अध्यात्मापर्यंत पोहोचण्याचे 4 मार्ग

अध्यात्मापर्यंत पोहोचण्याचे 4 मार्ग !!!

Four Ways to Reach Spirituality:

अध्यात्मापर्यंत पोहोचण्याचे 4 मार्ग

 

आपल्याला जीवनात आनंद मिळवायचा असतो प्रगती साधायची असते तसेच अमरण असलेल्या आत्म्याला जाणून घेण्यासाठी पूर्वीच्या काळी ऋषींनी कर्म ज्ञान भक्ती आणि योग हे चार मार्ग सांगितले.

आत्म्याला कोणत्याही प्रकारचे बंधन नसते तो मुक्तपणे संचार करत असतो परंतु आत्मा हा मन आणि बुद्धीचा प्रभावाने बंधनात अडकलेला असतो. आणि यामुळे तो अशुद्ध होतो. आणि हेच आत्मा विषयीचे किंवा आत्मासाक्षात्कार करण्यासाठी अध्यात्माचा मार्ग अंगीकारला पाहिजे त्यातच मानवी जीवनाची खरे सार्थक आहे म्हणून ऋषीमुनींनी सांगितलेले अध्यात्मिक साधनेचे प्रमुख चार मार्ग कोणते ते आपण आज पाहूयात.

अध्यात्मिक साधनेचे प्रमुख चार:

१. कर्मयोग/ कर्म मार्ग

२. ज्ञानयोग/ज्ञान मार्ग

३. भक्ती योग /भक्ती मार्ग

४. योग मार्ग

कर्मयोग :

कर्मयोग म्हणजे इतरांचं चांगलं व्हावं ही भावना मनात ठेवून इतरांच्या हितासाठी निस्वार्थपणे कार्य करत राहणे. आपल्या मनात जशी इच्छा निर्माण होत असते तसे आपल्या हातून कर्म घडत असते. मग ते चांगल्या प्रकारचे आणि दुसरे हे वाईट प्रकारचे पण असू शकते. म्हणूनच आपल्या जीवनात नको असलेल्या गोष्टी म्हणजेच अनावश्यक गोष्टींना दूर ठेवून मनाला व इंद्रियांना ताब्यात ठेवणारा हा कर्मयोग असतो. या कर्ममार्गात क्रियाशक्ती ही परिपक्वता प्रमुख असते.

भगवद्गीता या धर्मग्रंथात प्रभू श्रीकृष्ण यांनी कर्म याविषयी सांगितल्याप्रमाणे,
“तुम्ही सत्कर्म करत रहा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता”

अध्यात्मापर्यंत पोहोचण्याचे 4 मार्ग

ज्ञानयोग :-

या योगाला आत्मसात करणारा साधक हा योग्य काय आहे अयोग्य काय याविषयी त्याच्या मनात बुद्धीत विवेक निर्माण करत असतो. मानव त्याचे जीवन हे बहुतेक उपभोगांसाठी नसून ते ईश्वर प्राप्तीसाठीच आहे त्याची जाणीव साधकाला असते. त्यासाठी तो त्याच्या शरीर, इंद्रिय व मनाला प्रशिक्षित करून श्रद्धा व समाधान या दोन गोष्टींना आश्रय देऊन दीर्घकाळ प्रयत्नशील असतो. या ज्ञानमार्गात बुद्धीचे परिपक्वता असणे गरजेचे आहे.
म्हणूनच ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते म्हणून ज्ञानाचा प्रचार करत रहा.

अध्यात्मापर्यंत पोहोचण्याचे 4 मार्ग

भक्ती योग :-

या मार्गात प्रामुख्याने असे मानले जाते की,आपल्यामध्ये असणारा स्वार्थ, अहंकार ,गर्विष्ठपणा आणि ‘मी’ पणा बाजूला ठेवून परमेश्वराची मनोभावानेच सेवा केली पाहिजे. या मार्गाने जाणारा सादर सर्वत्र भगवंतालाच शोधत असतो. भक्ती हि परमेश्वराला शरण गेल्यामुळे प्राप्त होणारी एक प्रकारची आनंदाची भावना असते. भावना ही या भक्ती मार्गाची प्रमुख गोष्ट आहे.

 

योग मार्ग :-

यातून मनावर नियंत्रण व हुकुमशाही आणता येते. मनामध्ये अनेक भावनांचा वास असतो जसे की इच्छा, वासना, व्यसने ,इत्यादी.., जसे आपल्या मनामध्ये भावना असते तसेच आपले विचार उदयास येतात. वरील चारही मार्ग मनाला शांतता आणि स्थैर्य प्रदान करतात. जे आत्मसाक्षात्काराकडे घराकडे कडे जाण्याचा मार्ग दाखवितात. योगभ्यास हा शरीर मन आणि आत्मा यांच्यातील सुसंवाद निर्माण करणारा दुवा आहे. आत्म्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर शरीर आणि मन यांना डावलून चालत नाही. योगमार्गात शरीर ,श्वास मन, बुद्धी, आत्मा यांना एकमेकांना जोडायला शिकवले जाते.

तुमच्यामध्ये समतोल कसा साधावा हे सुद्धा शिकवले जाते. त्यानंतर मेंदू शांत होतो. डोक्यात सतत चालत असणारे विचारांचे चक्र थांबते.वेगवेगळे प्रकारचे आसन ,प्राणायाम, ध्यान ही योग मार्गामध्ये साधनेचे गुरुकिल्ली चे काम करतात. जर प्रगती साधायची असेल तर योग अभ्यास करताना आवड असावी लागते. जर तुम्ही खूप ज्ञान असेल असाल पण समाजात, तुमचे मित्र मंडळ यांच्या बद्दल तुमच्या मनात प्रेम जिव्हाळा आपुलकी नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग काय? हेच आपल्याला योग मार्ग शिकवतो.

 

 

5 thoughts on “अध्यात्मापर्यंत पोहोचण्याचे 4 मार्ग”

Leave a comment