चंद्रयान-3

चंद्रयान-3

चंद्रयान-३

 

भारत ठरेल का चौथा देश…???

chandrayaan-3 mission

भारताने मागील काही वर्षांपासून अंतराळ संशोधनात चांगली कामगिरी करत आहे. तसेच आजपर्यंत विविध प्रकारच्या मोहिमा हाती घेतल्या आणि या मोहिमांमध्ये भारताने यशाला गवसणी घातली आहे. भारताने वैज्ञानिक क्षेत्रात इतकी प्रगती केली आहे की तो अक्षरक्ष: चंद्रावरही जाऊन पोहोचला आहे.अमेरिका पाठोपाठ भारताने ही चंद्रावर पाऊल ठेवले आहे.

अशाच काही चंद्रमोहिमा भारताने मागील काही वर्षांमध्ये राबविल्या. जसे की चंद्रयान-१ आणि चंद्रयान-२. पण चंद्रयान-१ मध्ये भारताला यश आले पण काही अंशत: अगदी शेवटच्या क्षणी चंद्रयान-२ मोहिमेत भारताला अमर्यादित यश आले. पण तरीसुद्धा भारताने या अपयशापुढे हार मानली नाही.आणि पुन्हा भारत नव्याने चंद्रयान मोहीम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अलीकडेच चंद्रयान-२ च्या अपयशामुळे खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने भारताची अवकाश संशोधन संस्था इस्त्रोच्या वतीने अत्यंत महत्त्वकांशी चंद्रयान-3 मोहीम दिनांक १४ जुलै रोजी दुपारी २:३० वाजता आंध्र प्रदेश मधील श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपण तळावरून हे यान चंद्रावर भरारी घेईल, अशी घोषणा इस्त्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी केली.

व तसेच हे यान चंद्रावर २३ किंवा २४ ऑगस्टला उतरण्याची शक्यता आहे,असे इस्त्रोकडून माहिती देण्यात आली आहे.
या चंद्रयानच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या असून हे यान ‘लॉन्च व्हेईकल मार्क-३’ (LVM-3) या प्रक्षेपण यानावर ते सिध्द करण्यास सक्षम झाले आहे.

काय आहे चंद्रयान-3 ?

चला तर मग, सविस्तरपणे जाणून घेऊयात भारताच्या अत्यंत महत्त्वकांक्षी नवीन मोहिमेविषयी….!
मोहिमेसाठी लागणारा खर्च?
आजपर्यंत अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारताने धडपड केली व विविध प्रकारच्या मोहिमा आखल्या. यातील काही मोहिमा यशस्वी ठरल्या तर काही मोहिमांमध्ये अपयश आले जसे की चंद्रयान-२. पण तरीसुद्धा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) पुन्हा एकदा नव्या जोमाने चंद्रयान-३ ही नवीन मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ७०० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

मोहिमेचे महत्व/उद्देश काय असेल ?

या मोहिमेचे दोन भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात ‘चंद्राचे विज्ञान’ (science of the moon) या अंतर्गत चंद्राचा सभोवताली चा भाग म्हणजेच चंद्राची आवरणशिला, चंद्राच्या भूगर्भातील हालचाली, व तसेच चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्माचे प्रमाण आणि हे यान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरणार आहे तिथल्या आसपास असलेल्या चंद्रपृष्ठावरील रासायनिक मूलद्रव्य यांचा अभ्यास केला जाणार आहे.

तर मोहिमेच्या दुसऱ्या भागात ‘चंद्रावरून विज्ञान’ (science from the moon) याचा समावेश आहे. यात चंद्राच्या कक्षेमध्ये राहून पृथ्वीचा अभ्यास केला जाणार आहे. व चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीवरील वर्णपटासह अन्य निरीक्षणांचा अभ्यास करता येणार आहे.

याखेरीज चंद्रयान-३ प्रत्यक्ष चंद्रावर उतरून तेथील चंद्राचे तापमान वातावरण व परिस्थिती याचा अभ्यास करणार आहे. चंद्रावर भूकंप कशा प्रकारचे होतात. व तेथील मातीत कोणते घटक आढळतात, इत्यादी माहिती जाणून घेण्यात येणार आहे.
व तसेच चंद्रावरील सोने, प्लॅटिनियम, युरेनियम इ. अनेक खनिज संपत्तीचा शोध घेतला जाणार आहे.

या मोहिमेत भारताची भूमिका काय असेल ?

चंद्रयान-३ अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर २३ किंवा २४ ऑगस्टला उतरणार आहे.जर ही मोहीम यशस्वी झाली तर चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळयान उतरवणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.याआधी चंद्रावर अंतराळयान यशस्वीरित्या उतरवण्यासाठी अमेरिका,रशिया,चीन या देशांना यश आले आहे.
या मोहिमेमुळे भारताचे अंतराळ संशोधन अधिक प्रगत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.त्यामुळे या मोहिमे अंतर्गत चंद्रावरील प्रयोग व त्यातून हाती येणाऱ्या निष्कर्ष आणि परिणाम यांकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.

प्रक्षेपण यान म्हणजे काय ?

उपग्रह किंवा यान हे स्वतःहून प्रत्यक्ष अंतराळात जाऊ शकत नाही. म्हणून हे अंतराळात पोहोचवण्यासाठी काही प्रक्षेपण यानांची गरज असते.जसे की, LVM-3.
या प्रक्षेपण यानात शक्तिशाली प्रणोदन प्रणाली म्हणजेच पुढे/ अंतराळाच्या दिशेने पृथ्वीवरून वरती ढकलण्याची शक्तिशाली क्रिया असते. जी क्रिया पृथ्वीची प्रचंड असणाऱ्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून उपग्रह/यान सारख्या अवजड वस्तूंना अवकाशापर्यंत नेण्यासाठी आवश्यक असते.ज्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते.
उदा.LVM-3 प्रक्षेपण यान जे चंद्रयान-३ या यानाला अवकाशात सोडण्यासाठी तयार झाले आहे.

 

जाणून घेऊयात सविस्तरपणे,

चंद्रयान-3

LVM-3 (Launch Vehicle mark-3) बद्दल,

हे यान भारताचे सर्वात वजनदार रॉकेट आहे. हे यान अत्यंत शक्तिशाली आहे.

LVM-3 ची रचना-
१.उंची – ४३.५० मी.
२.रूंदी – ४ मी.
३.वजन – ६४० टन.
४.वजन पेलण्याची क्षमता – ८,००० कि.ग्रॅ.
५.स्तर – ३
व तसेच या यानाच्या एका बाजूला सोलर पॅनल लावण्यात आले आहे. व दुसऱ्या बाजूस विविध प्रकारचे सेन्सर बसवण्यात आले आहेत.

LVM-3 प्रक्षेपण यानाने पार पाडलेले उपक्रम कोणते ?

इस्त्रोने ५ जून २०१७ रोजी सतीश धवन या अंतराळ केंद्रातून ‘GSLV MK-3’ ची पहिली कक्षीय चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. चंद्रयान-3 हे LVM-3 चे ७ वे प्रक्षेपण असेल व तसेच ब्रिटन मध्ये स्थित असणारे ‘वनवेब ग्रुप कंपनी’ चे ३६ इंटरनेट उपग्रह सोडण्यात आले होते.
चंद्रयान-३ चे स्वरूप काय ?

चंद्रयान-3 या याना मध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.

१.विक्रम लॅंडर (चंद्राच्या पृष्ठावर उतरणारे वाहन) – लॅंडरच्या चार कोपऱ्यावर चार इंजिन असतील. दोन इंजिनच्या मदतीने अंतिम लँडिंग केले जाईल.लॅंडरच्या पायांची क्षमता ३ मीटर प्रतिसेकंद वेग सहन करणे इतपत आहे.शिवाय कोणत्याही अडथळ्याविना अधिक अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरता यावे व परत येण्याचा प्रयत्न करता यावा यासाठी यामध्ये अधिक इंधनही ठेवण्यात आले आहे.

लॅंडरमध्ये ५ उपकरणे आहेत.

२.रोव्हर – हे एक प्रकारचे लॅंडरमधून चंद्राच्या पृष्ठावर उतरल्यानंतर चालणारे वाहन असते.यात २ उपकरणे आहेत.जे तापमान मारते वातावरणातील घटक आणि वायू यांची नोंद घेतील

३.प्रोपल्शन मॉडेल (प्रेरक) – चंद्रयान-३ ला ऑर्बिटर नसणार आहे.त्याऐवजी एक प्रोप्लशन मॉडेल आहे.लॅंडर आणि रोव्हर
पासून वेगळे झाल्यानंतरही चंद्राच्या कक्षेतून फिरेल आणि चंद्रावरून पृथ्वीवरील जीवनाची पदचिन्हे शोधण्याचा प्रयत्न करेल.यामुळे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीवरील वर्णपटासह अन्य निरीक्षणे नोंदविता येणार आहेत.

४.ऑर्बिटर – या यानामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही; कारण चंद्रयान-२ च्या ऑर्बिटर कडून यासाठी मदत घेण्यात येणार आहे.
पृथ्वीवरून प्रक्षेपणापासून चंद्रावर उड्डाण पर्यंतचा प्रवास कसा असेल ?

२३ किंवा २४ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल असे इस्त्रोने जाहीर केले आहे .पण ते कशाप्रकारे? हे आपण जाणून घेऊयात.
मात्र चंद्रावर १४ ते १५ दिवस सूर्यप्रकाश असतो तर १४ ते १५ दिवस अंधार असतो आणि चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग साठी सूर्यप्रकाश असणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे त्या परिस्थितीचा अंदाज घेऊन यान उतरवले जाईल अशी माहिती मोहिमातील संशोधकांनी दिली.

पृथ्वीपासून चंद्राचे अंतर ३.८४ लाख किलोमीटर आहे ते यानाला पार करायला ४५ ते ४८ दिवस लागतील.
LMV-3 द्वारे यान पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाईल व ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल आणि याबरोबरच आपल्या प्रदर्शनेचा परिघ वाढवत राहील आणि या दरम्यान एका क्षणी ते पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल व पुढे चंद्राला प्रदक्षिणा घालणे सुरु करेल.

चंद्रयान-3 हे यान ‘लॅंडर’ आणि ‘रोव्हर’ ला चंद्राच्या भोवतालच्या १०० किलोमीटरच्या कक्षेत नेईल. आणि चंद्राच्या कक्षेतून लॅन्डर आपला परिघ लहान करत करत एका क्षणी चंद्राच्या पृष्ठभागावर इंजिनच्या साह्याने अलगदपणे उतरेल.
सविस्तर पणे आकृती सहित जाणून घेऊयात…..

आपण चंद्रयान-३ चा पृथ्वीपासून ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचा प्रवास तर जाणून घेतला पण या प्रवासादरम्यान काही अडथळे येतील व काही आव्हाने पेलावे लागतील ते आव्हाने कोणती ते पण जाणून घेऊयात.

चंद्रयान-3 च्या मोहिमेदरम्यानच्या आव्हाने कोणती?

१. लँडिंग दरम्यान येणारे अडथळे – ‘विक्रम लॅंडर’ चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित उतरवणे.चंद्रयान-३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.मात्र इथे सूर्य फक्त क्षितिजा लगत असतो त्यामुळे या ठिकाणी मोठ्या सावल्या पडतात व अंधार असल्यामुळे काहीही नीट दिसत नाही.

मंगळ ग्रह हा चंद्रापेक्षा पृथ्वीपासून कितीतरी अंतरावर लांब आहे तरी सुद्धा तिथे लँडिंग सोपे आहे कारण मंगळावर वातावरण आहे. परंतु चंद्रावर लँडिंग करणे कठीण आहे कारण की तेथे वातावरण नाही आणि वातावरण नसल्यामुळे चंद्रावर उतरण्यासाठी प्रोपेलंटचा (प्रणोदक) वापर केला जातो जो मर्यादित प्रमाणातच नेता येतो.

२. चंद्रावरील लोकेशन बाबतचे अडथळे – आपण पृथ्वीवर जीपीएस द्वारे लोकेशन ची माहिती मिळवू शकतो परंतु चंद्रावर हे लोकेशन ची माहिती मिळू शकत नाही; कारण चंद्रावर लोकेशन दाखवणारे सॅटेलाईट नाहीत त्यामुळे चंद्रावरचे लोकेशनही कळत नाही आणि पृष्ठभागापासूनचे अंतरही कळत नाही.

३. चंद्राच्या पृष्ठभागावरून कोणत्याही अडथळ्याविना यशस्वीरित्या रोव्हर व्यवस्थित चालविणे.
४. चंद्रावरील विविध घटकांचे जसे की मातीत असणारे घटक व खनिज संपत्ती, चंद्रावरील वातावरण या.
परिस्थितीचे वैज्ञानिक परीक्षण पूर्णरित्या पार पाडणे.

आपण भारताची चंद्रयान-3 या अत्यंत महत्त्वकांक्षी मोहिमेबद्दल सविस्तरपणे जाणून घेतले.पण ही मोहीम यशस्वीरित्या पार पडेल का? भारत पुन्हा एकदा अंतराळ क्षेत्रात प्रगती गाजवेल का? म्हणून या मोहिमेने पूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

थोडसं मागील काही वर्षी भारताने पाडलेल्या चंद्रयान या मोहिमेबद्दल ही जाणून घेऊयात.

 १.चंद्रयान-१ :-

भारताने ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
१५ ऑगस्ट २००३ : भारत चंद्रावर आपले यान पाठवेल अशी घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती.
२२ ऑक्टोबर २००८ : श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या अंतराळ स्थानावरून चंद्रयान-१ प्रक्षेपित झाले.
८ नोव्हेंबर २००८ : चंद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले व स्थिरावले.
१४ नोव्हेंबर २००८ : यानाने चंद्रावर लॅंड केले.
सप्टेंबर २००९ : यातून मिळालेल्या माहितीच्या द्वारे नासाने चंद्रावर पाणी असल्याचा निष्कर्ष काढला.
२९ ऑगस्ट २००९ : या यानाने वर्षभरात चंद्राभोवती ३४०० प्रदक्षिणा घातल्या आणि नमूद तारखेस यानाशी कायमचा संपर्क तुटला.

२.चंद्रयान-२ :-

भारताने ही दुसरी मोहीम २२ जुलै २०१९ रोजी राबवली परंतु शेवटच्या क्षणी चंद्रावर उतरण्याच्या वेळी ही मोहीम अपयशी ठरली.

या मोहिमेच्या अपयशाची कारणे कोणती?

६ सप्टेंबर २०१९ च्या पहाटे चंद्रावर ‘लॅंडर’ आणि ‘रोव्हर’ क्रश झाल्यानंतर अ़ंशत: अयशस्वी झाली.
काही तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी ठरली.
चंद्रयान-२ मध्ये लँडरच्या पायांची क्षमता २ मीटर प्रति सेकंद वेग सहन करण्याची क्षमता होती.त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना हे वाहन टिकू शकले नाही.
रोव्हरला चालताना अनेक अडथळे आले आणि त्यामुळे तो चंद्राच्या पृष्ठभागावर चालू शकला नाही.
या मोहिमेचा घटनाक्रम :
२२ जुलै २०१९ : चंद्रयान-२ प्रक्षेपित झाले.
२० ऑगस्ट २०१९ : चंद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

६ सप्टेंबर २०१९ : विक्रम लॅंडरची चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायला सुरुवात झाली परंतु संपर्क तुटला.अर्थात ऑर्बिटर अद्यापही चंद्राच्या कक्षेत फिरत आहे व माहिती गोळा करत आहे. चंद्रावर उतरताना विक्रम या लँडरचा वेग सेकंदाला १६८३ मीटर वरून सेकंदला १४० मीटर करण्यात आला. या दरम्यान ब्रेकिंग सिस्टम मध्ये बिघाड झाला. आणि ही मोहीम अयशस्वी ठरली.

1 thought on “चंद्रयान-3”

Leave a comment