महाराष्ट्राची 7 आश्चर्य

 महाराष्ट्राची 7 आश्चर्य

7 Wonders of Maharashtra

मित्रांनो आपल्या सर्वांना जगात कीती आणि कोणती आश्चर्य आहेत हे माहित असेल. परंतु आपल्या ह्या मराठमोळ्या महाराष्ट्राला पण काही आश्चर्य आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ?आपले महाराष्ट्र राज्य हे भारतातील प्रमुख एक राज्यापैकी आहे.
नसेल तर चला जाणून घेऊ त्या आश्चर्य बद्दल.
मित्रांनो महाराष्ट्र सरकारं ने राज्यातील 7 ठिकाणांना त्याच्या वैशिष्टयपूर्ण गोष्टीमुळे तो दर्जा दिला आहे .
तर कोणती आहेत ती :

महाराष्ट्राची 7 आश्चर्य

1.CSMT मुंबई:

 महाराष्ट्राची 7 आश्चर्य

म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनंस. हे ठिकाण रेल्वे स्टेशन असून त्याला देशातील मध्यवर्ती स्टेशन चा दर्जा मिळाला आहे . इथुन च अनेक रेल्वे देशांतील अनेक ठिकाणी जात असतात.मुंबईमधील ऐतिहासिक असे सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक राणी विक्टोरियाच्या राज्याभिषेकच्या सुवर्ण जयंती निमित्त 1887 मध्ये बांधले गेले आहे. या रेल्वे स्टेशनला विटी किंवा सीएसटी रेल्वे स्टेशन म्हणून सुद्धा ओळखले जाते. 1996 मध्ये या रेल्वे स्टेशनचे नामांतर झाले शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी (CSMT) होय.

2. कास पठार:

 महाराष्ट्राची 7 आश्चर्य

सातारा जिल्ह्याच्या पशचिमेकडील दिशेला आणि सह्याद्रीच्या खुशीत बसलेलं हे पठार. सातारा शहरापासून साधारणपणे हे ठिकाण 22 किलोमीटर अंतरावरती आहे.हे पठार जास्त पावसाच्या प्रदेशात असुन अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे वास्तव्य इथे आहे. UNESCO ने नामशेष केलेल्या काही वनस्पतीसुद्धा ह्या ठिकाणी फुललेल्या दिसतात.कास पठार म्हणजे निसर्गाची अद्भुत देणगीच आहे. कास पठार नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक अद्भुत आश्चर्यच आहे. कास पठार महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कास पठार हे फुलांचे पठार किंवा दरी म्हणून ओळखले जाते.

विशेषतः पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सुंदर असे रूप पाहण्यास मिळते. ऑगस्ट ते ऑक्टोंबर या कालावधीमध्ये विविध प्रकारची रान फुले ,फुलपाखरे या पठारावरती पाहण्यास मिळतात व त्यासाठी एक प्रसिद्ध आहे. कास पठारावरती सुमारी 280 फुलांच्या प्रजाती वनस्पती झुडपे व इतर प्रजाती 850 पहावयास मिळतात. हे एक लोकप्रिय महाराष्ट्रातील पर्यटन ठिकाण म्हणून याची ओळख आहे.

3. लोणार सरोवर:

 

 महाराष्ट्राची 7 आश्चर्य
हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात असून या सरोवरातील पाणी हे खारट प्रकारचे आहे. या सरोवरची निर्मिती ही उल्कापतामुळे झालेली असून हे महाराष्ट्राच्या 7 आश्चर्या पैकी एक आहे.लोणार सरोवर हे सुमारे 52 हजार वर्षांपूर्वी उल्केच्या खगोलीयस घटनेमुळे या तलावाची निर्मिती झाली असावी व याला हिमयुग म्हणून ओळखले जाते. लोणार ससरोवर हे राष्ट्रीय भू वारसा स्मारक आहे .त्याला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.

संपूर्ण जगामध्ये लोणावर सरोवर हे एकमेव विवर तलाव आहे. हे संपूर्ण टेकड्यांनी वेढलेली आहे . या ठिकाणी निसर्गरम्य असे वातावरण आहे. व या सरोवरांमध्ये पाण्यामध्ये कोणतेही जलचर प्राणी दिसून येत नाहीत . या सरोवरातील पाणी खारे आहे . संभाजीनगर या शहरापासून सुमारे 150 किलोमीटर एवढे अंतरावरती आहे.

4. रायगड किल्ला:

 

 

महाराष्ट्राची 7 आश्चर्य

रायगड म्हणजे महाराजांच्या स्वराज्याची राजधानी. स्वराज्यातील हिरोजीराव इंदलकर या इसमाने ह्या किल्ल्याचे बांधकाम केलेले आहे. रायगड जिल्ह्यात हा किल्ला असून ह्याची समुद्र सपाटी पासून उंची ही 1356 मीटर आहे. रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक पर्यटन ठिकाण आहे.पावसाळ्यात ह्या किल्ल्यावरील दृश्य बागण्यासाठी हजारो लोकांची गर्दी असते.रायगड किल्ल्यावरती असणारी मुख्य स्थळे हिरकणी बुरुज, टकमक टोक ,शिरकाई मंदिर व श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहेत. रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता.

5. अजिंठा लेणी :

 महाराष्ट्राची 7 आश्चर्य

हे ठिकाण संभाजीनगर शहरापासून साधारणपणे 100 ते 110 किलोमीटर अंतरावरती आहे.अजिंठा लेणी ह्या छत्रपती संभाजीनर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळा पैकी एक आहे. ह्या लेणी वाघूर नदीच्या काठावर असून येथील बौद्ध शिल्प पाहण्यासारखे आहेत . UNESCO ने 1983 मध्ये याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे.अजिंठा लेणी या ठिकाणी असणारे कोरीव काम हे संपूर्ण जगभरातील असाधारण व जटिल कोरीव काम म्हणून ओळखले जाते.

6.दौलताबाद चा किल्ला:

 

 महाराष्ट्राची 7 आश्चर्य

हा किल्ला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून ह्याचे जुने नाव देवगिरी किल्ला आहे.हा किल्ला संभाजीनगर शहरापासून 17 किलोमीटर अंतरावरती आहे.इसवी सन 1187 मध्ये यादव घराण्याने हा किल्ला बांधला होता .
हा किल्ला यादवांची राजधानी राहिलेला आहे. हा किल्ला बाहेरून एवढा अजिंक्य आहे की अजूनपण कुणाला बाहेरून जिंकता आला नाही. ह्या किल्ल्याच्या आसपास असलेल्या तटबंदी साठी हा प्रसिद्ध आहे.दौलताबाद किल्ला हा निसर्गरम्य असणारा किल्ला आहे या ठिकाणी संपूर्णपणे नैसर्गिक वातावरण पाहावयास मिळते.

7. विश्व विपश्याना पॅगोडा :

 महाराष्ट्राची 7 आश्चर्य

हा पॅगोडा मुंबई पश्चिम बोरिवली या ठिकाणी बांधलेला आहे.
याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे बांधकाम हे कोणत्याही खंबाशिवाय बनवलेले आहे. आणि अश्या प्रकारचा हा जगातील सर्वात मोठा पॅगोडा आहे. ह्या प्यागोडाची उंची सर्वसाधारण 325 फूट आहे.जगातील सर्वात मोठा दगडी घुमट म्हणून या ग्लोबल पॅगोडाची ओळख आहे.या ठिकाणी विपासना ध्यान धारणेसाठी एका वेळेस आठ ते दहा हजार लोक बसू शकतील या पद्धतीची व्यवस्था केलेली आहे.खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते.

 महाराष्ट्राची 7 आश्चर्य

Leave a comment