणि कीर्ती महान हे वाक्य आपल्या विठुरायाकडे पाहून अगदीच सुरेख रित्या समजते आहो या देवाच्या पायथ्याशी जसे रंग येतात तसे रावही येतात आपल्या या विठ्ठलाला दागिन्यांची काही कमी नाही बर का पण हा विठुराया रमतो तो या आपल्या भोळ्या भाविकांमध्येच जे शुभ्र असे कपडे घालून अनवाणी ऊन पावसाची तमा न बाळगता पहाटे उठून सर्व सोपस्कार करून जे आपले भजन गात चालू लागतात ते विसाव्यालाच विसरतात आणि हा सोहळा उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे भोळेभाग्य आपल्यासारख्या सर्वसामान्य यालाही लाभते धन्य ते विठुरायाची पंढरी आणि धन्य ती आषाढी वारी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

3 thoughts on “विठ्ठलाची मूर्ती”

Leave a comment